Submitted by सेन्साय on 22 June, 2018 - 06:29
जगन्नाथ
________
नाम आळविता एकतारी
सुर छेड़िता दरबारी
स्वानंद प्रगटला अवतारी
माया विसावली परपारी
कैंचा स्वार्थ कैसी दुनियादारी
अविट लाधता गोडी न्यारी
भक्तिरसाची ही किमया सारी
घडली सहज गोकुळ वारी
जीवात्मा अंगुष्ठमात्र नामधारी
केशव येथ सर्व सूत्रधारी
भोग कर्मफलाच्या आधारी
किड मुंगी वा कोणी जलचरी
सहज पेलवेल ८४ची फेरी
किमया दावी करंगुली सारी
यशदाता माझा जीवन उद्धारी
तो एकमेव गोवर्धन गिरिधारी
― अंबज्ञ
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुंदर ...
सुंदर ...
धन्यवाद दत्तात्रयजी
धन्यवाद दत्तात्रयजी
सुंदर
सुंदर
मस्त! छान उतरलीय.
मस्त! छान उतरलीय.
आधी मला वाटलं जगन्नाथ मंदिरावरून जे चालू आहे त्याबद्दल लिहिलं आहे. मंदिर, मस्जिद,गुरुद्वारा, चर्च, अग्यारी व अजून जी प्रार्थनास्थळे असतील तिथे त्या जागांचे पावित्र्य राखूनच कुणालाही प्रवेश असावा.... स्त्री/पुरुष, जाती धर्मभेद न राखता. देवाच्या दारात जाण्यापासून कुणाला रोखण्याचा कुणाला काय अधिकार!!!