निसर्ग गटग - राणी बागेत
निसर्गप्रेमी मंडळींनो,
सालाबादाप्रमाणे राणीबागेत वसंताचे आगमन झालेले आहे.
राणीबागेबद्दल पेपरात येऊन धडकणा-या विविध बातम्या वाचल्यास अजुन काही वर्षांत वसंताला राणीबागेचा पत्ता सापडणे कठिण होईल असा रंग दिसतोय. असे कधीही न होवो ही इच्छा मनी धरुन आपण आपल्याला जेवढे जमेल तसे, जेव्हा जमेल तेव्हा राणीबागेतल्या निसर्गाचे दर्शन घेऊया.
तर सालाबादाप्रमाणे आयोजित केलेल्या या उत्सवास भरभरुन हजेरी लावा.