भारताच्या सर्वोच्च न्यायालयात ई-शासनाच्या माध्यमातून याचिका दाखल करण्याविषयी
खालील माहिती ही अगोदरच भारत सरकारच्या व अन्य संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
इंग्लिशमधून माहिती येथे मिळेल.
सर्वोच्च न्यायालयात दाव्याचे ई-फाईलिंग करणे
खालील माहिती ही अगोदरच भारत सरकारच्या व अन्य संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
इंग्लिशमधून माहिती येथे मिळेल.
सर्वोच्च न्यायालयात दाव्याचे ई-फाईलिंग करणे
गुगलने गुजराती पासून कन्नड पर्यंत भाषांच्या भाषातराची सोय केली आहे पण त्यातून मराठीला वगळण्यात आले आहे. याविरुद्ध दाद मागण्यासाठी भरत गोठोसकर यांनी एक ऑनलाईन याचिका बनवली आहे. याद्वारे किमान काही आवाज तरी निर्माण होईल अशी आशा आहे.
आपल्या लेखात भरत म्हणतात, 'भारतीय भाषांमध्ये प्रथम हिंदीला २००८ साली या सेवेत समाविष्ट करण्यात आले. या देशातील अन्य भाषांना यासाठी तीन वर्षे वाट पाहावी लागली. आता गुगलने उर्दू, बंगाली, तेलुगू, तमिळ, कन्नड व गुजराती या भाषांनाही सामील करून घेतले आहे. मराठी मात्र वळचणीला टाकली आहे!'
मी पहिल्यांदाच एकटी भारतात जाणार आहे. त्यात मुंबई -पुणे हा प्रवासही एकटीने करायचा आहे.कोणाला मुंबई ईटरनॅशनल एअरपोर्ट ते पुणे जाण्यासाठी रिलायबल टॅक्सी/बस सेवा कुठली आहे हे माहीती आहे का? फ्लाईट मध्यरात्री पोचले तर सकाळ पर्यंत एअरपोर्ट वर थांबायचे का (एकटी आहे म्हणुन) की रात्रीच टॅक्सी /बस मिळते? आता मुंबई ईटरनॅशनल एअरपोर्ट ते पुणे (सिंहगड रोड) जाण्यासाठी जायला साधारण किती वेळ लागतो?
माझ्या साबा आणि साबु दोघाना पर्वती जवळ बजेट लॉज हवे आहे. माहिती मिळू शकते काय?
प्रस्तावना:- सदर लेख माझी बायको मंजिरी घाटपांडे हिचा असून ती व्यवसायाने रिअल इस्टेट कन्सलटंट /ब्रोकर आहे. नोंदणी खात्यातील नोकरीचा पुर्वानुभव असल्याने त्याचा उपयोग कदाचित मायबोलीकरांना होउ शकेल यासाठी हा लेख इथे देत आहे. मी फक्त या ठिकाणी वाहक आहे. लेखातील मुद्द्यांविषयी वा शंका /कुशंका /माहिती साठी थेट लेखिकेशी संपर्क करावा. manjiri[dot]ghatpande[at]gmail[dot]com
काही बाबतीत मी दुवा म्हणुन काम करु शकेन
-------------------------------------------------------------------------------
भारतीय टपाल ऑफिस गाईडच्या ६३ व्या कलमान्वये आता पोस्टल ओळखपत्र देण्यात येणार आहे.
अनेकदा लोक आपापले निवासस्थान बदलतात. त्यांना आपल्या नव्या पत्त्याचा सरकारी पुरावा सादर करणे बर्याचदा अवघड होऊन बसते. भारतीय टपाल खात्याने त्यावर एक उपाय शोधला आहे. टपाल खात्याकडून तुम्हाला आता तुमच्या निवासाचा पुरावा तुमच्या फोटोसहित मिळवता येतो. टपाल खाते हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्यामुळे त्यांच्याकडून मिळणारे ओळखपत्र हे ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र इत्यादींप्रमाणेच प्रमाणित ठरते. बँकेत खाते खोलण्यासाठी, टेलिफोन व गॅस कनेक्शनसाठी इत्यादी या ओळखपत्राचा उपयोग होतो.
स्टॅमफर्डमध्ये जय हो मार्केट नावाचे नवीन ग्रॉसरी स्टोअर उघडले आहे. गावात रहाणार्या लोकांना थोडे (एक मैल) लांब पडेल पण भाव सगळे न्यु जर्सी मधल्या दुकानांसारखे आहेत. विशेषत: तांदूळ, गव्हाचे पीठ, डाळी, कडधान्ये. नवीन दुकान आहे त्यामुळे एखाद-दोन गोष्टी (पाणीपुरीच्या पुर्या, भेंडी, कडिपत्ता इ.) हमखास मिळत नाहीत. पण ट्रीटमेंट चांगली आहे आणि मालक-मालकिण काय हवेय ते शोधायला मदत करतात.
हा पत्ता आणि नंबर: १११ High Ridge Plaza Stamford CT 06902 (203-588-9455)
नमस्कार,
मला जरा माहिती हवी आहे. आमचं पिट्सबर्गला/कनॉन्सबर्गला मुव्ह होण्याचं चाललं आहे. मला तिथल्या चांगल्या रेंटल अपार्टमेंट्स बद्दल माहिती हवी आहे. शक्यतोवर कनॉन्सबर्गच्या जवळ असं हवं आहे. किंवा कमीत कमी आय ७९ च्या अगदी जवळ राहिल असं तरी.
आम्ही ईंटरनेट वर शोधतोच आहे. एक दोन बरे वाटतात आहेत पण तरिही जर कोणी त्या भागात राहणार्या व्यक्तीनी मार्गदर्शन केलं तर उत्तम असेल असं वाटतं आहे. नवर्याचं ऑफिस मोस्टली कनॉन्सबर्गलाच राहिल त्यामुळे शक्यतोवर त्याच्या जवळच असलेलं उत्तम असा आमचा विचार आहे.
धन्यवाद.
ग्रामीण भागातील शेती मध्ये दुध अन ऊस हे महत्वाचे घटक आहेत! दुधाचे काम सुरु आहे. मग ऊसाबद्दल विचार सुरु केला..... साखर कारखाना काढण्याची ऐपत तर नाही! पण एक १०० टन प्रतिदिन गाळप क्षमतेचे गुळ उत्पादन केंद्र (गुर्हाळ/ खांडसरी/कहाकी-काकवी) बनवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
काही सरकारी अन काही खाजगी बॅन्कांकडे तीस लाख रुपयाच्या प्रकल्पाला ६० लाख रुपयाचे तारण देऊनही कर्ज मिळेना! सॅटरडे क्लब ह्या मराठी व्यावसायीकांच्या संघटनेलाही साकडे घातले...पण हाती आले शुन्य! शेती अन पुरक उदयोगांची हीच खरी अडचण आहे....इथुन परतल्यावर पुन्हा प्रयत्न करेलच!
यासंदर्भात सध्या काही गोष्टी करतो आहे-
दहा-पंधरा वर्षे नोकरी केल्यानंतर स्वतः चे वेगळे अस्तित्व निर्माण करावेसे वाटते. एका मायबोलीकराने तर तब्बल साडे तीन महिन्यांच्या नोकरी च्या अनुभवावर स्वतः ची कंपनी सुरु केली अन ते आज एक यशस्वी उद्योजक गणले जात आहेत! 'स्वः निर्मीती चा आनंद काही वेगळाच असतो' हे अनुभवाने माहिती झालेले असते. अश्या वेळी आपल्या सारखे कुणी आसपास आहेत का हे बघणे गरजेचे असते. असतील तर आनंद होतो. 'एकमेका साह्य करु अवघे धरु सुपंथ' ह्या संतवचनाची आठवण होते.