सेवा-सुविधा

NSC accrued interest rate

Submitted by मी अमि on 25 February, 2013 - 03:39

हा रेट अधिकृतरित्य कुठे उपलब्ध आहे. मला नेटवर सर्च केल्यावर काही चार्ट्स मिळाले पण त्यातला नक्की कोणता चार्ट योग्य आहे ते कळत नाही.

http://www.simpletaxindia.net/2011/02/nsc-accrued-interest-chart-kvpgold...

हे रेट्स बरोबर आहेत का?

भारतीय हवाईमार्गाचा इतिहास : माहिती हवी आहे

Submitted by गजानन on 16 January, 2013 - 11:41

नमस्कार मंडळी,

मला भारतीय हवाईमार्गाचा इतिहास, त्याचा विस्तार आणि आजवरची सर्वसाधारण वाटचाल याची माहिती हवी आहे. कृपया मदत करा. तुम्हाला यावरची पुस्तकं, आंतरजालावरचे दुवे ठाऊक असतील तर कृपया माहिती द्या.

धन्यवाद.

अग्निकोल्हा १८

Submitted by ssaurabh2008 on 8 January, 2013 - 21:33

सुप्रभात मित्रांनो. Happy
अग्निकोल्ह्याचे नवीन व्हर्जन आले आहे. (Firefox 18)
मोझिल्लाचे म्हणणे आहे की या नवीन व्हर्जनमध्ये पेज लोडींगची स्पिड २५ टक्क्यांनी वाढली आहे.

अजून काय नवीन आहे पाहण्यासाठी :
||
\/
What's New ?

पुण्या-मुंबईतून अमेरिकेत खाद्यपदार्थ कसे पाठवावेत?

Submitted by हायझेनबर्ग on 3 November, 2012 - 12:41

पुण्या-मुंबईतून अमेरिकेत तयार खाद्यपदार्थ पाठवण्यासाठी कुरिअर सेवा पुरवणार्‍या खात्रीलायक कंपन्यांची माहिती हवी आहे.
कुणाला एखाद्या कंपनीचा चांगला अनुभव आहे का?.
त्यांच्या चार्जेस वगैरे बद्दल काही कल्पना आहे का?
पार्सल पोहोचण्यासाठी साधारण किती दिवस लागतात?
खाद्यपदार्थ ई. गोष्टी पाठवण्यासाठीचे काही नियम आहेत का?
पॅकिंग मटेरियल वगैरे कुठलं चांगलं?
पॅकिंग कसं करावं ज्याने खाद्यपदार्थ प्रवासात जास्त दिवस टिकतील?

LED आणि LFD मध्ये काय फरक आहे?

Submitted by मी अमि on 1 November, 2012 - 01:33

LED आणि LFD मध्ये काय फरक असतो? LFD ला सेट टोप बॉक्स जोडून टिव्ही दिसू शकतो का?

सेट टॉप बॉक्स

Submitted by मी अमि on 4 October, 2012 - 03:27

सेट टॉप बॉक्स सरकारने बंधनकारक केला आहे. आता आम्ही केबल वापरत आहोत. तर हा बॉक्स केबल ऑपरेटर कडूनच घ्यावा लागेल की तो बाहेरही विकत मिळतो. कोणत्या कंपनीचा सेट टॉप बॉक्स चांगला आहे?

शब्दखुणा: 

लग्न समारंभ आणि भारतातले भाव..

Submitted by परदेसाई on 8 September, 2012 - 11:40

माझा एक मित्र मुलीचे लग्न भारतामधे बंगलोरला करतोय.. त्याच्याकडून मी ज्या गोष्टी ऐकतोय त्या अशा...
(लग्नाचे तीन दिवस , दररोज दोन तास. सगळे मिळून ६ तास)
DJ: एक सर्वसाधारण DJ. दिड लाख बिदागी, दोन Round Trip तिकीटे Hydrabad Banglore , तीन दिवस 4 Star + Hotel , एक A/c गाडी Innova आणि त्याबरोबर ड्रायव्हर. सर्वसाधारणपणे सगळे मिळून ४ ते ५ लाख.

Videographer साडे तीन लाख रुपये.

Flower Decor: १० लाख भरतीय फुले ते १८ लाख Orcids वगैरे.

पत्रिका: १०० रुपयापाससून ५००० रुपये प्रत्येकी.

हे सगळं ऐकल्यावर मला वाटतं..
१. माझे भारताबद्दल (किमतींबद्द्ल) बरेच गैरसमज आहेत.

सोसायटीचे अकाउंट्स आउटसोर्स करण्यासंबधी

Submitted by मी अमि on 15 August, 2012 - 13:40

काही सोसायट्यांमध्ये अकाउंट्स बनवण्याचे काम आउटसोर्स केले जाते, असे ऐकण्यात आहे. ज्याला outsource केले जाते तो टॅलीमध्ये अकाउंट्स मेंटेन करतो. तो जेव्हा गरज पडेल तेव्हा सोसायटीच्या पदाधिकार्‍यांना भेटून आवश्यक माहिती देतो/ घेतो. (म्हण्जे कायम स्वरूपी सोसायटीच्या कार्यालयात बसत नाही).

माझ्या भावाच्या सोसायटीत अशा व्यक्तीची नेमणूक करायची आहे. अशा प्रकारे अकाऊट्सचे काम करणारी व्यक्ती माहित असल्यास क्रूपया सांगा. सोसायटी माहिममध्ये आहे.

चहा कुठे प्यावा ?

Submitted by Kiran.. on 6 August, 2012 - 00:18

पुण्यातली चहाची प्रसिद्ध ठिकाणं कोणती ? त्या त्या ठिकाणच्या चहाचं आणि त्या दुकानाचं वैशिष्ट्य याबद्दलच्या चर्चेसाठी धागा.

घरामधे मदत हवी आहे.

Submitted by नीधप on 1 March, 2012 - 00:51

या संदर्भातला बाफ होता. त्यात अन्नपूर्णा म्हणून एका संस्थेचाही उल्लेख होता. तो शोधूनही सापडत नाहीये म्हणून हा नवीन बाफ.

मला चार-पाच महिन्यांकरता दिवसभरासाठी कामाला बाई हवी आहे.
बाबांचे डेन्चरचे मेजर काम आहे. आधीचे ब्रिज तुटलेत त्यामुळे आता पूर्ण एक्स्ट्रॅक्शन मग रूट बिल्डींग (स्क्रू घालून) आणि मग पर्मनन्ट डेन्चर्स असा सगळा मामला आहे. ट्रीटमेंट २-४ महिन्यांची आहे. त्या दरम्यान सुरूवातीला काही दिवस पूर्ण लिक्विड डाएट आणि मग हळूहळू चावायला न लागणारे असे डाएट (लापशी ते कुस्करलेली/ मिक्सरमधून काढून आमटीत भिजवलेली पोळी) असायला लागणारे.

Pages

Subscribe to RSS - सेवा-सुविधा