मॅनहंट
११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटर वरच्या हल्ल्याची दुर्दैवी घटना घडली आणि त्यानंतर अल्पावधीतच अमेरिकेने दहशतवादाविरोधी कारवाया सुरु केल्या. नंतर हाती आलेल्या माहितीनुसार 'अल-कायदा' ही संघटना आणि तिचा प्रमुख ओसामा बीन लादेन ह्यांचा ह्या हल्ल्यामागे हात होता आणि त्यामुळे ते अमेरिकेचे प्रमुख शत्रू बनले. बीन लादेनला मारण्यासाठी अमेरिकेने जंग जंग पछाडलं आणि अखेर २ मे २०११ रोजी अमेरिकन नेव्ही सिल्सच्या पथकाने केलेल्या कारवाईत लादेन ठार झाला. 'मॅनहंट - ९/११ ते अॅबटाबाद' ह्या पिटर बर्गन लिखित आणि रवी आमले अनुवादित पुस्तकात ह्या १० वर्षांच्या शोधकथेचा थरार आपल्या सामोर उलगडतो.