चलो 'हरिहर'..!
ट्रेक दरवेळी प्रायवेट गाडी घेउनच का करावा.. कधीतरी एसटी,ट्रेन अश्या पब्लिक ट्रांसपोर्टची मदत घेत ट्रेक करण्याची मजा काही औरच असते.. मग त्यासाठी वेळेच गणित मांडा आणि जरा इकडे तिकडे झालं किंवा होउन नये म्हणून होत असणारी धावपळ चांगलीच लक्षात राहते... आम्हाला या पारंपारिक पद्धतीचा शिरस्ता मोडायचा नसल्यामुळे अधुन- मधून असे ट्रेक करतच असतो... अशीच खुमखुमी मित्र रोमाला आली.. या मागचं खर कारण तर नेमका शनिवारी त्याला कामावर मिळालेला ऑफ नि थंडीचा ऑन सिझन... माझं म्हणाल तर मी बर्यापैंकी ट्रेक फ्लो मध्ये होतो.. आधी अंजनेरी मग पद्मदुर्ग नि आता रोमाचा संदेश.. चलो हरिहर.. !! सलग तीन आठवडे ट्रेक..!