सायकल राईड - २

Submitted by केदार on 17 February, 2014 - 01:47
ठिकाण/पत्ता: 
चांदणी चौक ते पिरंगुट ते आनंदगाव (किंवा पिरंगुटच्या पुढे कुठेतरी)

सायकल राईड - २

पहिल्या राईड नंतर अनेक जणांनी विचारणा केली की दुसरी राईड कधी? तर घेऊन येत आहोत. दुसरी राईड. हा पेपर थोडा(साच) अवघड आहे. एक छोट्टासा घाट मध्ये आहे. :)

ता २३ फेब.
दिवस रविवार
वेळ : सकाळी साडेसहा (परत :) )

ठिकाण : थोडे अवघड पण तरीही जमेल असेच.

चांदणी चौक ( चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावर पण बायपास वरच थांबायचे.)
राईड १ - चांदणी चौक ते पिरंगुट. ( चौक ते पिंरगुट १२ किमी)

राईड २ - पिरंगुट ते आनंदगाव (ज्यांना समोर जायचे त्यांच्यासाठी) पुढे ८ ते ९ एक किमी.

एकुण अंतर (चांदणी चौकापासून ) २१-२२ किमी वन वे.

जी लोकं कोथरूड / सिंहगड रोड वर राहतात त्यांना टोटल ५० किमी होईल. (घर टू घर) पण निदान पिरंगुट तरी गाठता येईल. चौक ते पिरंगुट १२ किमी आहे. म्हणजे घर टू घर कदाचित मॅक्स ३५ पर्यंत होईल.

https://www.google.com/maps/dir/Chandani+Chowk,+Bhusari+Colony,+Bavdhan,+Pune,+Maharashtra,+India/Pirangut,+Maharashtra,+India/18.4595721,73.6314708/@18.4844249,73.627728,12z/data=!4m15!4m14!1m5!1m1!1s0x3bc2be45a9bc2ecf:0x9a674987afed2d85!2m2!1d73.7794093!2d18.506527!1m5!1m1!1s0x3bc2bd1bdecd4c57:0x6f5e3d0d8388ed13!2m2!1d73.680485!2d18.511439!1m0!3e0

ह्या रस्त्यावरच आपला एक मायबोलीकर मार्च मध्ये ट्रायलथॉन करणार आहे. तेंव्हा हा रस्त्याची त्याला सवय व्हावी म्हणून हा रस्ता घेतला आहे. जर अवघड वाटत असेल तर मागच्या वेळे सारखे ऑपश्न द्या. आणि नाव नोंदवा म्हणजे राईड करायची की नाही हे ठरवता येईल.

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, February 22, 2014 - 20:00 to 23:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी नवीन धागा काढतोय गिअर्स १०१ म्हणून.

आशू शनिवारीच शक्यतो करू या. आणि ९ ला तू भाग घे आणि ट्रॉफी आण. Happy ही प्रॅक्टीस राईड.

अरे सहीच. जे काही लिहिशील ते धाग्याच्या हेडरमधेच लिहिशील का? म्हणजे नंतर एक एक पोस्ट शोधत बसावे लागणार नाही Happy

हो धागाच गिअरचा वापर कसा करावा (फॉर स्टार्टर्स ) असणार.

मार्च मध्ये न्यू यॉर्क सायकल गटग करू. तू आणि मी.

केदार हर्पेन पिन्गु सगळ्यान्चे अभिनन्दन आणि अभार
पहिला पेपर सोपा होता मग दुसर्यसाठी जायचे ठरविले मी तसा कच्चा लिम्बुच बर

सई : तुम्ही निराशा होउ नका मी पण आहे जुनिअर सायकलस्वारान्मध्ये विपुत नबर कसा द्यायचा??

माझ्या सायकलचेही आभार तिच्यामुळे तर
लडाख मित्र केदार
गड्मित्र आशुचाम्प
मेळ्घाट मित्र हर्पेन यान्ना प्रत्यक्ष भेटता आले.

जम्बो - तुम्हाला भेटून आनंद झाला. तसा मी पण गियरच्या सायकलमध्ये कच्चा लिंबूच आहे. अजून शिकतोय गियर कसे वापरायचे ते. मला एक लघू संदेश धाडा. माझा भमणध्वनी क्रमांक आहेच तुमच्याकडे Happy

Pages