धार्मिक-साहित्य

आरत्यांमध्ये जादाचे शब्द घालून म्हणायची प्रथा कोणी व कधी सुरु केली?

Submitted by Parichit on 19 September, 2018 - 06:05

पुण्यात आल्यापासून गणेशोत्सवात एक गोष्ट अनुभवली आहे. इथे श्री गणेशाची आणि इतर आरत्या थोड्या वेगळ्या पद्धतीने म्हटल्या जातात असे माझे मत आहे. मूळच्या आरती मध्ये काही जादाचे शब्द घातले गेले आहेत. जसे कि उदाहरणार्थ...

जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती
जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा
जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी

देवपूजेतील चांदीची चिकट भांडी कशी स्वच्छ करावीत?

Submitted by sneha1 on 12 September, 2018 - 12:26

नमस्कार.
थोडे आधी विचारायला हवे होते खरे. देवपूजेतील चांदीची चिकट भांडी कशी स्वच्छ करावीत?
धन्यवाद!

गणेश आगमन ....

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 28 August, 2018 - 07:07

दरवर्षी प्रमाणे बाप्पा येतोय... पुढच्या महिन्यात... पण डेकोरेशनच काय? थर्माकॉल बंदी अन नवीन कल्पना सुचत नाहीत... तुम्हाला काय सुचतंय ? स्वस्त आणि मस्त... चटकन उठावदार दिसणारं डेकोरेशन... सुचवा ना ... प्लिज

शब्दखुणा: 

सुखाचा शोध : अवगुणांचा त्याग

Submitted by शिष्योत्तम रामभाऊ on 12 August, 2018 - 12:07

अवगुण म्हणजे काय ?

अवगुण या आसुरी शक्तीं आहेत. शक्ती कोणत्या प्रकारच्या आहेत याबद्दल आपण जाणून घेऊ. पण योग्य वेळी

माध्यमांतर– "एपिक" धर्मक्षेत्र: कर्ण एपिसोड!

Submitted by निमिष_सोनार on 20 July, 2018 - 10:12

प्रस्तावना: एपिक या टीव्ही चॅनलवर धर्मक्षेत्र नावाचा एक कार्यक्रम लागतो. त्यात महाभारतातील सर्व पात्र मृत्यू पावल्यानंतर पाप पुण्याचा हिशोब करण्यासाठी चित्रगुप्तच्या दरबारात येतात आणि एकेका एपिसोडमध्ये एकेका व्यक्तीवर इतर संबंधित व्यक्तींनी लावलेले आरोप चित्रगुप्त वाचून दाखवतात आणि ती व्यक्ती मग त्या आरोपांचे आपल्या कुवतीनुसार खंडन करते आणि मग शेवटी चित्रगुप्त आपला निवाडा देतात. मी येथे टीव्ही ते छापील (लिखित) माध्यम असा बदल म्हणजेच "माध्यमांतर" केले आहे तसेच मूळ एपिसोडची भाषा हिंदी असून त्याचा स्वैर मराठी अनुवाद केला आहे!!

मज विठ्ठल दिसावा ।

Submitted by किंकर on 6 July, 2018 - 00:00

आज शुक्रवार दिनांक ६ जुलै २०१८ . आज अवघा महाराष्ट्र विठ्ठल भक्त्तीत रममाण होण्याचा पहिला दिवस. संत ज्ञानराज माउली आणि संत तुकोबा पालखी सोहळ्याचा शुभारंभ ।
'साथ चल' उपक्रमातून 'पुंडलिक भक्त्ती ' समजून घेण्याचा प्रयत्न . वृध्दाश्रमाच्या सुखसोयी वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यापेक्षा, वृद्धाश्रमांची गरज उरणार नाही असा समाज निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले तर पुंडलिक समजला असे म्हणता येईल .
'वारी ' च्या आगमनाने असे अनेक प्रश्न मनात रुंजी घालू लागले , राजकारणात समाजकारण आणण्याचे ध्येय ठेवीत जेंव्हा सत्ताधारी या सोहळ्याकडे पाहतील तो खरा ' सोनियाचा दिनू '

शब्दखुणा: 

जगन्नाथ

Submitted by सेन्साय on 22 June, 2018 - 06:29

जगन्नाथ
________

नाम आळविता एकतारी
सुर छेड़िता दरबारी
स्वानंद प्रगटला अवतारी
माया विसावली परपारी
कैंचा स्वार्थ कैसी दुनियादारी
अविट लाधता गोडी न्यारी
भक्तिरसाची ही किमया सारी
घडली सहज गोकुळ वारी

जीवात्मा अंगुष्ठमात्र नामधारी
केशव येथ सर्व सूत्रधारी
भोग कर्मफलाच्या आधारी
किड मुंगी वा कोणी जलचरी
सहज पेलवेल ८४ची फेरी
किमया दावी करंगुली सारी
यशदाता माझा जीवन उद्धारी
तो एकमेव गोवर्धन गिरिधारी

― अंबज्ञ

मराठीचा अट्टाहास कशासाठी?

Submitted by कटप्पा on 21 June, 2018 - 23:32

आजच एक धागा पहिला, एका इंग्रजी शब्दाला मराठी शब्द हवा म्हणून.
किल्ली यांच्या धाग्यावरही काही प्रतिसाद वाचले, महाराष्ट्रात लोकांनी मराठी बोलणे कसे महत्वाचे आहे आणि बाकीच्या अमराठी लोकांना मराठी कसे बोलायला भाग पाडले पाहिजे वगैरे वगैरे.
इतका मराठीचा अट्टाहास कशासाठी? मराठी मिश्रित हिंदी किंवा इंग्रजी मिश्रित मराठी बोलणे हे खूप कॉमन आहे आणि आपण याला सपोर्ट केला पाहिजे. निदान यातून आपण मराठी लोक काही इंग्रजी शब्द शिकू तरी.

आपल्याला काय वाटते???????

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - धार्मिक-साहित्य