आमचं मुंबई गटग

Submitted by कविता१९७८ on 6 October, 2014 - 07:35

गृपवर बोलता बोलता आम्हीही गटग करायचे ठरवले, पुणेकरांना जमण्यासारखे नव्हते पण अर्जिता पुण्याहुन माहेरी येणार होती दसर्‍याच्या निमित्ताने म्हणुन आम्ही रविवारी ५ ऑक्टोबरला गटग करण्याचे ठरवले, पण मुंबईत कुठे भेटायचे यावर चर्चा झाल्या , दादरला भेटायचे ठरले, मामीने दादर ईस्ट ला ग्रेट पंजाबचे नाव सुचवले, शेवटपर्यंत कोण कोण येणार हे नक्की नव्हते पण जवळपास ८-१० जणी तयार झाल्या. हळहळु गटगचा दिवस जवळ आला तश्या बर्‍याच जणी वैयक्तीक अडचणींमुळे येउ शकल्या नाहीत आणी आम्ही ५ जणी ज्या गटगला नक्की जमणार होतो त्यांनी १२ वाजता भेटण्याचे ठरवले. मी लांब राहत असल्याने आणी इथल्या ट्रेनच्या वेळापत्रकानुसार मी ११ वाजता पोहोचणार होते म्हणुन राखी ही लवकर येउन आम्ही दादर पश्चिम ला खरेदि करणार होतो.

मी सकाळी ८.३५ ची ट्रेन पकडली विरारला उतरुन चर्चगेट लोकल पकडुन १०.४५ ला दादरला पोहोचले. राखी ला थोडा उशिर झाला . फोटो पाहिले असल्याने ओळखायला सोप्पे गेले, आम्ही शॉपिंग केली मग फुलबाजारात जाउन बाकींच्या मैत्रीणींसाठी फुले घेतली. आणि भर उन्हात ग्रेट पंजाबला पोहोचलो. राखी आणि मी रस्ताभर गप्पा मारत चाललो होतो. छान वाटली, राखीने फोन करुन आधीच ग्रेट पंजाबला बुकींग करुन ठेवली होती. आम्ही पोहोचण्याआधीच अर्जिता तिथे पोहोचली होती. आम्ही तिघी आत जाउन विसावलो, बाहेर खुप उन असल्याने गेल्या गेल्या आम्ही फ्रेश लाईम सोडा ओर्डर केला , तिथपर्यंत वेल ने फोन करुन सांगितले की ५ मिनिटात पोहोचतो त्याप्रमाणे वेल तिचं पिल्लु आणी मृण्मयी आल्या. मग फुलांची देवाणघेवाण झाली आणि आमच्या गप्पा सुरु झाल्या, सगळ्या एकदम डाउन टु अर्थ होत्या , आत एक आणि बाहेर एक असं बोलताना अज्जिबात जाणवलं नाही. अगदी मनमोकळे पणाने गप्पा मारत होतो वाटलेच नाही की आम्ही पहिल्यांदा भेटतोय. वेल ने स्वतः बनवलेले दागिने दाखवायला आणले होते, खुपच सुंदर होते , तिने मायबोलीवर स्वतंत्र धागा उघडलाय पण फोटो आणि प्रत्यक्ष पाहणे यात खरच बराच फरक असतो, रंगसंगती खुपच सुंदर होती. वेलचं पिल्लु अभिज्ञ तर खुप मस्त , आमचे फोटो काढत होता आणि ते ही एखाद्या प्रोफेशनल फोटोग्राफर प्रमाणे, आमच्या गप्पाच इतक्या सुरु होत्या की जास्त फोटो काढले गेले नाही. मृण्मयीला तिथुनच ऑफीसला जायचे होते, तिच्या कामाबद्द्ल चर्चा झाल्या, वेल ने तिच्या लडाख ट्रीपच्या गमती जमती शेअर केल्या. तिला सांगितले बाई आतातरी आधुनिक सीतेची कथा पुर्ण कर पण बिचारी सध्या खुप बिझि असल्याने लवकरच करेन असं म्हणाली.

जेवणात दोघी शाकाहारी आणी तिघी पक्क्या मांसाहारी होत्या. शाकाहारींसाठी स्टार्टर कॉर्न चीज बॉल्स मागवले गेले जे आम्ही मांसाहार्‍यांनीही टेस्ट केले आणि मांसाहारींसाठी चिकन सीख कबाब मागवले गेले , आमची ते शाकाहार्‍यांबरोबर शेअर करण्यात काहीच हरकत नव्हती पण त्यांनीच नाही खाल्ले :-P. मग आम्ही मेन कोर्स ऑर्डर केला , शाकाहारींसाठी पनीर मखनी , रोटी आणि मांसाहारीसाठी ग्रेट पंजाब स्पेशल पेपर चिकन. दोघांची चव अप्रतिम होती, तेवढयात मृण्मयीची ऑफीसला जाण्याची वेळ झाली. जोडीला आम्ही दाल फ्राय आणी जिरा राईस ऑर्डर केले शाकाहार्‍यांना कंपनी द्यायला नको का? Proud शेवटी आम्ही परत एकदा पाँफ्रेट फीश फींगर मागवले आणि मन इच्छा पुर्ण करुन घेतली.

तोपर्यंत २.३० वाजले. अर्जिताला बोरीवलीला जाउन लागलीच पुण्याला परतायचे होते आणी मला ही चर्चगेट डहाणुरोड ट्रेन पकडायची होती ज्यामुळे मला २ ट्रेन बदलाव्या लागणार नव्हत्या, अखेरीस हॉटेलचे बिल चुकते करुन बाहेर पडलो. पुढचे गटग डहाणुला करण्याचे ठरवले , सुंदर आणी शांत समुद्र किनारा, खायला भरपुर ताजे मासे , अवतीभवती वाडीचा परीसर हे ऐकल्यावर सगळ्या लगेचच तयार झाल्या. राखी वेल बरोबर गाडीत गेली तर मी आणी अर्जिताने चालत स्टेशन गाठले पुन्हा रस्ताभर गप्पा झाल्या. खुपच मजा केली सर्वांनी , आता फिरण्यासाठी आणि गटग साठी आम्ही पाचजणी तर एकदम फिक्स झालो आहोत. लगेहाथ एकदा पुण्यालाही पिकनिक ला जाण्याचे ठरवले पाहुयात कसं जमतंय ते.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ये ब्बात.. मस्तच कवे..
मलाही तुम्हा सर्वांना भेटुन खुप आनंद झाला..
नंतर मी जराशी शॉपिंग केली आणि घरी गेले. खुप गप्पा आणि खादाडी झाली हे मात्र नक्की.
पुन्हा भेटुच्च... Happy

डहाणुनुहुन गटगला?? काही टांगारुंना तुमच्यापासुन काही प्रेरणा घेता आली तरे बरं. >> look who's talking Proud

असो, कविता आणि इतर मैत्रिणी, मस्तच मज्जा केलीत की, पुण्याला या एकदा. इथे भेटून धमाल करू. Happy

केपी .....माझ्या आवडत्या स्मायल्या तुला.... डिसेंबर जानेवारीत तुम्हाला ठाणे गटग कराअयचय.... विसरु नका

मनापासुन सॉरी.
चिरंजीवांनी काहीतरी पोटदुखीची भानगड काढली. आणि हाsssssss पसारा काढला होता.
कविता, धन्य तुझी.
लवकरच भेटीचे योग असोत.