सध्या पुण्यात कुठल्याही हॉटेलात जा. मेनुकार्डावर व्हेज साइडचा मेनु असा काही असतो कि कसली भाजी आहे हे समजत नाही. पूर्वी मटर पनीर, पालक पनीर, भिंडी मसाला, बैंगन भरता, शाही रायता, दही रायता इ. इ. पदार्थ आवडीप्रमाणे मागवता यायचे. आता व्हेज जयपुरी, ६४, ९५, नवरतन कुर्मा, व्हेज कोल्हापुरी, सोलापुरी तडका, अमूक स्पेशल, तमूक स्पेशल, हैद्राबाद संगम इ. इ. अशा अगम्य नावाच्या भाज्या मिळतात. वेटरला जर विचारलं व्हेज जयपुरी काय आहे तर तो मिक्स सब्जी है मॅडम म्हणतो. नवरा शांत बस म्हणतो. पण मी ६४ काय आहे विचारते. त्यावर मिक्स सब्जी है उत्तर येतं. ९५ पण तेच. मग कुठल्या भाज्यांचं मिक्श्चर आहे हे विचारलं कि वेटर गडबडतो. मग तो किचनकडे धाव घेतो किंवा मॅनेजर येतो. बाईचा धसका सर्वांनी घेतलेला असतो.
पण मी काही सोडत नाही. तो आतून येऊन सांगतो थोडा मटर है, कोबी है, अमूक है, तमूक है. मग नवरतन.. पुन्हा तीच प्रोसीजर रिपीट. तेच इनग्रेडियंटस. जवळजवळ सगळीकडे हेच. कुणाचे दर काय असावेत याबद्दल काही बोलत नाही. पण घरी आठवडाभर आरामात खाऊ इतके दर आकारल्यानंतर पण भोजनभाऊंना यजमान काय खाऊ घालणारेत हेच समजणार नसेल तर त्याला काय अर्थ आहे ? हॉटेलचा हा रोग आता केटरींग वाल्यांनाही लागलाय. स्पेसिफिक मेनू बद्दल आग्रही राहील्यास नाराजीदर्शक आठ्या पडतात यांच्या कपाळावर. रेट बादमे बोलता हूं हे वरून उत्तर !
पूर्वीसारखा स्पष्ट मेनू असणारी हॉटेलं अजूनही कुठे चालू असतील तर मला माहीत नाही. मा़झ्या पाहण्यात तरी हेच चित्र सर्वत्र आहे. नवरा मात्र चिकनखोर असल्यानं तो सुखी आहे. त्याला चिकनचे सुखाने लचके तोडताना आणि मला दर वेळी पनीर टिक्का (माहीत असलेली डिश ऑर्डर करायच्या हट्टापायी) खाताना कसंसच होतं. असं वाटतं कि त्याची प्लेट ओढून घ्यावी आणि आपणही तसेच लचके तोडावेत. पण काय करणार, अबला (व्हेज) नारी पडले ना ! आमच्या नशिबी ६४ नाहीतर ९५ च.
तुमची प्रेमळ
खादाड आत्या
कुणाला काही खटकत नाही ?
कुणाला काही खटकत नाही ?
खादाड आत्या | 18 March, 2013
खादाड आत्या | 18 March, 2013 - 14:14 नवीन
कुणाला काही खटकत नाही ?<<<
खादाड आत्या स्वतःला प्रेमळही म्हणवते हे खटकत असेल काहींना
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लेख छान आहे. चिकनखोर शब्द आवडला.
प्रॉब्लेम कळाला नाही. नवरा
प्रॉब्लेम कळाला नाही. नवरा चिकनखोर आहे हा प्रॉब्लेम आहे का ?
बादवे . तुमच्या
बादवे .
तुमच्या माहितीसाठी...चिकन ६५ व चिकन ९५ च्याही डिश आहेत बरं !
बेसिक ग्रेव्ही कोणती
बेसिक ग्रेव्ही कोणती विचारयाचं.
आपल्याला जी आवडते / झेपेते त्या ग्रीव्हीमधली भाजी मागवायची. शिम्पल.
असं वाटतं कि त्याची प्लेट
असं वाटतं कि त्याची प्लेट ओढून घ्यावी आणि आपणही तसेच लचके तोडावेत. पण काय करणार, अबला (व्हेज) नारी पडले ना !>>>>>>>>>> म्हणजे वेज खाते ती नारी अबला असते???? का लचके तोडण्याइतपत बल नाहीये म्हणुन अबला????
तुम्ही कोणत्या हॉटेलात जाता
तुम्ही कोणत्या हॉटेलात जाता त्यावरही अवलंबून असते. माझ्या पाहण्यात तीन-चार हॉटेल्स तरी अशी आहेत जिथे मेनूकार्डावर त्या त्या पदार्थाच्या नावाखाली त्यात कोणकोणत्या भाज्या, कोणत्या प्रकारची ग्रेव्ही वापरली आहे, पाकसिद्धीची कोणती प्रक्रिया वापरली आहे (बेक्ड, ग्रिल्ड, रोस्टेड, शॅलो-फ्राय, डीप-फ्राय इ. इ.) हे लिहिलेले असते. अशा ठिकाणी गेल्यावर ते मेनूकार्ड वाचत बसणे हा माझा छंद आहे!
वाचता वाचता एकतर भूक खूपच खवळते किंवा वाचूनच पोट भरते! ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
असं वाटतं कि त्याची प्लेट
असं वाटतं कि त्याची प्लेट ओढून घ्यावी आणि आपणही तसेच लचके तोडावेत. पण काय करणार, अबला (व्हेज) नारी पडले ना !>>>>>>>>>> ugichach kashala mann marat rahaych khaushi vatat non-veg tar saral khayach na !!!!! 'abala' kashasathi kalal nahi????
असच कुठेतरी लेखन वाचल्यासारखे
असच कुठेतरी लेखन वाचल्यासारखे वाटत आहे..............इथेच मायबोलीवर......
<असच कुठेतरी लेखन
<असच कुठेतरी लेखन वाचल्यासारखे वाटत आहे..............इथेच मायबोलीवर...... >
http://www.maayboli.com/node/40988
...
...
खरंआहे, पंजाबी डिशेस च्या
खरंआहे, पंजाबी डिशेस च्या नावा खाली नुसता उच्छाद मांडलाय या हॉटेल वाल्यांनी. एक लाल ग्रेव्ही किंवा एक हिरवी ग्रेव्ही, काही उकडून ठेवलेल्या भाज्या, पालकाचा चिखल, अस काहीतरी एकत्र करून तेलाचे ओघळ येत असणार्या भाज्या हे लोक वाढतात. बचकभर तिखट अन चार लाल मिरच्या वर टाकल्या की म्ह्णे व्हेज कोल्हापूरी. मूळ लज्जतदार पंजाबी खाण्याची नखाएवढीही सर येणार नाही. खाणारे बिचारे खात असतात नंतर पोटाचे बारा वाजतात ते निराळच.
एकदम खरे श्रीकांत. हॉटेलमधुन
एकदम खरे श्रीकांत. हॉटेलमधुन काही मागवायचे म्हंटले की माझे आणी नवर्याचे भांडणच होते. फारतर मटर पनीर किंवा मटार घातलेला कुठलाही रस्सा मी पसंत करते. त्या एकसारख्या लागणार्या चवीने वैताग आलाय. .नवरा नॉनव्हेजखाऊ असल्याने तंदूर बिंदूर चालवुन घेतो, पण माझी जाम पंचाईत होते.
आणी व्हेज कोल्हापूरी काय? तसा मसाला ही नाही आणी भाज्या पण नाहीत. खरे तर वाटत जाऊन पाणीपुरी किंवा भेळ हाणावी आणी गप्प बसावे.:फिदी:
मग शेवटी सगळ्या भाज्या घरी बनवुन झाल्या ( स्पेशालिटी वाल्या नव्हे) की मी पिठल्यावर उतरते.
(No subject)
तंदूर म्हणजे पदार्थ एका
तंदूर म्हणजे पदार्थ एका विशिष्ट प्रकारे भट्टीत भाजायची क्रीया. मग काहिही भाजू शकता.
तंदूरी रोटी खाल्ली नाहीत का?
(No subject)
हो. एक मोठा रांजण असतो, खाली
हो. एक मोठा रांजण असतो, खाली निमुळता न होता बॅरल सारखा असतो. त्याला तंदूर म्हणतात. त्यात खाली जोरदार निखारा पेटवतात अन वरतून रोट्या थापून त्या गरम मातीच्या भांड्याला आतून चिकटवतात. याला तंदूर रोटी म्हणतात.
व्हेज्/नॉनव्हेज पदार्थ सळईत खुपसून आत सोडतात.
खादाड आत्या, हॉटेलात आपण का
खादाड आत्या,
हॉटेलात आपण का खातो ?
इब्लिस - जबरी फोटो.
इब्लिस - जबरी फोटो. आत्याबाईंचे profile ही भारी![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अरे बापरे .... प्रेमळ खादाड
अरे बापरे .... प्रेमळ खादाड आत्याची हडळ झाली का? आता काय खाणार म्हणतो मी?
मंदार क्ट्रे, तुमालाच खानार
मंदार क्ट्रे, तुमालाच खानार ती आता
प्रेमळ खादाड आत्याची हडळ
प्रेमळ खादाड आत्याची हडळ >>>>>>>
![donald-duck-022007-3.gif](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u5620/donald-duck-022007-3.gif)
हसायला काय झालं
हसायला काय झालं![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)