'वृत्तांत लिहायचा प्रयत्न करतो आजचा.'
कुठल्या मुहूर्तावर हे शब्द मुखावाटे निघून जाते झाले कुणास ठाऊक. रचु ने लगेच ते पकडून 'तुला नक्की जमेल' वगैरे म्हटल्याने आत्तापर्यंत हरभर्याच्या झाडावरच होतो. (मायबोलीकरांच्या इरसालपणाची झलक मिळतेच अशी. ) पण गटग झालंच एवढं छान, की त्याबद्दल लिहिलं पाहिजेच. (जे आले नाहीत त्यांना जरा टुकटुक पण करून दाखवता येईल. )
येणार येणार म्हणताना अखेर तो दिवस उजाडला. मी वर्षभर माबोकरांना भेटण्याचे विशेष मनावर घेतले नव्हते. (तरी ठमादेवी घरी येऊन टपकलीच होती. :फिदी:) आता एक वर्ष झालं, प्रस्थापित मायबोलीकर होण्याच्या प्रोसेस मधला एक ठळक टप्पा गाठला आणि मनाशी ठरवतच होते की आता मायबोलीकरांना भेटलं पाहिजे. तर एक दिवस दिनेशदांची मेल आली. ते भारतात येणार होते आणि जागूकडे काही जण जमणार होते. दिनेशदांचं आमंत्रण, जागूसारख्या सुगरणबाईकडे जेवण आणि माझी वर्षपूर्ती असा सगळा योग एकत्र जुळून आला नि आमचं घोडं एकदाचं मायबोलीच्या गंगेत न्हायला तयार झालं.
बारात राहाणारे मायबोलीकर गटग करण्यात नेहेमी उत्साही असतात या परंपरेला जागून बाराचाच एक भाग असलेल्या जर्सी सिटीत रहाणार्या माबोकरांनी गुपचुप एक गटग ठरवून ते झटपट साजरे केले हे कळवताना आम्हांस अत्यंत आनंद होत आहे!
खरे तर या गटगचा महावृत्तांत लिहिण्याचे आम्ही मनावर घेतले होते, परंतु, काही अपरिहार्य कारणामुळे पदार्थांचे प्रचि आणि थोडंसंच वर्णन यावर हा वृत्तांत आम्ही आवरता घेत आहोत.
माझी तर एवेएठि च्या आधी पासून तारंबळ ऊडाली होती. झक्कींची खास योजना होती २५ तारखेला बारा हून फिली ला जाताना वाटेत सुमा फुड्स मधून उकडीचे मोदक घ्यायचे. मुख्य म्हणजे कोणी विचारलं तर त्यांना " फचिन आणि टण्या ह्यांच्याकरता मुली सांगून आल्या आहेत आणि त्यांना भेटून आपण पुढे प्रस्थान करणार आहोत" असं ते सांगणार होते. कोणाला आजिबात काहीच सांगू नका असा दम पण भरला मला. आता घ्या! मी आपलं ह्या कार्यक्रमामुळे उशीर होईल म्हणुन हळूच पोस्टींमधून , जरा लवकरच निघूयात का असं आडून आडून सुचवत होतो.
बारा गटगत काढलेली काही प्रकाशचित्रे. वृत्तांत लिहायचा होता पण मधेच ताट कलंडलं त्यामुळे वृत्तांत अर्धवट राहिला.
देसाईंचं "काहितरी" आणि भाईंचं सी फूड : दोन्ही अप्रतिम होते !!
सायोची भरली वांगी आणि बाईंची अंबाडीची भाजी.. चिकन आणि सी फूड असल्याने मी त्याकडे वहावत गेलो आणि ह्या भाज्या अगदी एकच घास खाल्ल्या..
सिंडीने आणलेल्या जिलब्या..
आज दि. १८ मे २०१० रोजी टोपीमिथुन च्या म२ (म stands for मुंबई) हापिसात "निंबुडा भेट (मिनी) गटग" संपन्न जाहले. त्याचा हा मिनी-वृत्तांत. हा गटग आयत्या वेळी ठरविण्यात आल्याने आणि टोपीमिथुनकरांसाठीच असल्याने बाहेरील लोकांच्या दारात रिक्षा फिरविण्यात आलेली नव्हती. परंतु टोपीमिथुनकरां व्यतिरिक्तच्या लोकांना टुकटुक करणे हा उद्देश साध्य करण्यासाठी या वृ. ची रिक्षा दारोदार, गल्लोगल्ली फिरविण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. (आधीच आपलं intention clear केलेलं बरं! नाहीतर कोपर्यातून कुणीतरी बोंब मारायचं की आम्हाला बोलावलं नव्हतं तर वृ. चा घाट कशासाठी! )
तारिख - २६ मे २०१० - संध्याकाळी ७.००वाजता
ठिकाण - बनाना लीफ रेस्टॉरंट, मिलपिटस
कारण - जिटीजी आहे कारणे काय विचारता आँ!!!
आता विचारलेच आहे म्हणून सांगते - सुनिधीला भेटण्यानिमित्त आहे हे जीटीजी
तारिख - ३० मे २०१० - सकाळी ११.०० वाजता
ठिकाण - माझे घर
कारण - माननिय झारा आणि अॅडमिन यांच्याशी गप्पा मारण्याप्रित्यर्थ