आज दि. १८ मे २०१० रोजी टोपीमिथुन च्या म२ (म stands for मुंबई) हापिसात "निंबुडा भेट (मिनी) गटग" संपन्न जाहले. त्याचा हा मिनी-वृत्तांत. हा गटग आयत्या वेळी ठरविण्यात आल्याने आणि टोपीमिथुनकरांसाठीच असल्याने बाहेरील लोकांच्या दारात रिक्षा फिरविण्यात आलेली नव्हती. परंतु टोपीमिथुनकरां व्यतिरिक्तच्या लोकांना टुकटुक करणे हा उद्देश साध्य करण्यासाठी या वृ. ची रिक्षा दारोदार, गल्लोगल्ली फिरविण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. (आधीच आपलं intention clear केलेलं बरं! नाहीतर कोपर्यातून कुणीतरी बोंब मारायचं की आम्हाला बोलावलं नव्हतं तर वृ. चा घाट कशासाठी!
)
तर या वृ. चे तपशील येणेप्रमाणे:
Organiser:
निंबुडा (अर्थात दस्तुरखुद्द)
Invitees:
किरु (किर'किर्या')
जाईजुई (कोण रे ते म्हणतंय जाडीजुडी? )
Attendees:
निंबुडा
किरु
जाजु
विजयश्री (हा आयडी अजून रोमात आहे. जाजुच्या सौजन्यामुळे आमची आयत्या वेळी हिच्याशी ओळख झाली.)
वेळः
दु. ४ ते ५
ठिकाण:
म१ चे canteen आणि म२ हापिस
आणि आता actual वृ. (sequence of events):
1) ३:३५ च्या अंतर्गत यातायात सेवेने (internal shuttle service - ISS) अस्मादिकांचे म३ (माझी कर्मभूमी) वरून म१ (किरुची कर्मभूमी) ला प्रयाण. ४ ते ४:३० निंबुडा व किरु यांची एकमेकांना ओळख परेड व चहापान कार्यक्रम. तसेच निंबुडा व शैलजा (बेंगलोरस्थित माबोकरीण) यांचा cell phone वर वार्तालाप
इथे काचेच्या भिंतीतून पलीकडे दिसणार्या एका ट्रकवर बहुतेक पंजाबीमध्ये काहितरी लिहिले होते. पण मी गटग च्या धुंदीत असल्याने मला ते "गटग" लिहिले असल्यासारखे वाटले. हे पहा:
२) ४:३५ च्या ISS ने निंबुडा व किरु यांचे म२ ऑफिसला प्रयाण व जाजुची मीटिंग संपण्याची प्रतीक्षा !
३) जाजुच्या आगमनानंतर (मीटिंगमधून मागच्या दाराने पलायन ) जाजु व निंबुडा यांची एकमेकांना ओळख परेड व विजयश्री या नव्या माबोकरणीचे जाजुकडून introduction.
४) विजयश्री च्या सौजन्याने गटग चा फोटु काढला आहे. हा पहा:
(किरु = गोपींयोंके बीच कन्हैया ! )
इथे आम्हां दोघींच्या बोटांमध्ये अल्पेंलीबे आहे जे मी आमच्या नवीन मैत्रीसाठी गटगच्या attendees साठी घेऊन गेले होते. (टोपीमिथुन मध्ये हे प्रत्येक हापिसाच्या रिसेप्शन वर फुकट मिळते म्हणून !) किरुच्या बोटांत ते दिसत नाहिये कारण ते त्याच्या पोटात आहे
५) फोटो सेशन नंतर एकमेकांच्या contact numbers चे आदान-प्रदान
६) ५:०५ च्या iss ने किरु व निंबुडा यांचे आपापल्या कर्मभूमीकडे पुनश्च प्रयाण.
अशा रितीने हे short n sweet गटग सुफल संपूर्ण!
पुन्हा एकदा बाकीच्यांना टुकटुक!
*टुकटुक अशा करीता की आम्ही टोपीमिथुनकर आता यापुढे आमच्या internal गटग करीता रविवार वर अवलंबून नाही. मनात येईल तेव्हा आमचे आमचे special गटग आम्ही इथेच arrange करु शकतो. lunch ला एकत्र येऊ शकतो. weekdays मध्येही एकमेकांना भेटु शकतो. पुन्हा एकदा जोरदार टुकटुक!!!! *
माबोवर अजून कोणी टोपीमिथुनकर असतील (रोमात असलेले/नसलेले) त्यांनी पुढे या आणि इतरांना टुकटुक करण्यात हातभार लावा असे आमच्यातर्फे आवाहन
टोपीमिथून.. (बाराकरांसारखं
टोपीमिथून..
(बाराकरांसारखं केलंत...)
हा हा हा हा... मागच्या
हा हा हा हा... मागच्या महिण्यापर्यंत मी पण टोपीमिथूनकर होतो की राव. तेव्हा नाही दिसलात तुम्ही कोणी. हां..तसा म१, म२ म३, म४ अशा कुठल्याही ठिकाणी नव्हतो. तर्.....ऐरोली झिंदाबाद!
आता पुण्याचा टोपीमिथूनकर होता येतंय का ते बघतोय!
फोटोत डावीकडून १ल्या आणि
फोटोत डावीकडून १ल्या आणि उजवीकडून २र्या प्राण्यांची नावे कळतील काय?


तुमची कंपनी डाईंडा हा झी टीव्ही वरील शो प्रायोजीत करते का? बर्याच वेळा टोपी घातलेला मिथुन दिसतो त्याच्यात
अरे हा किरु आहे का ? मला
अरे हा किरु आहे का ? मला वाटलं कोणी मद्राशी अण्णा आहे
निंबुडे, मजा आहे ग
निंबुडे, मजा आहे ग तुमची...
बादवे एक भा प्र... हे टोपीमिथुन काय प्रकरण आहे???
किरुभाऊ, सुकलायस रे.... एमु जाच करतात का रे खुप???
लाजो , इमु किरुचा जाच काय
लाजो , इमु किरुचा जाच काय म्हणुन करतात , किरु ने इमुची अंडी लांबवली का ?
मजा आहे.. मस्त एकदम कुणी
मजा आहे.. मस्त एकदम

कुणी कुणाला घातल्या टोप्या ?
किरुभाऊ, सुकलायस रे >> लाजो, तू प्रत्येकाचा फोटु पाहिल्यावर हेच म्हणतेस का ?

किर्या, सुकु नकोस.. लढ, झगढ आगे बढ
टोपीमिथुन काय प्रकरण आहे???
टोपीमिथुन काय प्रकरण आहे??? >>> त्यांच्या कंपनी चे नाव आहे..(टोपी +मिथुन)
श्री आता अण्णापण मद्रासी,
श्री आता अण्णापण मद्रासी, पंजाबी, नेपाळी, काश्मिरी फ्लेवर्समध्ये मिळायला लागले कॉय ?
किर्या, आर्याच्या नावाखाली चॉकलेटं घेतोस आणि बोटातून ओठात आणि ओठातून पोटात ढकलतोस ? कुफेहेपा ?
लाजो, तू प्रत्येकाचा फोटु
लाजो, तू प्रत्येकाचा फोटु पाहिल्यावर हेच म्हणतेस का ?<<< केद्या, आता सुकाणुंना सुकले च म्हणार ना... आमच्यासारखे गटाणुंना कस म्हण्णणार
लाजो, हे सुकाणू / गटाणू कोण ?
लाजो, हे सुकाणू / गटाणू कोण ? जीवाणू, विषाणूंचे भाउ ?
अम्या, केद्या सुकाणु आणि तु
अम्या, केद्या सुकाणु आणि तु गटाणु.... जीवाणु आणि विषाणुंना मी ओळखत नाय.... जरा इंट्रो देशिल का???
लाजो, वरचा फोटो बघ की आणखीन
लाजो, वरचा फोटो बघ की आणखीन इंट्रो कशाला मागतीये
बर मग सांग यातली कोण जी आणि
बर मग सांग यातली कोण जी आणि कोण वि???? नि आणि जाजु
घ्या 
>>फोटोत डावीकडून १ल्या आणि
>>फोटोत डावीकडून १ल्या आणि उजवीकडून २र्या प्राण्यांची नावे कळतील काय? <<
ते तुम्ही ओळखावं अशी अपेक्षा आहे
सही आहे!
सही आहे!
सही हैं छोटासा गटग अन छोटासा
सही हैं छोटासा गटग अन छोटासा वृंतात विथ बिग इमेजेस
निंबुडे मज्जाए बॉ
निंबुडे मज्जाए बॉ टिपीमिथुनकरांची. किरू सांभाळ रे तुला कान्हा म्हंटलय म्हणजे आगामी सगळ्या लंच ब्रंच गटगत तुझच पाकिट रिकाम होणार
निंबुडे हाय हाय तुझ्या टुकटुक ने मला परत एकदा रविवरच्या गटगतल्या आंबाकढी, नाकार्ड, आमरस नी मभा नी पांशाची आठवण झाली

मज्जाय बुवा ! चिंगे, तू पण
मज्जाय बुवा ! चिंगे, तू पण कॅपजेमिनीमधे आहेस?
किर्या (आपला कन्हैय्या) गायींच्या ऐवजी इमु पाळतो त्यामुळे त्याचे नाव गोपाल ऐवजी इमुपाल.
चिंगी नाहीये केपजेमिनीमध्ये,
चिंगी नाहीये केपजेमिनीमध्ये, तिथे ती फक्त फोटो काढायला जाते. हो कि नाई गं ?
तू पण कॅपजेमिनीमधे आहेस?? बोल
तू पण कॅपजेमिनीमधे आहेस?? बोल बोल.......
ही चिंगी पण ठाणेकरीण आहे
ही चिंगी पण ठाणेकरीण आहे अम्या.
(किरु = गोपींयोंके बीच
(किरु = गोपींयोंके बीच कन्हैया !>>>>>
नाय काय ... किरू किनै दादा आहे फक्त त्याच्या ताईचा, हो किनै रे किरू?

बाकी निंबुडे, तुम्हा दोघींच्या मध्ये बर्यापैकी केविलवाणा दिसतोय आमचा किर्या !
<केविलवाणा दिसतोय आमचा
<केविलवाणा दिसतोय आमचा किर्या >
हा हा : हाहा:
कसला केविलवाणा!! म१ च्या canteen मध्ये याचं म्हणे एक favourite टेबल आहे. तिथेच कायम बसतो म्हणे मी. म्हणे तिथून पावसाळ्यात बाहेरचा नजारा फार छान दिसतो............ देव जाणे कसले कसले नजारे बघत बसतो..
आणि म्हणे केविलवाणा !!
इमुपाल. >>> तरीच म्हणतो किरु
इमुपाल. >>>
तरीच म्हणतो किरु टोप्या लावण्यात पटाईत कसा... कॅपजेमीनीची कृपा... :p
निंबुडा... जल्ला वृत्तांत झकास :d
देव जाणे कसले कसले नजारे बघत बसतो.. आणि म्हणे केविलवाणा !! >>> खरयं निंबुडा.... त्याला पावसात भिजणारे केविलवाणे नजारेच जास्त आवडतात :d
निं.जा. किरु वॄतांत....मस्त
निं.जा. किरु वॄतांत....मस्त
ते त्या ट्रक वर पंजाबी मध्ये
ते त्या ट्रक वर पंजाबी मध्ये काय लिहिलंय माहीत करून घ्या ना कुणीतरी ........

कुणाचातरी पापे friend असेलच ना
अरे वा छानच झाला की मिनी गटग
अरे वा छानच झाला की मिनी गटग
ही विजयश्री कोण?? तिचा फोटू नाय काढला का?
निंबे..
निंबे..
>ही विजयश्री कोण?? तिचा फोटू
>ही विजयश्री कोण?? तिचा फोटू नाय काढला का? <
अगं ती रोमात आहे ना ......... तिला बिचारीला इटलीत इतरत्र पण बघण्यासारखं बरंच आहे असं वाटत नसावं अजून....... ते पटलं की आपणहून येईल ती समोर......... तो पर्यंत ती फोटोच्या मागे
Pages