सेवा-सुविधा

घोडबंदर रोड, ठाणे एरियात चांगले प्री-स्कूल्/डे-केअर सुचवा.

Submitted by मी अश्विनी on 20 December, 2018 - 10:31

आम्ही पुण्यावरून ठाण्याला मुव होत आहोत.
पुण्यात प्री-स्कूल्/डे-केअर ची गरज पडली नाही पण आता ठाण्यात त्याची निकडीने गरज आहे.
चार आणि दोन वर्षांचा मुलगा आणि मुलगीसाठी घोडबंदर रोड, ठाणे एरियात चांगले प्री-स्कूल्/डे-केअर सुचवाल का?
ह्या एरियातल्या प्री-स्कूल्/डे-केअरचा तुमचा वा ओळ्खीतल्यांचा वैयक्तिक अनुभव असेल तर ऊत्तमच.
प्री-स्कूल्/डे-केअर निवडतांना कुठल्या बाबी बघाव्यात ते सुद्धा कळले तर खूपच मदत होईल.

धन्यवाद

Specification प्रमाणे कुर्ती हव्या आहेत

Submitted by utsukata on 8 September, 2018 - 17:10

स्टेज performance साठी सांगितल्याप्रमाणे ( यात रंग, डिझाईन, साईझ वगैरे येईल ) वुमेन्स कुर्ती करून हव्या आहेत. साधारण ८-१० लागतील.

असे तयार करून देणारे कोणी माहीत आहे का?

सोनी कॅमकॉर्डर चे पुण्यात दुरुस्ती केन्द्र?

Submitted by यक्ष on 30 March, 2018 - 06:51

ह्यापुर्वीही माझा सोनी DCR-SR82 Handycam झोपला होता. नित्याचाच स्क्रिन फ्लिकरिंग चा त्रास. मागे (६-७ वर्षापूर्वी) सुमारे २०००/- रु. लावून दुरुस्तकरून घेतला होता.

तोच त्रास पुन्हा सुरू झालाय. मध्ये सुमारे १ ते २ वर्षे अडगळीत पडला होता. मोबाइलच्या HD recording च्या उपलब्धतेने कॅमकॉर्डर तसा विस्मरणात चाललाय!

अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा-फेसबुकसाठी रेडीमेड स्टेटस-पवनपरी11

Submitted by आरू on 2 September, 2017 - 02:44

खास तुमच्यासाठी फेसबुक रेडीमेड स्टेटस गणेशोत्सव धमाका ऑफर! स्टेटस प्रत्येकी २९९ रूपये

तुम्हाला स्टेटस करण्याचा कंटाळा आहे पण खूप लाईक्स आणि कमेंट्स मिळवण्याची ईच्छा तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत रेडीमेड स्टेटस जे तुम्हाला मिळवून देईल हजारो लाईक्स, कमेंट्स सोबत फेसबुकवर अफाट प्रसिद्धी. तुम्हाला फक्त एवढच करायच आहे की तुमचं यूजर नाव व पासवर्ड आम्हाला द्यायचा आहे त्याच्या दहा मिनीटांतच तुमचं स्टेटस पोस्ट झालेलं असेल.

"शेवटी तुमचा विश्वास हीच आमची कमाई."

त्वरा करा ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध.

संपर्क-http/rambharosefbstatus.com

कपडे आणि वगैरे द्यायचे आहेत..

Submitted by झंपी on 15 August, 2017 - 03:54

माझी एक ओळखीतली फॅमिली इथे भारतात परतत आहे, त्यातील स्त्रीला बरच सामान कमीच करायचे आहे.
तर त्यात आधी खालील वस्तु आहेत,
खरे तर तिला कोणा अतिशय गरजूला गेले तर बरे असे वाटतय , त्यातही भारतीय गरजूला ... कारण वस्तु त्यांनाच बहुधा उप्योगी पडतील..
ज्या गोष्टी भारतीय प्रकाराच्या नाहियेत, त्या ती अमेरीकेतच सालवेशनला देइल.
तसेही भारतात येवून तिला , मिनिमलिस्ट जगायचे आहे.

अबॅकस

Submitted by मी अमि on 9 August, 2017 - 04:49

अबॅकस बाद्दल माहिती हवी होती. कितव्या वर्षी मुलांना सुरुवात करू श्कतओ.
या बद्दल अनुभव असटील तर प्लीज शेअर करा. किती उपयोगाचे आहे ?

शब्दखुणा: 

पुणे अन फ्ल्याट विक्री .

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 26 May, 2017 - 04:04

आमच्या ओळखीचे एक गृहस्थ आहेत जे ठाण्याला राहतात पण त्यांचा एक २ BHK चा फ्ल्याट आहे, टेरेस सह . ऑफ बाणेर रोड पुणे च्या आसपास. सध्या त्यांना पैशांची गरज आहे त्यामुळे हा फ्ल्याट विकायचं म्हणतायत.. ६५ लाखाला. तिथली आम्हाला काहीच माहिती नाही आणि ते सध्या च्या परिस्तिथीत तिथे धावपळ करू शकत नाहीत.

तिथल्या काही एजंटस चा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मिळू शकतो का ?

किस्से आणि निरीक्षणं (भाग २)....ट्राफिक मधली गम्मत.

Submitted by बग्स बनी on 4 March, 2017 - 15:35

नमस्कार मायबोलीकर, कसे आहेत सगळे?
मागील भागात मी स्टेशन वरचा किस्सा सांगितला होता, या भागात मी काही गमतीदार निरीक्षणं मांडणार आहे. मला खात्री आहे, तुम्ही जेव्हा कधी रस्त्याने प्रवास कराल तेव्हा अशी निरीक्षणं करून स्ट्रेस फ्री व्हाल, आणि हसाल.

तमिळ शिका.

Submitted by केअशु on 22 February, 2017 - 13:02

तमिझ्(तमिळ)ही जगातल्या सर्वात प्रसिध्द अशा भाषांपैकी एक! सर्वात शुध्द द्रविड भाषा! म्हणूनच अन्य भारतीय भाषांच्या तुलनेत थोडीशी अवघड!
कामानिमित्य,प्रवासानिमित्य किंवा एक वेगळी भाषा म्हणून म्हणा,किंवा तमिळ चित्रपट,तमिळ संस्कृती यांची आवड,कुतुहल म्हणून म्हणा 'तमिळ' शिकावीशी वाटते.

अशा तमिळ शिकणार्‍यांसाठी एक WhatsApp समुह सुरु करत आहोत.

कृषी उत्पादनांचा अनियमित बाजार भाव आणि उपाय

Submitted by सेन्साय on 15 February, 2017 - 04:50

भारत सरकारने राष्ट्रीय कृषी योजना राबविल्यामुळे कृषी विकास दर हळूहळू वाढत आहे. मात्र शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी उपाय कमी पडत आहेत. तसेच पुरेशी गोदामे नसल्याने करोडो टन धान्य सडत आहे. भारतात पूर्वी शेतीवर ८० टक्के जनता अवलंबून होती. आता ५५ टक्के लोक शेती व संलग्न व्यवसायात आहेत. जोडपीमधील शेतीचा वाटा ३० टक्क्यांवरुन १५-१६ टक्क्यांवर आला आहे. एक तीळ सात जणांनी वाटून खावा, तशी परिस्थिती आहे. जगात भारत हा केळी, द्राक्ष, आंबे उत्पादनात पहिला, तर गहू, तांदूळ, साखर, पिकविणारा दुसरा देश आहे. मात्र हेक्टरी उत्पादकतेत आपण प्रगत देशांच्या तुलनेत कुठेच नाही.

Pages

Subscribe to RSS - सेवा-सुविधा