"ज्ञानेश्वर माऊली" अवघ्या महाराष्ट्राला भावार्थदिपिकेच (ज्ञानेश्वरीचेच आणखी एक नाव) ज्ञान देणारे संत. वडिल विठ्ठलपंत कुलकर्णी मुळातच विरक्त लग्नानंतर त्यांनी सन्यास घेतला व काशीला निघून गेले. ज्यावेळी विठ्ठलपंतांच्या गुरुंना ते विवाहित असल्याचे समजले त्यावेळी त्यांनी विठ्ठलपंतांना परत घरी जाण्याचा आदेश दिला. विठ्ठलपंतांनी सुध्दा गुरुआदेशामुळे गृहस्थाश्रमात पुन्हा प्रवेश केला.
आळवणी
तुजविण वाटे । असार संसार । व्यर्थ बडिवार । भोवताली ।।
तुज नाठविता । त्रासले हे मन । व्याकुळले प्राण । तुझ्याविना ।।
सुटू पाहे धीर । भाराभार चिंता । घाला अवचिता । पडिला का ।।
नव्हे अाराणूक । तुजविण देवा । धाव रे केशवा । लागवेगी ।।
धाव धाव अाता । वेगे हात देई । येई लवलाही । ह्रदंतरी ।।
सुखावेल जीव । रूप देखताच । अाळी करी साच । बालकाची ।।
प्रचि - ०१
विसावा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, नवी पेठ येथील विलोभनीय मूर्ती
प्रचि - ०२
बांबू पासून बनवलेली गणेश मूर्ती
प्रचि - ०३
सत्यासत्य
लटिका संसार । गुंतवितो फार । सावलीचा भार । तैसे होय ।।
मृगजळी पूर । भय ते जीवास । साच अविनाश । दिसेचिना ।।
कृपाळुवा तुम्ही । सर्व संत जन । दाखवी निधान । सत्य थोर ।।
दूर होता जाण । दुःस्वप्न भीषण । शांति समाधान । लाभे जीवा ।।
घेता अनुभूती । सत्याचीच सदा । गोंधळूक कदा । होईचिना ।।
निवांत निश्चल । होवोनिया मन । श्रीहरी चरण । चिंतीतसे ।।
ॐ तत् सत् ।।
निधान = ठेवा, खजिना
नमस्ते मित्र मैत्रिणींनो,
ही सकाळची प्रार्थना माझ्या बाबांच्या काकांनी तयार केली आहे.
आम्ही ती अनेक वर्ष घरी म्हणतो. तिचा प्रसार व्हावा हि इच्छा आहे.
प्रभात झाली दिशा उजळल्या रवी उदया आला
या समयासी हे जगदीशा करितो नमनाला || धृ ||
थकुनि भागूनी निजलो असता पाहुनी विश्रांती
आनंदित मज करुनि उठविले देऊनिया स्फूर्ती |
करुनि शोऊच मुख संमार्जन करू नंतर स्नानाला
ईशस्तवना करुनि लागो आपुल्या कामाला || १ ||
नमस्ते मित्र मैत्रिणींनो,
ही संध्याकाळची प्रार्थना माझ्या बाबांच्या काकांनी तयार केली आहे.
आम्ही ती अनेक वर्ष घरी म्हणतो. तिचा प्रसार व्हावा हि इच्छा आहे.
रवी मावळला दिन हा गेला आलो सदनाला
या समयासी हे जगदीशा करितो नमनाला || धृ ||
दिवसा माझी नाना कामे जी जी रे पडली
आनंदाने दुःखाने वा सर्वही ती केली
कायिक वाचिक मानसिक वा कर्मे जी घडली
ती ती देवा प्रेम भराने अर्पी पद कमली || १ ||
नमस्ते मित्र मैत्रिणींनो,
ही कृष्णाची आरती माझ्या बाबांच्या काकांनी तयार केली आहे.
आम्ही ती अनेक वर्ष घरी म्हणतो. तिचा प्रसार व्हावा हि इच्छा आहे.
तुम्हाला आवडल्यास तुम्हीही म्हणू शकता.
जय देव जय देव जय गोपाळा कृष्णा
तव गीतामृत पाने निवते भव तृष्णा || धृ ||
नीती न्याय दयादिक गुण जनी लोपोनि
अधर्म अन्यायाही त्रासली जब अवनी
दुष्टा निर्दालाया तव जगी अवतरुनि
सुष्टा रक्षियले त्वा सत्पक्षा धरुनी || १ ||
नमस्ते मित्र मैत्रिणींनो,
ही गणपतीची आरती माझ्या बाबांच्या काकांनी तयार केली आहे.
आम्ही ती अनेक वर्ष घरी रोज म्हणतो. तिचा प्रसार व्हावा हि इच्छा आहे.
तुम्हाला आवडल्यास तुम्हीही म्हणू शकता.
जय देव जय देव जय ओंकार रूपा
आरती ओवाळिता नुरविशी पापा || धृ ||
विश्वस्वरूपा तुजला स्थापू मी कोठे
आवाहन करू कैसे संमंतपी थाटे
तव निज महिमा आठविता तर्को दधि आटे
पाहुनी अद्भुत शक्ती आदर बहू वाटे || १ ||
आला रे आला बाप्पा आला
दुःख विसरा मनी सुख हे भरा ||
येतोय भेटाया बाप्पा माझा
जल्लोष करा तयारी करा
स्वागत होऊ दे जंगी जरा
प्रसन्न झालाय माहोल सारा ||
कारण आलाय बाप्पा माझा
समई लावा रोषणाई करा
आरतीची वेळ झाली घाई करा ||
हा धागा नाथ सांप्रदायाचा इतिहास,साहित्य,स्वरूप, सिद्धांत, पुजापद्धती तसेच नाथपंथाची महत्वाची स्थाने, नाथपंथीयांचं सामाजिक योगदान,आलेले अनुभव यांच्याबद्दलची चर्चा करण्यासाठी उघडण्यात आला आहे.
[स्पष्ट सुचना- या धाग्यावर वरील गोष्टींची एलर्जी असलेल्यांनी कृपया येऊ नये हि आग्रहाची हात जोडून विनंती. ]