भाडं किती घ्यावं?

Submitted by डीडी on 22 August, 2013 - 10:31

नमस्कार,

थोडी माहिती हवी होती.
माझा पुणे बावधन (चांदणी चौक पासून १ साधारण १ किमी) येथे परांजपे स्कीम मध्ये २ बीएचके फ्लॅट आहे. त्यात कोणतंही फर्निचर नाही आहे. तर मला एक ओळखीचा भाड्याने घेण्यासंदर्भात विचारात आहे..
तर मी किती भाडं सांगावं?
डेपॉज़िट किती घ्यावं?

मी पुण्यात रहात नसल्याने मला तितका अंदाज नाही.
धन्यवाद!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जुनी इमारत असेल तर माझ्या अंदाजाने भाडे - ८ ते १० हजारपर्यंत. डिपॉजिट - ३० ते ५० हजारांपर्यंत.

पावती किती व कशी द्यावी हा प्रश्नही विचारा.
घरपट्टी/सोसायटी कोण भरणार आहे?

टोटल भाडे समजा ८ हजार सांगणार असाल, तर पावती देताना त्यात, उदा. २००० रुपये सोसायटीपोटी, व १८०० रुपये प्रति महिना घरपट्टी पोटी घेतले. भाडे फक्त ४,२००. असे नमूद करा. तुमच्या वार्षिक भाड्यावर बेस्ड घरपट्टी येते. तुमच्या पावतीच्या टोटलवर भाडेकरूस घर भाडे भत्ता मिळतो.

शिंदे नगरात किमाण ५० हजार डिपॉझिट २ बीएचकेला आहे.

महत्वाचे मुद्दे:
१. घर माझ्या मालकीचे आहे, इतर लोक १०० रुपयात देत असतील, मला हवे तर मी १००० सांगू शकतो. घ्यायचे की नाही हे त्यांनी ठरवावे.
२. कितीही जवळचा मित्र असला तरी कायद्याने करायचे कागद पूर्ण केल्याशिवाय पैशाचा वा कुठलाच व्यवहार करू नये.

डीडी
९ -१० हजार आरामात! समोरची पार्टी व्यवस्थित असेल तर १-२ हजार कमी ठेवले तरी चालतील.कारण लाखमोलाचे घर त्यांच्या ताब्यात असते.बाकी इब्लिस यांनी योग्य ते सांगितले आहेच.

लगे हाथों माझाहि प्रश्ण....महात्मा...२BHK...नवीन almost.....किती भाडं expect करावं??

www.magicbricks.com
www.99acres.com
www.makaan.com
या साईट्स वर जाउन २ बेडरूम फ्लॅटचे तुमच्या एरीयात किती भाडे आहे ते अंदाज घेउ शकता.

१.भाडे करार रजिस्टर करावा.
२.भाडेकरुचे पोलिस वेरिफिकेशन पुण्यात अनिवार्य आहे.

कमीत कमी भाडे हे घराच्या (सध्याच्या ) किमतिच्या २ % असावे....जास्तीत जास्त भाडे हे मार्केट रेट बघुन ठरवा !! Wink