सायकल राईड - २
पहिल्या राईड नंतर अनेक जणांनी विचारणा केली की दुसरी राईड कधी? तर घेऊन येत आहोत. दुसरी राईड. हा पेपर थोडा(साच) अवघड आहे. एक छोट्टासा घाट मध्ये आहे. :)
ता २३ फेब.
दिवस रविवार
वेळ : सकाळी साडेसहा (परत :) )
ठिकाण : थोडे अवघड पण तरीही जमेल असेच.
चांदणी चौक ( चौकाकडे जाणार्या रस्त्यावर पण बायपास वरच थांबायचे.)
राईड १ - चांदणी चौक ते पिरंगुट. ( चौक ते पिंरगुट १२ किमी)
राईड २ - पिरंगुट ते आनंदगाव (ज्यांना समोर जायचे त्यांच्यासाठी) पुढे ८ ते ९ एक किमी.
एकुण अंतर (चांदणी चौकापासून ) २१-२२ किमी वन वे.
जी लोकं कोथरूड / सिंहगड रोड वर राहतात त्यांना टोटल ५० किमी होईल. (घर टू घर) पण निदान पिरंगुट तरी गाठता येईल. चौक ते पिरंगुट १२ किमी आहे. म्हणजे घर टू घर कदाचित मॅक्स ३५ पर्यंत होईल.
https://www.google.com/maps/dir/Chandani+Chowk,+Bhusari+Colony,+Bavdhan,+Pune,+Maharashtra,+India/Pirangut,+Maharashtra,+India/18.4595721,73.6314708/@18.4844249,73.627728,12z/data=!4m15!4m14!1m5!1m1!1s0x3bc2be45a9bc2ecf:0x9a674987afed2d85!2m2!1d73.7794093!2d18.506527!1m5!1m1!1s0x3bc2bd1bdecd4c57:0x6f5e3d0d8388ed13!2m2!1d73.680485!2d18.511439!1m0!3e0
ह्या रस्त्यावरच आपला एक मायबोलीकर मार्च मध्ये ट्रायलथॉन करणार आहे. तेंव्हा हा रस्त्याची त्याला सवय व्हावी म्हणून हा रस्ता घेतला आहे. जर अवघड वाटत असेल तर मागच्या वेळे सारखे ऑपश्न द्या. आणि नाव नोंदवा म्हणजे राईड करायची की नाही हे ठरवता येईल.
मी येणार
मी येणार
खूपच मस्त रस्ता आहे. कालच
खूपच मस्त रस्ता आहे. कालच ह्या मार्गावर गेलो होतो.
त्यावेळी मानस रिसॉर्ट जवळ पाहिलेला चंद्रास्त
आणि सुर्योदय
माझे रविवारी सकाळी ८ ला
माझे रविवारी सकाळी ८ ला बॅडमिंटन असते. दरवेळी ते बुडवु शकत नाही.
केदार यांचा कुणा ऑर्थोपेडीकशी
केदार यांचा कुणा ऑर्थोपेडीकशी घनिष्ठ व्यावसायिक संबंध असावा अशी मला दाट शंका येत आहे
असो शुभेच्छा.एक सूचना, एखाद्या झाडाची रोपे बरोबर न्या व योग्य जागी ,पाणथळ, तग धरेल अशा ठीकाणी लावा.थोडा ग्रीन इफेक्ट तुमच्या राईडला ...पुढच्या वेळेस तिथे राईड काढल्यावर प्रयोग सक्सेस झाला का ते बघा.. सामाजिक वनीकरण विभागातर्फे अनेक झाडांची रोपे मोफत मिळतात. संपर्क साधल्यास फायदा होइल.
मला शनिवारी चालेल. सर्वांना
मला शनिवारी चालेल. सर्वांना चालत असेल तर आपण शनिवारी जाऊ.
मी येतोय.. शनिवार किंवा
मी येतोय.. शनिवार किंवा रविवार दोन्ही दिवस जमण्यासारखे आहेत..
अरे वा दुसर्या गटगची घोषणा
अरे वा दुसर्या गटगची घोषणा झाली सुद्धा. मध्ये ४-५ दिवस आहेत तेव्हा वेळेची सबब न सांगता हेल्मेटी विकत घ्या. सर्वांना शुभेच्छा!!!
मस्तच. येणार नक्की. येताना
मस्तच. येणार नक्की. येताना रोपे आणायची आहेत का?
मला पण शनिवारच चालणार
मला पण शनिवारच चालणार आहे...रविवार जमणार नाही....
माझं दोन्ही दिवशी
माझं दोन्ही दिवशी टेंटेटिव्ह.. ऐनवेळी सांगेन..
अरेवा दुसरी सायकल राईड.
अरेवा दुसरी सायकल राईड. शुभेच्छा सर्वांना.
हर्पेन, दोन्ही फोटो झकास.
अरे वा!! .. शुभेच्छा!!
अरे वा!! .. शुभेच्छा!!
या वेळी माझा पास.
या वेळी माझा पास.
मी इतकी लांब नाही येऊ शकणार,
मी इतकी लांब नाही येऊ शकणार, नवर्याला सांगते, शनिवार / रविवार नक्की झालं का ?
चला तर मग भेटू उद्या. हायवे
चला तर मग भेटू उद्या. हायवे वरच उभे राहा.
होय महाराजा
होय महाराजा
१२ वाजेपर्येंत परत येता ये ईल
१२ वाजेपर्येंत परत येता ये ईल का ?
सायकल राईड बरोबर वनभोजन,किंवा चमचमीत नाष्ट्याचे आयोजन असावे.
मला यावेळेसही जमणार नाही
मला यावेळेसही जमणार नाही उद्याचा आख्खा दिवस भरगच्च कार्यक्रम आहेत अन सुटकाच नाही त्यातुन.
बाकी जाणार्यांना शुभेच्छा, कडेकडेने सायकली चालवा, जमल्यास सायकलीलाही मागिल बघायचा आरसा असू द्यावात. पूर्वी माझ्या सायकललाही आरसा असायचाच.
इतकेच नव्हे तर मी माझ्या गॉगलला एक गोल आरसा अशाप्रकारे बसवला होता की नजर उजवी कडे केली की त्या बारकुशा आरशात मागले दिसायचे तेव्हा फोटो काढणे सोपे नव्हते त्यामुळे त्याचा फोटो नाही, ती वस्तुही नाही, पण आता पुन्हा करीन म्हणतो. परदेशात तसे गॉगल तयार मिळत असतीलही. मी अशाच पेपरात आलेल्या एका फोटोप्रमाणे ते केले होते.
सायकलस्वारांना शुभेच्छा ....
सायकलस्वारांना शुभेच्छा ....
चौक ते पिरंगूट ठिक वाटते,
चौक ते पिरंगूट ठिक वाटते, जाताना ब-यापैकी उतार असल्याने आरामात जाता येइल पण येताना स्पीड कमी
होईल , शिवाय इतर कामेही आहेतच , फायनली भेटू आणि ठरवू ठिक ६.३० वा.
येतोय नक्की माझ्यासाठी
येतोय नक्की
माझ्यासाठी थाम्बा
सिह्गड रोड ते चान्द्णी चोक येइपर्यन्त कदाचित वेळ लागेल ६.२५लाच पोचतो
मज्जा करा लोकहो.. ह्या वेळेस
मज्जा करा लोकहो.. ह्या वेळेस जमणार नाही यायला..
शुभेच्छा. कुठवर पोहोचलात,
शुभेच्छा.
कुठवर पोहोचलात, वृत्तान्त आणि फोटो येऊ द्यात...
राईड मस्त झाली. हर्पेन,
राईड मस्त झाली. हर्पेन, पिंगू आणि अस्मादिक असे मायबोलीकर आणि हर्पेनचा मित्र पुष्कर असे आम्ही चौघे गेलो.
ह्या राईडची वैशिष्ट्ये
१. १००% हेल्मेटधारी मायबोलीकर.
२. रस्त्यात दोन मोठे घाट होते. मुठा आणि पिरंगुट.
३. हा सर्व रस्ता चढ उताराचा होता. त्यामुळे माऊंटेन बाईकिंगचा अनुभव सर्वांना मिळाला.
४. मागच्या राईडच्या पाचवीतल्या पेपर नंतर अचानक १२ वी चा पेपर सर्वांनी दिला.
एलेव्हेशन गेन बघा. जे टॉप दोन दिसत आहेत पैकी पहिला मुठा आणि दुसरा पिरंगुट घाट. आणि इतर सर्व अनेक चढ जस मानस रिसॉर्टचा चढ, भुगाव आणि भुकुमचा चढ वगैरे वगैरे
वरच्या पिक्चर मध्ये खाली असलेली लाईन की किमीची आहे आणि कुठल्या किमीला ते चढ लागले ते पण दिसतील. अर्थात माझी राईड ही इतरांच्या पेक्षा बरीच जास्त झाली.
माझी आजची स्पिड. - प्रचंड चढ असल्यामुळे ह्या चित्रात मस्त अप्स आणि डाऊन दिसतील.
ओव्हरऑल हॅपी. अ सन्डे वेल स्पेन्ट सो फार. आजची अचिव्हमेंट - सलग दोन घाट चढू शकतो हा आत्मविश्वास आणि काही वेळ ५० किमी पेक्षा जास्त स्पिड.
बाकी वृत्तांत - ओव्हर टू हर्पेन आणि पिंगू.
अभिनंदन.
अभिनंदन.
majha khup hiramod jhala...
majha khup hiramod jhala... sagale prayatna karunahi!!
माझी पहिलीवाहिली सायकल राईड
माझी पहिलीवाहिली सायकल राईड एकदम झकास पार पडली.सकाळी ६:०५ ला मी चांदणी चौकात डेरेदाखल झालो होतो आणि पहिले मला भेटले ते जंबो. त्यांनी डहाणूकर पासून सायकल रिक्षात घालून आणली होती.
त्यानंतर ६:३० वाजता केदारचे आगमन झाले. हर्पेनला यायला उशीर झाला पण तोवर आम्ही एकमेकांची थोडीफार तोंडओळख करुन घेतली. कारण मी तर सर्वांना प्रथमच भेटत होतो.
केदारने जंबोंची अवस्था बघून त्यांना परतायचा सल्ला दिला आणि तोही योग्यच होता. कारण सायकल चालवताना पायात गोळे येणे म्ह्णजे धोक्याचा सिग्नल होता.
हर्पेन आल्यावर जंबोनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि ते घरी जाण्यासाठी परतले.
सकाळी ७:०० वाजता आम्ही राईडला सुरुवात केली. केदार आणि हर्पेन पुढे गेले. मी माझी अवजड माऊंटन बाइअक चालवत कसातरी पुढे जात होतो. मानस रिसॉर्टच्या चढावर मात्र मी अर्धा चढ वर गेलो आणि अर्धा चढ चालतच पार केला.
त्या चढाच्या पुढेच केदार आणि हर्पेन पुढे थांबले होते. तिथेच हर्पेनचा एक हौशी मित्रपण आम्हाला येऊन मिळाला आणि नंतर समजले की तो सुद्धा या राईडचाच एक भाग होता.
तिथून आम्ही निघालो, ते पिरंगुटचा घाट जिथे सुरु होतो, तिथे थांबलो आणि तिथून माँट वर्ट सिटीच्या रस्त्याने उतरुन मुठा घाटावर गेलो.
तिथे उतरुन फोटो काढून घेतले आणि पुन्हा यू टर्न घेऊन खाली पिरंगुटमध्ये पोचलो. मुठा घाट चढताना मी आणि पुष्कर घायकुतीला आलो होतो. तोच घाट उतरताना मात्र ५० च्या स्पीडने फक्त अडीच मिनिटांमध्ये ४ किमी पार केले..
पिरंगुटमध्ये उतरुन गरमागरम भजी, वडापाव, इडली सांबर आणि चहाचा आस्वाद घेतला. तिथे थोडा वेळ थांबून गप्पाटप्पा केल्या..
अंमळ विश्रांती घेतल्यानंतर तिथून परतीच्या प्रवासाला निघालो. तोच सुरुवातीला पिरंगुट घाट तब्बल अडीच किमी चढायचा होता. पुन्हा एकदा मी आणि पुष्करने जेमतेम अर्धा घाट सायकलवर आणि उरलेला घाट चालत पुर्ण केला.
वर केदार आणि हर्पेन आमची वाटच बघत बसले होते. तिथे पुन्हा आम्ही थोडा वेळ बसून विश्रांती घेतली आणि जरा जास्तच खाल्ल्याबद्दल एक छोटासा परिसंवाद झाला.
तिथून मात्र कुठेही न थांबता आम्ही चांदणी चौकाच्या अलिकडे विनाथांबा पोचलो आणि तिथून एकमेकांना निरोप देऊन आपापल्या घरी निघालो..
ओव्हर टु हर्पेन..
सई - हिरमुसण्याचे काहीच कारण
सई - हिरमुसण्याचे काहीच कारण नाही. अजून अनेक सायकल गट्गं होतील आणि तू न थांबता सगळे अंतर पुर्ण करशील. आता काय बुवा नवीन सायकल आहे एका माणसाकडे
पिंगू, अरे मी, चांदणी चौकानंतर पुढे पौड फाट्याच्या अलिकडे तुझी वाट बघत थांबलो होतो, मला पुष़्कर दिसला आणि तू मागेच आहेस म्हणाला पण बराच वेळ वाट बघूनही तू न आल्याने मी शेवटी निघून गेलो.
हर्पेन, मी नंतर आरामात सायकल
हर्पेन, मी नंतर आरामात सायकल चालवत घरी गेलो. मला वाटले की तुम्ही लोक पुढे गेला असाल..
माझी नवी सायकल आदल्या रात्रीच
माझी नवी सायकल आदल्या रात्रीच आली आणि काहीच अंदाज न घेता मी मोठा पल्ला गाठायला बाहेर पडले. पण गेअर्सचे न उलगडणारे नवे कोडे, गाडीवर हेल्मेट वापरते पण सायकलवर सवय नाही, त्यात हँडल्सच्या को-या ग्रिप्सपण हातात रुतायला लागल्या... मी सुरुवातीलाच दमून गेले. मागच्या वेळेस मस्त परत येऊन मी दिवसभरातली सुट्टीची जास्तीची कामेही केली होती तरी असं वाटलं नव्हतं! माझ्यामुळे हर्पेननाही उशीर व्हायला लागला. मग मी आदित्य गार्डनपासून मागे फिरले. येताना मात्र हर्पेनच्या मित्राने करून दिलेल्या सेटिंग्मुळे आरामात घरी आले.
हो हर्पेन, तरी जाऊन येऊन ८ किमी झाले, हरकत नाही... तुका म्हणे त्यातल्या त्यात
Pages