चेतन भगत

हाफ गर्ल्फ्रेंड - चेतन भगत उवाच

Submitted by अविकुमार on 6 October, 2014 - 06:45

नुकतीच १ ऑक्टोबरला चेतन भगतची नवीन इंग्रजी कादंबरी 'हाफ गर्लफ्रेंड' प्रसिद्ध झाली. बरेच दिवसांपासून त्याबद्दल ऐकून होतो. या पूर्वी चेतनची five points someone आणि 2 states या कादंबर्‍या वाचल्या होत्या. त्यातली 2 states आवडलीही होती. म्हणूनच 'हाफ गर्ल्फ्रेंड' मोफत घरपोच ऑर्डरही करुन टाकली आणि विशेष म्हणजे २ दिवसांत घरपोच मिळालीही. कालच ५ तासांत वाचून संपलेल्या या पुस्तकाविषयीचे माझे वैयक्तिक मत. वाचून झाल्यावर मनात आलेले विचार लगोलग उतरवल्याने पुस्तकपरिक्षण म्हणने योग्य होणार नाही. समिक्षकाच्या चष्म्यातून विचार मांडणे हे शिवधनुष्य मला पेलवणारे नाही. आपण आपले 'हौशी वाचक'च बरे!

विषय: 

प्रथम तुज पाह्ता , जीव वेडावला अर्थात टू स्टेट्स

Submitted by अश्विनीमामी on 20 April, 2014 - 08:20

एक पे एक फ्री ही मार्केटिंग मधली हमखास यशस्वी होणारी युक्ती आहे. चित्रपटाच्या रंगीत दुनियेतही ती वापरली जाते पण नेहमी यशस्वी होईलच असे नाही. असं बघा पहिले फरहा आली दोन चार चित्रपट करून विंदू कुमार बरोबर लग्न करून स्थिरावली. पण तिच्या पावलावर पाउल टाकून तब्बू आली. आणि पहिला प्रेम सोडा,( पहिला डाव भुताच असतो ना... ) पण प्रत्येक चित्रपटाद्वारे उत्तम काम करून तिने आपला असा क्लास निर्माण केला. सनी देवलच्याच घरातून बॉबी आला. तो बेताब आम्ही थेटरात जाउन बघितला होता हे कबूल करणे ही आता तरुणपणी केलेली एंबरासिन्ग कामे ह्या फोल्डर मध्ये टाकून डिलीट करायची बाब झाली.

विषय: 

भारतीय समाजाचे चित्र

Submitted by मी-भास्कर on 26 January, 2013 - 03:00

भारतीय समाजाचे चित्र

दिल्लीत झालेल्या दामिनी प्रकरणात झालेल्या उद्रेकानंतर सध्याच्या भारतीय समाजाचे चित्र रेखाटणारा चेतन भगत यांचा लेख १३-१-१३ च्या टाईम्स मध्ये वाचला. त्या लेखातील प्रतिपादन मला समजले तसे थोडक्यात देत आहे. जिज्ञासूनी लेख मुळातून वाचावा.
एवढ्या प्रचंड समाजाचे चित्रण कोणी एक जण करेल आणि ते सर्वमान्य होईलच असे नाही. पण बरेचसे तंतोतन्त चित्र तयार होण्यास लागणारे स्केच असे त्याकडे बघता येईल. परिवर्तन व्हावे असे वाटणार्‍यांसाठि त्यांनी लेख लिहिल्याचे म्हटले आहे.
लेखाचा सारांश

Subscribe to RSS - चेतन भगत