सायकल राईड - २
पहिल्या राईड नंतर अनेक जणांनी विचारणा केली की दुसरी राईड कधी? तर घेऊन येत आहोत. दुसरी राईड. हा पेपर थोडा(साच) अवघड आहे. एक छोट्टासा घाट मध्ये आहे. :)
ता २३ फेब.
दिवस रविवार
वेळ : सकाळी साडेसहा (परत :) )
ठिकाण : थोडे अवघड पण तरीही जमेल असेच.
चांदणी चौक ( चौकाकडे जाणार्या रस्त्यावर पण बायपास वरच थांबायचे.)
राईड १ - चांदणी चौक ते पिरंगुट. ( चौक ते पिंरगुट १२ किमी)
राईड २ - पिरंगुट ते आनंदगाव (ज्यांना समोर जायचे त्यांच्यासाठी) पुढे ८ ते ९ एक किमी.
एकुण अंतर (चांदणी चौकापासून ) २१-२२ किमी वन वे.
जी लोकं कोथरूड / सिंहगड रोड वर राहतात त्यांना टोटल ५० किमी होईल. (घर टू घर) पण निदान पिरंगुट तरी गाठता येईल. चौक ते पिरंगुट १२ किमी आहे. म्हणजे घर टू घर कदाचित मॅक्स ३५ पर्यंत होईल.
https://www.google.com/maps/dir/Chandani+Chowk,+Bhusari+Colony,+Bavdhan,+Pune,+Maharashtra,+India/Pirangut,+Maharashtra,+India/18.4595721,73.6314708/@18.4844249,73.627728,12z/data=!4m15!4m14!1m5!1m1!1s0x3bc2be45a9bc2ecf:0x9a674987afed2d85!2m2!1d73.7794093!2d18.506527!1m5!1m1!1s0x3bc2bd1bdecd4c57:0x6f5e3d0d8388ed13!2m2!1d73.680485!2d18.511439!1m0!3e0
ह्या रस्त्यावरच आपला एक मायबोलीकर मार्च मध्ये ट्रायलथॉन करणार आहे. तेंव्हा हा रस्त्याची त्याला सवय व्हावी म्हणून हा रस्ता घेतला आहे. जर अवघड वाटत असेल तर मागच्या वेळे सारखे ऑपश्न द्या. आणि नाव नोंदवा म्हणजे राईड करायची की नाही हे ठरवता येईल.
मार्च शेवटी किंवा एप्रिलला
मार्च शेवटी किंवा एप्रिलला जमलं तर येईन. सध्यासाठी शुभेच्छा !
ह्या शनिवारी मला येता येणार
ह्या शनिवारी मला येता येणार नाही. पण त्यापुढील विकांती मी असेनच..
केदार - करुया का सिंहगड या
केदार - करुया का सिंहगड या शनिवारी किंवा रविवारी...
मी नविन सायकलवर केलेला नाहीये एकदा पण
केदारच्या टिप्स आशूचँपनी
केदारच्या टिप्स आशूचँपनी काढलेल्या धाग्यावर लिहा प्लीज.
मी नवीन धागा काढतोय गिअर्स
मी नवीन धागा काढतोय गिअर्स १०१ म्हणून.
आशू शनिवारीच शक्यतो करू या. आणि ९ ला तू भाग घे आणि ट्रॉफी आण. ही प्रॅक्टीस राईड.
अरे सहीच. जे काही लिहिशील ते
अरे सहीच. जे काही लिहिशील ते धाग्याच्या हेडरमधेच लिहिशील का? म्हणजे नंतर एक एक पोस्ट शोधत बसावे लागणार नाही
हो धागाच गिअरचा वापर कसा
हो धागाच गिअरचा वापर कसा करावा (फॉर स्टार्टर्स ) असणार.
मार्च मध्ये न्यू यॉर्क सायकल गटग करू. तू आणि मी.
हो करू की. रुनीला पण बोलवा
हो करू की. रुनीला पण बोलवा आणखी कोण आहेत सायकलस्वार?
केदार हर्पेन पिन्गु
केदार हर्पेन पिन्गु सगळ्यान्चे अभिनन्दन आणि अभार
पहिला पेपर सोपा होता मग दुसर्यसाठी जायचे ठरविले मी तसा कच्चा लिम्बुच बर
सई : तुम्ही निराशा होउ नका मी पण आहे जुनिअर सायकलस्वारान्मध्ये विपुत नबर कसा द्यायचा??
माझ्या सायकलचेही आभार तिच्यामुळे तर
लडाख मित्र केदार
गड्मित्र आशुचाम्प
मेळ्घाट मित्र हर्पेन यान्ना प्रत्यक्ष भेटता आले.
जंबो, तुम्ही पायाची तेवढी
जंबो, तुम्ही पायाची तेवढी काळजी घ्या आणि नव्या दमाने पुढच्या राईडला या..
सायकल गिअर्स १०१ लिहिले आहे.
सायकल गिअर्स १०१ लिहिले आहे.
जम्बो - तुम्हाला भेटून आनंद
जम्बो - तुम्हाला भेटून आनंद झाला. तसा मी पण गियरच्या सायकलमध्ये कच्चा लिंबूच आहे. अजून शिकतोय गियर कसे वापरायचे ते. मला एक लघू संदेश धाडा. माझा भमणध्वनी क्रमांक आहेच तुमच्याकडे
जम्बो, हर्पेनना दिलात तरी
जम्बो, हर्पेनना दिलात तरी चालेल. मग सगळ्यांना लागेल तेव्हा मिळू शकेल.
Pages