Submitted by स्वाती२ on 27 December, 2013 - 10:02
आजकाल बर्याचदा आपल्याला बाहेरच्या जेवणाची गरज भासते. कधी अचानक बाई रजेवर जाते, कधी आजारपण+ पाहुणे मंडळी असे होते. कधी कामाच्या वेळा सोईच्या नसतात. हॉटेलातले चमचमीत खाणे एक-दोन दिवस चालतेही. पण रोजच्या पोळी भाजीची सर त्याला नाही. अशावेळी मदतीला येते ते पोळीभाजी केंद्र. तुमच्या भागातील चांगल्या पोळीभाजी केंद्रांची माहिती या धाग्यावर दिलीत तर गरज पडल्यास खात्रीचे केंद्र शोधायला उपयोग होईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मुंबईत बऱ्याच ठिकाणी नाहीत
मुंबईत बऱ्याच ठिकाणी नाहीत अशी, बोरिवलीला वगैरे आहे वाटते, मागे ऐकले होते. माझी एक चुलत- बहिण डोंबिवली सोडून नाहुरला राहायला गेली ती डोंबिवलीचे पोळी-भाजी केंद्र खूप मिस करते. एक चुलत बहिण आता ठाण्याला राहते आणि अधूनमधून डोंबिवलीत येते, तिच्या मुलीच्या डिलिव्हरीच्या वेळेस ती डोंबिवलीतून डिंक-लाडू, मेथी-लाडू, अळीव लाडू सर्व इथून अमेरिकेला घेउन गेली होती. हे ठाण्याला मिळते पण रेट्स डोंबिवलीत जरा कमी असतात. अर्थात ठाणे, डोंबिवलीपेक्षा मोठे शहर आहे त्यामुळे रेट जास्त असणे स्वाभाविक आहे.
चेंबूरला स्टेशनजवळ एका
चेंबूरला स्टेशनजवळ एका संस्थेत चपात्या, भाकर्या, भाजी मिळते. आपल्यासमोरच त्या बायका करत असतात त्यामूळे स्वच्छतेची खात्री. कुर्ल्याला डेअरी रोडवर एका दुकानात चपात्या भाजी मिळते. त्यांच्याकडे चटणी, लोणची पण असतात. चर्नी रोडला स का पाटील उद्यानात कुटुंब सखीचा स्टॉल आहे. ( या तिन्ही ठिकाणचा मला चांगला अनुभव आहे. ) ठाण्याला पण नौपाडा रोडवर असे केंद्र आहे.
धनश्री या ठाण्याच्या कंपनीची जी उत्पादने आहेत ती टिकाऊ आहेत. ती घरी असली तर दोन माणसांचे जेवण सहज होऊ शकते. यात पुलाव, कढी, शिरा पासून पातळ भाज्या, आमट्याही आहेत. चपात्या मात्र नाहीत. हे पदार्थ खास मराठी चवीचे आहेत.
अंधेरीत ( इस्टला) शिवाजी
अंधेरीत ( इस्टला) शिवाजी चौकात आहे "आस्वाद". तिथे पोळीभाजी आणि बरेच घरगुती पदार्थ मिळतात. अशा ठिकाणी हॉटेल पेक्षा स्वस्त पडत
श्री धनश्री आणि धनश्री असे २
श्री धनश्री आणि धनश्री असे २ वेगवेगळे ब्रँड आहेत, श्रीधनश्रीची रेडी टू ईट उत्पादनं जास्त चांगलं आहेत.
नव्या मुंबईत?? सीवूड्स
नव्या मुंबईत?? सीवूड्स स्टेशन पुर्वेला एक आहे पोभा. अगदी सुंदर आहे असे नाही पण ठिकठाक आहे. अजुन कुठे चांगले असल्यास कळवा.
कोथरूड मध्ये सहजान्ण्द
कोथरूड मध्ये सहजान्ण्द सोसायटी मध्ये एक आहे. नाव आठवत नाही आता.
पोळ्या, भाताचे प्रकार, कोरड्या भाज्या आनि थोड्या पंजाबी स्टाईल भाज्या बर्या असतात.
उसळी मात्र अजिबात आवडल्या नाहीत मला तिथल्या.
दर हॉटेल पेक्षा कमी आहे पण अगदी खूप कमी पण नाही.
विद्यार्थी, बॅचलर लोकांची जाम गर्दी असते तिकडे.
बहुतेक चुकीच्या धाग्यावर
बहुतेक चुकीच्या धाग्यावर पोस्टते आहे....पण पुण्यात सहकारनगर नं. २ मध्ये ( दशभुजा गणपती मंदिराच्या परिसरात) रोज पोळीभाजी/ स्वयंपाक करण्यासाठी बाईंची गरज आहे. सासूसासरे एकटेच असतात आणि सासूबाईंची सध्या तब्येत बरी नाही. कुणी माहीत असल्यास सांगावे. पोळीभाजी केंद्र- तेथे जाऊन आणणे जमणार नाही त्याना.
अबोलीजाह्नवी, सहकारनगर नं. २
अबोलीजाह्नवी,
सहकारनगर नं. २ मध्ये हरीभाऊ सोवनी नावाचे एकजण घरपोच डबे देतात. तुला नंबर हवा असेल तर मला विपू कर.
सहकारनगर नं. २ मध्ये भावे
सहकारनगर नं. २ मध्ये भावे बाई. आम्हि तिकडच्या पोळ्या खाउनच वाढलो.
त्या बहुतेक घरि पण डबे पाठवत असतिल. छान असतो त्यन्चा डबा.
पार्ल्यात विजयस्टोअर्सच्या
पार्ल्यात विजयस्टोअर्सच्या समोर एक प्रभूकृपा म्हणून दुकान आहे. तिथे पोळ्या, भाज्या, उसळी वगैरे मिळतात. शिवाय जवाहरच्या आसपास एक भाकरी पिठले, पोळ्या अशा पदार्थांचे दुकान आहे . जवाहर मधे सुद्धा चौकशी करता येईल.
नाशिकमधे गंगापूर रोडवर भातुकली नावाचे एक दुकान आहे. वांग्याची भाजी एकदम खंग्री . पाटवडीचा रस्सा, पिठले , एखादी उसळ, पोळ्या, भाकरी, आमटी असे घरगुती पदार्थ अप्रतिम चवीचे मिळतात.
रिया, केदार पिंचिं मध्ये डी
रिया, केदार पिंचिं मध्ये डी वाय पाटील तुकारामनगर पाशी सम्राट, सुरभि बरे आहेत. मेस ही आहेत व डबेही देतात. आमच्या अजमेरात तर पीकच आहे मेसचे पण सगळेच घरपोच डबे देत नाहीत.
रास्तापेठेत कुलकर्णी म्हणून बाई फार छान डबे करून देतात.
शिवाय दोन - तीन पोळी केंद्रे पण आहेत.
कोथरुड मध्ये पश्चीमा नगरीत पो
कोथरुड मध्ये पश्चीमा नगरीत पो भा केंद्र आहे ... नाव नाई आठवत,,,,.. पण चांगले आहे... पोळ्या छान आसतात..
पुण्यात शिवाजीनगर (मुंबई पुणे
पुण्यात शिवाजीनगर (मुंबई पुणे जुना महामार्ग) येथे घरगुती पोळी भाजी घरपोच मिळण्याची सोय माहित आहे का?
तिथून जवळ जोग सेंटरच्या पुढे वडेवाल्यानंतरच्या गल्लीत दोन घरगुती डबा केंद्र आहेत. तिथून पूर्वी आणले होते. पण पहिल्या दिवशी दाखवलेल्या पोळ्याचा दर्जा नंतर घसरला होता. एका ठिकाणी भाजी म्हण्जे पाणी आणि तिखटाचा पातळ रस्सा ( बटाटा भरीला घालून) असे. दुसरीकडे कधी कधी पोळयांत केस निघत :(.
थोडे लांबून,पण दर्जेदार पदार्थ घरपोच मिळने शक्य आहे का? त्यासाठी थोडी जास्त किंमत पडली तरी चालेल. पण पोळीभाजी घरगुती आणि दर्जेदार हवी.
माझी आई आता एकटी असते, बर्याच वेळा असे काही मिळाले तर बरे पडते पण जवळच्या दोन ठिकाणांचा दर्जा तितका चांगला वाटत नाही.
पुण्यात पद्मावती इथे पारसनिस
पुण्यात पद्मावती इथे पारसनिस हॉस्पिटल जवळ एक ' सुगरण स्वयंपाकघर' आहे. चव बरी असते.
कात्रज सुखसागरनगर इथेही एक वैष्णवी फुड्स- घरपोच डबे देण्याची सोय नविनच सुरू झालं आहे.
शहराजाद, कोहिनूर इस्टेटजवळ
शहराजाद,
कोहिनूर इस्टेटजवळ दोन घरगुती पोळी-भाजी केंद्र आहेत. त्यांचा दर्जा चांगला असतो.
साधना पश्चिमेला सेक्टर 42a
साधना पश्चिमेला सेक्टर 42a मधे एक आहे त्याच्याकडे पराठे फार छान मिलतात आणि dmart समोरच्या गल्लीत एक मराठी जेवण मिलते
मुलुंड वेस्ट मध्ये स्टेशनला
मुलुंड वेस्ट मध्ये स्टेशनला जाण्याच्या रस्त्यावर एक कोल्ड स्टोअरेज चे दुकान आहे. त्याच्या समोरील भागात एक पोळी भाजी केंद्र आहे. छत्री खाली भांडी असतात व रेट कार्ड आहे. नाश्ट्याचे पदार्थ, उपासाचे पदार्थ, (खिचडी-वडे) व शाकाहारी जेवण मिळते.
आज अपघातानेच एक केंद्र सापडले. सरोजिनी नायडू रोडवर स्टेशनच्याच जवळच एक नोटरी हपीस आहे जरा आतल्या बाजूला त्याच्या समोर मातृछाया बिल्डिंग मध्ये एक पोळी भाजी जेवण व नाष्टा केंद्र आहे. ७० रु ला मराठी चवीचे घरगुती जेवण मला मिळाले. शाकाहारी. कोबीची भाजी डाळ घातलेली, लोणचे, लिंबू कांदा, मटारची उसळ, आमटी व दोन पोळ्या ह्या छान मऊ होत्या. व भात. दहि दिले नाही मी मागितले पण नाही. गडबड होती. मुख्य म्हणजे निवांत आहे खरेच तिथे बाहेर झाडाची छाया आहे. हे डबा देतात. पण आपण येउन घेउन जायला लागतो. त्या बाईंचा मुलगाच बघतो बाहेरचे. पोहे उपमा, बटाटेवडा उसळ पाव वगैरे मिळते. स्वच्छ आहे. तीन चार टेबले आहेत.
आपण म्हणतो पण वणवण भटकणार्या लोकांना, घरी स्वैंपाकाची सोय नसलेल्यांना असे केंद्र म्हणजे वरदान आहे. सिंगापुरात पण असे जेवण मिळत नाही ह्या जाणिवेने मला कसेतरीच झाले. कधीतरी आपल्याला असे साधेच काहीतरी हवे असते. फॅन्सी एक्सॉटिक लागत नाही. मला शक्य असते तर तिथला एक डबा भरून बी ह्यांना हपिसात नेउन दिला असता. माझ्याकडे पण मी असे साग्र संगीत करत नाही. मुलीला काय हवे ते करून काहीतरी मला बनवते. उन्हात भुकेच्या वेळी आयते मिळाले कि किती छान वाट्ते.
मस्त जेउन मी हपिसात येउन एसी लावून एक चॉकोलेट खाल्ले. एक साधासाच पण छान अनुभव.
ह्यांचा नंबर घेउन इथे टाकते. मराठीच बाई आहेत.
नाशिक फाट्यावरून
नाशिक फाट्यावरून रहाटणी/पिंपळे सौदागर कडे जाताना फ्लायओव्हर संपतो तिथे थोडे डावीकडे गेल्यावर 'जोशीज' म्हणून एक हॉटेल/खाणावळ आहे. घरगुती चपाती/भाकरी/उसळी/भाज्या/वरणभात मिळतो. ३/४ वेळा तिथे खाल्लेय.
नवा फ्लाय ओव्हर का? बघायला
नवा फ्लाय ओव्हर का? बघायला हवे...
कुठे? कोणत्या टोकाला
कुठे? कोणत्या टोकाला पुलाच्या? गोविंद गार्डन की कल्पतरु?
अमा, मुलुंड इस्टलाही कुणी
अमा, मुलुंड इस्टलाही कुणी जोशी म्हणून डबा देतात. आणायला जावं लागतं की पोचवतात ह्याची कल्पना नाही पण चव चांगली आहे जेवणाची असं तो डबा खाल्लेल्या सगळ्यांचं मत पडलं.
सायो , number मिळु शकेल का?
सायो , number मिळु शकेल का?
अमा, मुलुंड इस्टलाही कुणी
अमा, मुलुंड इस्टलाही कुणी जोशी म्हणून डबा देतात. आणायला जावं लागतं की पोचवतात ह्याची कल्पना नाही पण चव चांगली आहे जेवणाची असं तो डबा खाल्लेल्या सगळ्यांचं मत पडलं.>> धन्यवाद, for me it was more of the moment of getting nice food at the right time and the peaceful ness and shade of tree etc. I prefer to cook something at home or order in.
ते बेस्टच हो अमा. मी आपली
ते बेस्टच हो अमा. मी आपली माहिती दिली. त्याचा उपयोग करायचा/नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न शेवटी.
स्नेहमयी, चौकशी करून सांगते.
सहकार नगर नं.२ परिसरात आस्वाद
सहकार नगर नं.२ परिसरात आस्वाद नावाचे चांगले पोळी-भाजी केंद्र आहे. चांगलं फूड आणि रिझनेबल प्राइस असते.
कुठे? कोणत्या टोकाला
कुठे? कोणत्या टोकाला पुलाच्या? गोविंद गार्डन की कल्पतरु?>>>>
फ्लायओव्हर संपल्यावर कल्पतरुजवळ डावीकडे वळा (first left after flyover). कल्पतरु सोसायटीचे गेट ओलांडून पुढे गेल्यावर लगेच उजव्या हाताला बोर्ड दिसेल जोशी'ज म्हणून.
बोरीवली पश्चिमेची पण पो-भा
बोरीवली पश्चिमेची पण पो-भा केंद्र, मराठी डबा मिळण्याची ठिकाणं सांगा नं? अन्नपुर्णा च्या पोळ्या, मोदक वगैरे तिथे गेल्यावर खाल्लेत.
ओके..कल्पतरुच्या इकडून
ओके..कल्पतरुच्या इकडून वळण.धन्यवाद.
सहकार नगर नं.२ परिसरात आस्वाद
सहकार नगर नं.२ परिसरात आस्वाद नावाचे चांगले पोळी-भाजी केंद्र आहे....... आम्हि बरेच वेळा तिकडुनच आणतो ड्बा. मस्त आसतो.
दादर शिवाजी पार्क परीसरात
दादर शिवाजी पार्क परीसरात वैशंपायन म्हणून एक जण जेवणाचा डबा घरपोच पोचवतात. ४ पोळ्या, भाजी, आमटी, भात, कोशिंबीर असं सगळं रुपये ७०/- सध्याचा भाव. घरगुती चवीचं छान जेवण असतं.
Pages