नमस्कार,
मुंजीसाठी पुण्यात (२०० कॅपॅसिटी चा) हॉल सुचवाल का? जवळ गणपती मंदिर असल्यास उत्तम.
आम्ही पुढील हॉल कन्सिडर करतोय:
गणराज मंगल कार्यालय - बाणेर
इंद्रप्रस्थ - सेनापती बापट रोड
शक्यतो वेस्ट पुणे - औंध, बाणेर पण सिटी मधेही चालेल..
(आपले चांगले/वाईट अनुभव सांगा..)
आम्ही काही ठिकाणी चौकशी केली तिथे संपुर्ण भाडे इन अॅडवान्स घेणार आणि कॅन्सलेशन करायचे असल्यास..जर तो हॉल त्या दिवशी दुसर्या कोणी घेतला तरच २५% रक्कम परत मिळेल नाहीतर काहीच परत मिळणार नाहीत असे सांगितले आहे..ही स्टँडर्ड प्रॅक्टीस आहे का?
धन्यवाद.
आपल्या घरात,आप्तेष्टां मध्ये, आपण बर्याचदा लाहन मुले पाहतो जे डावरे असतात.अर्थातच त्याना खुप गोष्टिंना सामोरे जावे लागते.
१. आपला समाज.लगेच न विचारलेला फुकट्चा सल्ला,उजव्या हाताचि सवय करवा हान.त्यात मुलगि असेल तर विचारयलाच नको (माझा स्वानुभव).मि मात्र जिथल्या तिथे ठाम पणे सांगते, ति जशि आहे तशि आहे.अर्थात माझा नवरा नेहमिच माझि बाजु घेतो.
२.त्याना लिहिताना येणार्या समस्या.माझि मुलगि आता साडेतीन वर्षांचि आहे.जेव्हा आम्हि तिला लेखन शिकवु लागलो तेव्हा आम्हाला हि समस्या प्रकर्शाने जाणवलि.ति लिहिते पण वेडे वाकडे.बाकि सगळ्यात काहि कमि नाहि हो.
पुण्यातली वाहतूक व्यवस्था अपुरे रस्ते आणि वाढत्या गाड्या यामुळे फारच विस्कळीत झाली आहे. त्यात परत वाहतूक नियम न पाळणार्यांची संख्या पण खूपच आहे. अगदी तरुण मुले , मुली, काका, काकू ते पार वयस्कर लोन्कांपर्यंत सर्व वयोगटातील माणसे सिग्नल तोडत असतात . समजा आपण सिग्नल हिरवा व्हायची वाट बघतोय व सिग्नल बदलायला १० सेकंद उरली असली तरी लोकं मागून होर्न वाजवतात जणू काही आपण सिग्नल ची वाट पाहणे हा गुन्हा आहे. मधूनच भसकन indicator न दाखवता वळणे अगदी इतक्या जवळून जाणे कि गाडी घासली जाते कि काय असे वाटते.
तिर्थक्षेत्रांसाठी एक धागा असावा अस वाटल म्हणून हा धागा उघडला आहे. मी एक महिना सर्च करून खालील माहिती /फोन नंबर्स गोळा केले. पंढरपूर राहण्यासाठी चांगल नाही हेच प्रत्येकजण सांगत होत पण ते चुकीच ठरल.
आम्ही तिर्थयात्रेला गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर व पंढरपूरला गेलो होतो.
गांणगापूर रेल्वे स्टेशनला सकाळी ८ वाजता पोहचलो. तिथे ६ सीटर री़क्षा मिळाली. त्यांनी ३०० रु. घेतले मंदिरापर्यंत सोडायचे. सीटवर गेल तर प्रत्येकी ३० रु. सांगितले आणि १२ माणस एका रीक्षात कोंबतात. दत्त मंदिराकडे पोहचायला आम्हाला १ तास लागला. रस्ते खूपच खराब होते.
आजकाल बर्याचदा आपल्याला बाहेरच्या जेवणाची गरज भासते. कधी अचानक बाई रजेवर जाते, कधी आजारपण+ पाहुणे मंडळी असे होते. कधी कामाच्या वेळा सोईच्या नसतात. हॉटेलातले चमचमीत खाणे एक-दोन दिवस चालतेही. पण रोजच्या पोळी भाजीची सर त्याला नाही. अशावेळी मदतीला येते ते पोळीभाजी केंद्र. तुमच्या भागातील चांगल्या पोळीभाजी केंद्रांची माहिती या धाग्यावर दिलीत तर गरज पडल्यास खात्रीचे केंद्र शोधायला उपयोग होईल.
प्राथमिक शाळेमध्ये सकाळी साडे दहा वाजेपर्यंत पाटीवर पेन्सिलीने लिहिताना गारठलेल्या बोटांची पंचाईत होत असे. कानटोपी / माकडटोपी, स्वेटर, बूट मोजे याशिवाय सकाळी शाळेला निघणे अशक्य! कुठेही पाणी प्या, उत्तम चव आणि तृप्ततेची हमी! भरपूर झाडे, टेकड्या, पाऊस, शांतता, मैदाने वगैरे पुण्याची श्रीमंती असे!
नमस्कार,
थोडी माहिती हवी होती.
माझा पुणे बावधन (चांदणी चौक पासून १ साधारण १ किमी) येथे परांजपे स्कीम मध्ये २ बीएचके फ्लॅट आहे. त्यात कोणतंही फर्निचर नाही आहे. तर मला एक ओळखीचा भाड्याने घेण्यासंदर्भात विचारात आहे..
तर मी किती भाडं सांगावं?
डेपॉज़िट किती घ्यावं?
मी पुण्यात रहात नसल्याने मला तितका अंदाज नाही.
धन्यवाद!
मला बऱ्याच दिवसांपासून शिलाई यंत्र घ्यायचे आहे पण कोणते घ्यायचे ते कळत नाही. इथे ४ ब्रेंड्स आहेत - सिंगर उषा, ब्रदर आणि बर्निना। मला बिगिनर मॉडल घ्यायचे आहे. पण पुर्वी पायाने चालवायचे तशी मशीन नकोय. कृपया मार्गदर्शन करा।
हा जुना धागा संपादित करुन वर आणतेय.
घरी खुप जुने कपडे जमा झाले आहेत. काय करावं कळत नाही. पुर्वी आई जुने कपडे बोहारणिला देऊन भांडी घेत असे. आता सोसायटीत बोहारणी येत नाहीत. कुठे येत असतील तर त्यांना गाठायला आम्ही दिवसभर नसतो. विनाकारण भांडी जमा करायची सुद्धा इच्छा नाही.
जुने कपडे डिस्पोज करण्यासाठी काय करता येईल? मला खालील पर्यांयांबद्दल माहिती/ मदत हवी आहे. मी मुंबईत राहते.
१. एखादी सेवाभावी संस्था जर कपडे स्विकारत असेल तर उत्तम. परंतु घरी येऊन न्यायला हवेत. तुमच्या ओळखी मध्ये अशी संस्था असल्यास सांगा.