आभाळमाया..!! - (उत्तरार्ध)
____________________________________
https://www.maayboli.com/node/79164#new
दुसऱ्या दिवशी दीक्षाला घेऊन विशाल घरी आला. दोघांच्या येण्याने घर आनंदानं भरून गेलं.
मी कितीही लपवण्याचा प्रयत्न केला , तरी माझ्या चेहर्यावरचे भाव माझ्या लेकाने बरोबर ओळखले.
स्वयंपाक घरात येऊन शेवटी विचारलंच त्याने ...!
"काय झालं..आई..?? बरं नाही का तुला ..? चेहरा सांगतो बघ तुझा ..!"
आता काय सांगणार मी त्याला..??
आभाळमाया..!! (पूर्वार्ध)
_________________________________________
कोणती - कोणती भाजी घ्यावी बरं..??
विशाल उद्या दीक्षाला घेऊन घरी येतोयं ... हं ..दुधी घेऊया का बरं.. दुधी हलवा बनवायला..??
लहानपणापासूनच दुधी हलवा खूप आवडतो माझ्या विशालला....!!
अळूवड्या बनवायला पाहिजेत दीक्षासाठी.. तिला खूप आवडतात माझ्या हातच्या अळूवड्या..! नव्या सुनेचे सासूबाईच्या नात्याने थोडे लाड करायला नको का..??
एकाच शहरात लांब - लांब राहतो बरं आम्ही..!
पहिल्यांदा हिंदीत कविता लिहिली आहे.
व्याकरणात काही चुका असल्यास नक्की सांगा.
छोटेसे घरों में सपने ...
छोटेसे घरों में सपने अक्सर ही बडे होते है !
कुछ करके ही मानेंगे इस जिद पे अडे होते है !
आजादी के दिन झंडे हम उँचे तो रखते है ,
क्यों अगले दिन देखो तो रस्ते पे पडे होते है !
जल्दी में खरीद ना लेना ये दिल भी फलों के जैसा ,
जो उपरसे चमकिले अंदरसे सडे होते है !
अब झूठ के दर पर ही है भीड दिखाई पडती ,
सब सच के रस्ते पर क्यों मुश्किल से खडे होते है !
कळा ज्या लागल्या जिवा !...
नुकतेच आपल्याकडे चक्रीवादळाच्या प्रभावाने काही जोरदार पाऊस झाले. किनारपट्टीच्या भागातले असे पाऊस म्हणजे निसर्गाचे रौद्र रूप असते. त्याचे कोसळणे हे भयानक असते. त्या तुलनेत माझ्या भागात झालेला पाऊस तसा मध्यमच होता. असाच एक पाऊस खिडकीतून पहात मी खुर्चीवर बसलो होतो. पावसाच्या पडण्याचा आवाज बऱ्यापैकी होता. पाऊस पाहताना मला काहीशी तंद्री लागली आणि मनाने मी कित्येक वर्षे मागे पोचलो. तेव्हाची एक आठवण अगदी डोळ्यांसमोर उभी राहिली.
सगळे दात दाखवून अगदी उन्हासारखं झगझगीत हसायची ती. छोटेसे मानेपर्यंत कापलेले कुरळे पण काळेभोर केस दोन्ही कानामागे तर्जनीने सरकवत राहणे हा चाळाच मुळी. तिच्या गोऱ्यापान तुकतुकीत कपाळावर महिरपीसारखे दिसायचे ते केस. दौतीत बुडवून सरळ लिहायला सुरू करावं असं टोकदार, धारदार नाक. काळेभोर आणि पाणीदार डोळे. इवलीशी जिवणी आणि त्याखाली त्याहून इवली हनुवटी. डाव्या गालाला खळी पडायची तिच्या. उंच, सडपातळ बांधा. चेहऱ्यावर कायमच निर्भीड, करारी भाव. माझ्या समोरच्या टेबलावर दोन-तीन भली थोरली पुस्तकं घेऊन नोट्स काढत बसलेली असायची.
सत्येन देसाई आमच्या कंपनीत गेली पंधरा ते वीस वर्ष होता. असं म्हणतात की कंपनीच्या सुरुवातीच्या काळात सत्येन एक दोन वर्ष तरी सगळी कामं एकटाच सांभाळत असे. (अर्थातच हे आमचा एम. डी. सांगतो. ) त्यामुळे स्वीपर पासून अगदी एम. डी पर्यंत सर्वांचच रुटीन त्याला माहीत होतं. तसच तो कोणतंही काम करायला तयार असे. म्हणून त्याला ऑफिसमध्ये फार भाव होता. जर एखादं काम तुम्हाला जमत नसेल , म्हणजे तुमच्याबरोबर मिटिंग ऍटेंड करणं, बजेट तयार करण , बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मिटिंग कंडक्ट करणं इथ पासून ते डांबरट कस्टमर कडून वसूली करणं, चहा नाश्ता आणण्या पर्यंत वगैरे सर्व कामं तो करीत असे.
...... 'अर्हंत' 'अवंतिका' चा हात हातात घेऊन थिरकत होता. 'तुम मिले दिल खिले और जीने को क्या चाहिये' या रोमँटिक गाण्यावर! ते दोघेही टेरेस वर होते.'अर्हंत' टेरेस फ्लॅटला राहायचा तेराव्या माळ्यावर. 13 बी नंबरच्या फ्लॅटमध्ये! अमावस्येची ती रात्र होती. त्यामुळे आकाशात सर्वत्र काळोख होता.'शशी' ढगांच्या आड कुठेतरी गडप झाला होता. मंद वारा वाहत होता. त्या मंद वाऱ्याची गार झुळूक दोघांच्याही मनाला स्पर्शून जात होती.जणू सौहार्दाचे नाते जडले होते त्या दोन जीवांमध्ये! आज अर्हंत चा वाढदिवस होता. रविवार 13 एप्रिल. अर्हंतने अवंतिका चा हात हातात घेतला आणि म्हणाला.
" आई, काय ग कशी वागतेस तू. तुला ना कधी कसं वागायचं ते समजतच नाही. शी, लाज आणतेस कधी कधी." श्वेताचे जळजळीत शब्द ऐकून सीमा अगदी अवाक झाली.
" अग काय झालं काय एवढं?"
" आणि वर मलाच विचारतेस? का केलास तू मुग्धाच्या आईला फोन?" आपले संतापातिरेकाने भरलेले डोळे दिसू नयेत म्हणून श्वेता पाय आपटत तिच्या खोलीत निघून गेली. सीमा हतबुद्ध होऊन तिच्याकडे पाहतच राहिली.
तशा श्वेताच्या दिवसभरात लहान मोठ्या कुरबुरी चालूच असायच्या पण आताची वेळ वेगळी आहे हे लक्षात आल्यावर सीमा तिच्या खोलीत गेली.
"श्वेता, मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे, इकडे येऊन बस."