Submitted by स्वाती२ on 27 December, 2013 - 10:02
आजकाल बर्याचदा आपल्याला बाहेरच्या जेवणाची गरज भासते. कधी अचानक बाई रजेवर जाते, कधी आजारपण+ पाहुणे मंडळी असे होते. कधी कामाच्या वेळा सोईच्या नसतात. हॉटेलातले चमचमीत खाणे एक-दोन दिवस चालतेही. पण रोजच्या पोळी भाजीची सर त्याला नाही. अशावेळी मदतीला येते ते पोळीभाजी केंद्र. तुमच्या भागातील चांगल्या पोळीभाजी केंद्रांची माहिती या धाग्यावर दिलीत तर गरज पडल्यास खात्रीचे केंद्र शोधायला उपयोग होईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुण्यात
पुण्यात सदाशिव-नारायण-शनिवार-शुक्रवार-कसबा-नवी इ. पेठांमधे आणि इतर भागांतही बहुतेक सगळ्या बेकरी-कम-जनरल स्टोर्समधे घरगुती घडीच्या पोळ्या मिळतातच. काही ठिकाणी भाकर्या पण मिळतात. भाजी मात्र सगळीकडे मिळतेच असं नाही
मला आवडलेल्या सगळ्यात चांगल्या पोळ्या बाजीराव रोड वर वाडेश्वर इडलीगृहाशेजारी साठे बिस्किटवाल्यांच्या! त्यांच्या पुपोसुद्धा (गुळाच्या) छान असतात. फक्त सकाळी साडेदहानंतर पोळ्या मिळतात आणि संध्याकाळपर्यंत शिल्लक नसतात (पुणेरी बाण्याला स्मरून लिमिटेड स्टॉक असतो)
खुन्या मुरलीधर चौकात टिमविशेजारी एका छोट्या दुकानात घरगुती भाजीपोळी मिळते. तसंच नागनाथ पार चौकात पण एक दुकान आहे. टिळक रोडवर ग्राहक पेठेत पोळीभाजी मिळते, अळूची पातळ भाजीसुद्धा रोज मिळते. शिवाय कुमठेकर रोडवरचं स्वैपाकघर (बहुदा पोळीभाजी विकायला सुरुवात यांनीच केली)
आणखी एक म्हणजे या सगळ्या परिसरात बहुतेक भाजीवाले भाजी चिरून पॅक करून विकतात/मागणीप्रमाणे चिरून देतात. अगदी पालेभाजीसुद्धा. शिवाय मोड आलेली कडधान्ये, सोललेले पावट्याचे दाणे अशा गोष्टी पण ठेवतात. (अपवादः साठे भाजीवाले). तेव्हा घरी जाऊन फोडणीवर शिजवणं फक्त बाकी असतं. बाहेरून पोळ्या आणून एक दहा मिनिटात अशी भाजी करणं पण बर्यापैकी सोयीचं असतं
पुण्यात मेहेंदळे
पुण्यात मेहेंदळे गॅरेजशेजारच्या मनोहर मंगल कार्यालयाच्या आवारात जे कँटिन सदृश हॉटेल आहे तिथेही घरगुती चवीच्या भाज्या/उसळी व पोळ्या [रिझनेबल प्राइस] पार्सल करून मिळतात / तिथेच खाता येतात. तिथे इतरही पदार्थ छान मिळतात. नाव आठवत नाही आता त्याचे.
आणखी एक म्हणजे या सगळ्या
आणखी एक म्हणजे या सगळ्या परिसरात बहुतेक भाजीवाले भाजी चिरून पॅक करून विकतात/मागणीप्रमाणे चिरून देतात. अगदी पालेभाजीसुद्धा. शिवाय मोड आलेली कडधान्ये, सोललेले पावट्याचे दाणे अशा गोष्टी पण ठेवतात. >>>>> अशीच सोय कोथरुड / कर्वेनगर / काकडे सिटि परिसरत कुठे आहे का?.....
नवर्याला स्वयंपाक
नवर्याला स्वयंपाक शिकविण्याबद्दल काय म्हण्णं आहे?
-घरगुती खिचडी/वरणभात (झालंच तर मॅगी/आम्लेट पाव)केंद्र चालक (इ)
काहीच म्हण्णं असायचं कारण
काहीच म्हण्णं असायचं कारण नाही, इब्लिस. जरूर यावाच. फक्त या भारतदेशात स्वैपाक हे पुरुषांच्या 'जगण्यास अत्यावश्यक कौशल्य' मधे पडत नसल्याने अनेकांना येत नाही. पण तो इश्यू इथे आहे असं मला वाटत नाही.
जेव्हा घरातल्या कुणालाच स्वैपाक शक्य नसेल/कंटाळा आलाअसेल तेव्हा काय करायचं असा प्रश्न असेल तर त्याची उत्तरं आहेत ही...
हीमांगी, निश्चित मिळत असणार. निम्मेअधिक पेठेचे रहिवासी तिकडे स्थलांतर करून गेलेत, त्यामुळे पेठेत जे काही मिळतं ते बहुतेक तिथे असतं.
महिनाभराच्या हिशोबाने रोज चिरलेल्या भाज्यांचा (मिरच्या, कोथींबीर, कढीलिंब, आलं-लसूण सप्लीमेन्टसकट) रतीब सुद्धा लावता येतो सगळ्या पुण्यात. गेली अनेक वर्षे! आसपास चौकशी करा, माहिती मिळेल
वरदाताई, अहो इब्लिसगिरी करत
वरदाताई,
अहो इब्लिसगिरी करत होतो.
आधी पोटापुरता स्वयंपाक शिकलो. आता नॉनव्हेजमधे बल्लवगिरी करतो. कारण घरात बाकी सगळे तु.क. टाकतात नॉनव्हेजकडे. कुकिंग अलाऊड असलं तरी कुण्णी कुण्णी करूण घालत नाही
पोळी-भाजी केंद्र ह्या
पोळी-भाजी केंद्र ह्या संकल्पनेची सुरुवात खूप पूर्वी साधारण ३०-३५ वर्षांपूर्वी डोंबिवलीत कानिटकर ह्यांनी केली, आता डोंबिवलीत भरपूर पोळी-भाजी केंद्रे आहेत तिथे भाकऱ्या, अळूवडी, कोथींबीर-वडी, अनेक प्रकारचे लाडू, असे विविध प्रकार मिळतात (मी त्यातले थोडेच लिहिले).
कानिटकर यांचीच ३ दुकाने डोंबिवली येथे आहेत. 'त्रिमूर्ती' (ब्राम्हणसभा आहे तो रोड), एक 'तृप्ती' चार-रस्ता येथे आहे आणि एक केळकर रोड येथे वेहिकल ब्रिजजवळ आहे. मानपाडा रोड येथे गावदेवी देवळासमोर 'चंद्रहास' हे पोळी-भाजी केंद्र आहे तसेच नामदेव-पथ येथे 'रुची-सम्राट' आहे, पाथर्ली रोडवरून श्रीमंगल कार्यालयाजवळ 'खानदेशी-स्वाद' आहे, तशी बरीच आहेत पण आम्ही चंद्रहास किंवा तृप्ती, खानदेशी-स्वाद येथून जास्त करून आणतो. संकष्टीला उकडीचे मोदक असतात तसेच ह्या सिझनला गुळाच्या पोळ्या असतात आणि पुरणपोळी, मसाले-भात, पुलाव बहुतेक रोज असतात (तृप्ती आणि चंद्रहासमध्ये). ठाण्यापेक्षा डोंबिवली येथे रेटपण कमी आहेत कारण नवरा ठाण्याला नोकरी करतो क्वचित तिकडे पोळी-भाजी घेतो म्हणून रेट माहिती. (मी पोळी-भाजीचा डबा रोज देते पण कधी जमले नाही तर). वेस्टची नाही माहिती, मी डोंबिवली पूर्व येथील काही सांगितली.
बाणेर पाषाण लिंक रोड वर
बाणेर पाषाण लिंक रोड वर पांचाली नावाच दुकान आहे. घरगुती चविच वाजवी दरात . अगदी भोगीची भाजी, अळूच फद्फदं , सुद्धा मिळत.
पुण्यात तावरे कॉलनीत ट्रेजर
पुण्यात तावरे कॉलनीत ट्रेजर पार्कजवळ 'रुचिरा' मधे मिळते पोळी-भाजी, पुलाव, कोथिंबीर वडी, आलू पराठा, मिक्स वेज. पराठा, साबुदाणा खिचडी, उकडीचे मोदक, पु.पो., पार्सलही मिळते व तिथे बसून जेवायचीही सोय आहे.
पुण्यात मेहेंदळे
पुण्यात मेहेंदळे गॅरेजशेजारच्या मनोहर मंगल कार्यालयाच्या आवारात जे कँटिन सदृश हॉटेल आहे तिथेही घरगुती चवीच्या भाज्या/उसळी व पोळ्या [रिझनेबल प्राइस] पार्सल करून मिळतात / तिथेच खाता येतात. तिथे इतरही पदार्थ छान मिळतात. नाव आठवत नाही आता त्याचे.>>>>>>
अकु, 'मनोहर'च आहे नाव त्याचे. पदार्थ अल्टीमेट टेस्टी असतात तिथले. (बदामीकर केटरर ना!)
हीमांगी, कोथरूडमध्ये तर चिकार असतील असे भाजीवाले. माझी आई नेहेमीच्या भाजीवालीला सांगते अर्ध्या तासात जाउन येते तोवर गवार निवडून दे वगैरे. पण रेडीमेड देणारेही नक्कीच खूप असतील.
स्वाती२ - उपयुक्त धागा आहे हा!
वरदा थॅंक्स.... मी चौकशी
वरदा थॅंक्स....
मी चौकशी करुन बघते.. अस महिन्याच्या रतिबासारखं मिळाले तर बरच होईल मला......इथे घरपोच भाजी आणून देणारे भाजिवाल्यांबद्दल माहिति मिळाली मला.. पण अस पण मिळू शकतं हे माहित नव्ह्ते...
थँक्स बस्के! काही केल्या ते
थँक्स बस्के! काही केल्या ते नाव आठवत नव्हतं!
कोथरुड बस स्टँड (अग्निशमन केंद्राशेजारी, कोकण एक्स्प्रेस हॉटेल समोरची बाजू) येथेही जवळच लोकसेवा किचनचा आऊटलेट आहे. स्वस्त दरात पोळी-भाजी मिळते. भाज्या /उसळी तश्या यथातथा असतात, चव-गुणवत्ता यांच्या दृष्टीने. पण आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना व कष्टकरी नोकरदारांना परवडणारे दर आहेत.
घरपोच भाज्या सुविधा ही आजकाल घराजवळच्या भाजीवाल्यांकडे (खास करून हातगाडीवाले) मिळू शकते. त्यांना फोन करून आठवड्याची भाजी कळवायची आणि त्याप्रमाणे ते १-२ दिवसांत आपल्या-त्यांच्या वेळा जुळवून भाजी आणून देतात असा अनुभव आहे.
मध्यंतरी घराजवळ एक भाजीची ए.सी. व्हॅनही पाहिली होती. व्हॅनमध्ये शिरून आत रचून ठेवलेल्या भाज्यांमधील हव्या त्या भाज्या सिलेक्ट करायच्या, बाहेर येऊन त्यांचे मोजमापानुसार व त्यांच्या ठरलेल्या दरानुसार पैसे द्यायचे असा कारभार.
मेजवानी स्वयंपाकघर असे
मेजवानी स्वयंपाकघर असे डहाणुकर सर्कलजवळ ( बहुधा ती चेन आहे) मिळते. पोळ्या भाजी कोशिंबीर असे सगळे पार्सल मिळते. चांगला दर्जा आहे. मी आणतो कधी कधी.
हीमांगी, घरपोच रतीब असतो
हीमांगी, घरपोच रतीब असतो चिरलेल्या ताज्या भाज्यांचा. महिन्याच्या हिशोबाने पैसे घेतात. आठवड्यातून अमूक इतक्या फळभाज्या, कडधान्यं, ठराविक प्रमाणात पालेभाज्या, कोशिंबीरीसाठीचे घटक, मिरच्या इ. ओला मसाला अशा कॅलक्युलेशन्सने ठरवलेलं असतं. कांदे-बटाटे हवे असल्यास देतात. तुमच्या गरजेप्रमाणे 'पॅकेजेस' असतात.
सकाळी किंवा संध्याकाळी ठराविक वेळेला पोचत्या करतात.
स्वाती आणि वरदा.... खरंच
स्वाती आणि वरदा.... खरंच चांगला धागा आहे... मी आमच्या इथे थोडीफ़ार चौकशी केली..एक-दोन भाजीवाले सापडले.... Justdial madhe पण थोडीफ़ार नावे आहेत...
सो माहीती मिळाली, पण Option work out नाही झाला अजुन..कुणाला जर डहाणूकर/कोथरुड स्टॅंड परिसरातील नावे माहिति असतील तर जरूर कळवा....
एक मात्र फ़रक आहे की Home Delivery वाली भाजी जरा महाग असते...
पुण्यात आनंद नगरचे जे फाटक
पुण्यात आनंद नगरचे जे फाटक आहे त्या फाटकापासून थोडी दुर एक टपरी आहे तिथे छान भाजीपोळी आणि इतरही घरगुती पदार्थ विक्रिस असतात फक्त लवकर जावे लागते. मला तिथले मेथीचे ठेपले आणि ओल्या नारळाच्या करंज्या फार आवडतात. टपरी समोर एक त्रिकोणी जागा आहे तिथे अनेक दुकाने आहे. दुर्गा कॅफे तिथेच आहे.
अन्जू, हो ही सेवा खरे तर डोम्बीवलकरांनी सुरु केली आहे. तिथे ती अगदी रुळली आहे आता. तेवढ्यासाठी परत एकदा तरी मी डोम्बीमधे चक्कर मारणार आहे. एक वर्षभर मी तिथल्या पोळीभाजी केन्द्रात जेवण केले आहे. कधीच महागडे वाटले नाही की कंटाळाही आला नाही तेच तेच अन्न खाऊन.
हीमांगी, भाज्या निवडून चिरणे,
हीमांगी, भाज्या निवडून चिरणे, पॅक करणे व घरपोच देणे याची कॉस्ट अॅड नाही का होणार मूळ किंमतीत?
थोडीशी आणखी आसपास चौकशी करा, नेहेमीच्या किराणा दुकान, जनरल स्टोर्स-कम-बेकरी वगैरेतसुद्धा. महिन्याची भाजी होम डिलीव्हरी करणार्यांचे कॉन्टॅक्ट्स नक्की मिळतील
छान उपयुक्त धागा आहे.लिहिताना
छान उपयुक्त धागा आहे.लिहिताना एकाच आणि सोप्या फॉरमॅट मध्ये लिहिली तर चटकन माहिती मिळेल.
गाव - एरिया - पोळीभाजी केंद्राचे नाव - खास पदार्थ
लोकहो मुंबईतल्या पोळी भाजी
लोकहो मुंबईतल्या पोळी भाजी केंद्राची माहिती द्या कि हो डोंबिवलीत खूप आहेत. पण त्या व्यतिरिक्त वेस्टर्न लाईन वर ?
नरीमन पॉईंट ला मंत्रालय जवळ
नरीमन पॉईंट ला मंत्रालय जवळ कुटुंब सखी. छान पदर्थ असतात सगळे.
पिंचिंमध्ये नाहीतच का अशी
पिंचिंमध्ये नाहीतच का अशी केंद्र?
हीमांगी... कर्वेनगर मध्ये
हीमांगी... कर्वेनगर मध्ये प्रतिज्ञा मंगल कार्यालयाच्या शेजारच्या बोळात माय डब्बा आणि प्रतिज्ञा मंगल कार्यालयाच्या शेजारी सुगरण स्वयंपाकघर अशी दोन पोळी-भाजी मिळणारी दुकाने आहेत..
बी धन्यवाद. डोंबिवलीला आलात
बी धन्यवाद. डोंबिवलीला आलात कि जरूर माझ्याकडे या. तुम्ही तुमच्या एका लेखात बहुतेक इंडोनेशिया असावा, डोंबिवलीच्या पोळी-भाजी केंद्राचा उल्लेख केला होतात, ते मी वाचले होते आणि तेव्हा मी सदस्य नव्हते मायबोलीची, म्हणून प्रतिसाद देऊ शकले नव्हते.
डोंबिवलीला कोणी ऐनवेळी न कळवता जेवायला आले तरी अनेक घरगुती पदार्थ ह्याच पोळी-भाजी केंद्रातून आणून आपण देऊ शकतो अगदी मेथीचे ठेपले, आलू-पराठे इ. खूप असतात, लेखणी कमी पडेल माझी नावं घेताना. रेटपण ठाण्या-मुंबईपेक्षा कमी आहेत.
पिंचिंमध्ये नाहीतच का अशी
पिंचिंमध्ये नाहीतच का अशी केंद्र? >>> +१११
आकुर्डीला बहुतेक असावे, माझी
आकुर्डीला बहुतेक असावे, माझी पिंपरीची मैत्रीण म्हणाली एकदा, ती डोंबिवलीला आली होती तेव्हा मी पुरणपोळ्या, कोथिंबीर-वडया पोळी-भाजी केंद्रातून आणल्या आणि बाकी घरी केले होते तेव्हा तिला हि सोय इथे आहे हे फार आवडले, ती सध्या नगरला राहते पण पिंपरीला आली कि कधी-कधी बाहेरून डबा मागवते, म्हणजे पिंपरीला डबा जेवणाचा मिळू शकतो, आकुर्डीला पुरणपोळ्या, खव्याच्या पोळ्या वगैरे मिळतात असे म्हणाली.
अंजू, विचारून सांग ना प्लिज
अंजू, विचारून सांग ना प्लिज
ओके रिया, आज-उद्याकडे फोन
ओके रिया, आज-उद्याकडे फोन करते तिला.
मुंबई - दहिसर(पश्चिम) -
मुंबई - दहिसर(पश्चिम) - अन्नपूर्णा आणि सनाटा पोळी भाजी केंन्द्र - स्टेशन जवळ
सामी थान्क्स
सामी थान्क्स
अधेंरित नाहि आहेत पोळी भाजी
अधेंरित नाहि आहेत पोळी भाजी केंन्द्र ..... कधि कंटाळा आला/ तब्बेत बरी नसेल तर घरिच काहितरि करावे लागते किति उशिर झाला तरि...:( :-
Pages