नमस्कार. नुकतंच जालना येथे 'योग संमेलन' झालं. चैतन्य योग केंद्र जालना व निरामय योग प्रसार व संशोधन केंद्रातर्फे आयोजित ह्या योग संमेलनामध्ये 'योग जिज्ञासा: एटलस सायकलीवर योग यात्रा विशेषांक' प्रकाशित करण्यात आला. गेल्या मे महिन्यामध्ये परभणी- जालना- औरंगाबाद व बुलढाणा जिल्ह्यात ५९५ किमी सायकल प्रवासातून विविध योग साधकांसोबत झालेल्या भेटी, त्यांचे अनुभव, ठिकठिकाणची योग केंद्रे/ योग साधक ह्यांचे पत्ते व संपर्क क्रमांक ह्यांचे तपशील असलेला हा विशेषांक आहे. योगामुळे आयुष्यात काय फरक पडला, हे २७ साधक- साधिकांच्या अनुभवातून आपल्याला कळतं.
मी कॉलेज मधे असताना एक जुने मराठी पुस्तक वाचले होते. साधारण अशी कथा होती. कथेतल्या मुलीला एक मुलगा बघायला येतो. त्यचा मित्र खूप सभ्य असतो, पण मुलगा खूप बडबड करणारा,वव्चावचा खाणारा असा असतो. मुलीचा गैरसमज होतो की जो चांगला आहे तोच बघायला आला आहे. लग्नाच्या वेळी ते कळते, पण जुना काळ असल्यामुळे ती बोलत नाही. नंतर केव्हातरी शेतातले वानर मारताना चुकून त्या मित्राची गोळी या मुलीच्या नवर्याला लागते आणि तो मरतो. मित्राला शिक्षा होत नाही, पण तो मनाने उध्वस्त होतो आणि शेवटी नायिका त्याच्याकडे जाते असे काहीसे. कोणी सांगू शकेल का पुस्तकाचे नाव आणि लेखक? जु न्या कोकणातली गोष्ट आहे बहुधा.
पुस्तकाचे नाव - थिओडोर बून (स्कँडल) लेखक - जॉन ग्रीशाम
मी पुस्तक उघडलं आणि पानं फडफडवली. बघत होते मी काही पैसे ठेवलेले सापडत असतील तर. मी एक विशाल भिंत पार करून गेले आणि अंधारात चंद्रकोर उगवली होती. शंकरानेच धारण केली होती. एक सर्पही होता तिथे. पण शंकराच्या गळ्यात नव्हता. अथांग आणि शांत समुद्राच्या शेजारच्या खडकांवरून चालला होता तो. एका सर्पांनी भरलेल्या गुहेकडे चालला होता तो. तिथेच एक मध्यमवयीन सर्प सांगणार होता कहाणी क्लिओपात्रेला त्याने केलेल्या दंशांची आणि तिच्या गौर कायेवर त्याच्या दंशांमुळे उगवलेल्या विषाच्या निळ्या वर्तुळांची.... आणि मग तो मध्यमवयीन सर्प निघून जाणार होता अनंताच्या प्रवासाला.
"वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही" पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.
वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही
तब्बल चार वर्षानंतर, पुन:लेखन करून, संवाद, लावण्या आणि प्रसंगात बदल करून, "वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही" पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.
तुम्हां सर्व रसिक वाचकांना आणि लेखन करतांना हुरूप देत आपुलकीचे नाते जपणार्या MisalPav.com, Aisiakshare.com, MaayBoli.com येथील संचालक, सभासद यांना सविनय अर्पण.
झुकलेली नजर, ओठांवर मंद स्मित आणि एक लाजरा कटाक्ष…अगदी क्षणभरच.. पण त्या क्षणभरच्या नजरभेटीतूनही जी कुठल्याही पुरुषाला वेड लावू शकते, ओढ लावू शकते ती खरी गेइशा!!
स्पर्श नाही, अंगप्रदर्शन नाही किंवा सवंग हावभाव नाहीत...फक्त एक कटाक्ष.
'गेइशा'- जपानच्या इतिहासातले, त्याच्या संस्कृतिक जडणघडणीतले महत्त्वाचे अंग. सामाजिक जीवनाचा अभिमानास्पद नसला तरी एक अविभाज्य भाग.
एक आणखी पुस्तकं वाचुन संपवल..नाही संपल म्हणुया..
श्री मिलिंद वाटवे यांच 'आरण्यक'..
खरतर लॅपटॉप बंद करुन ठेवलेला परत उघडला ते लिहिण्यासाठी. पुस्तक संपल्यावर ज्या काही भावना मनात उठतात त्या शिळ्या व्हायला नको म्हणुन लिहायला बसली.
खुप आवडावं, मनात रुतुन बसावं असं हे पुस्तक मला स्वतःला तरी वाटलं नाही पण एक प्रचंड ओढ मात्र जाणवली ते वाचताना..माणुस तल्लीन होऊन जातो तसं काहीसं..
‘चरैवेति, चरैवेति’ हे मनुष्यप्राण्याच्या प्रवासाचे सूत्र आहे. तो कुठून आला आहे याची त्याला एका मर्यादेबाहेर कल्पना नसते आणि पुढे कुठे चालला आहे याबद्दल नजिकचा भविष्यकाळ वगळता खात्रीही नसते. पण तो चालायचा थांबत नाही. इच्छा, नशीब, भावना, संकट, संधी यांपैकी कुठल्याही कारणांनी तो एकीकडून दुसरीकडे जात राहतो. जाताना सोबत आकांक्षा, स्वप्ने, नैराश्य, वासना, भावना, सवयी आणि यासगळ्या गोष्टी ज्यात बांधलेल्या आहेत ते संस्कृती किंवा परंपरा या नावाचं गाठोडं असतं. त्यात कुठेतरी त्याचा देवसुद्धा असतो.मध्येच कुठेतरी श्रांत होऊन विसावतो. शिदोरी उलगडतो.
' रानबखर '
[ही बखर आहे, इतिहास नाही. पक्षधराने लिहिलेल्या घडल्या गोष्टीचेच हे कवन आहे. स्वत: रानात असताना आणि रानसख्यांवर लिहिली, म्हणून ही रानबखर.]
--------------------------------------------------------