सत्येन देसाई
Submitted by मिरिंडा on 29 May, 2021 - 08:24
सत्येन देसाई आमच्या कंपनीत गेली पंधरा ते वीस वर्ष होता. असं म्हणतात की कंपनीच्या सुरुवातीच्या काळात सत्येन एक दोन वर्ष तरी सगळी कामं एकटाच सांभाळत असे. (अर्थातच हे आमचा एम. डी. सांगतो. ) त्यामुळे स्वीपर पासून अगदी एम. डी पर्यंत सर्वांचच रुटीन त्याला माहीत होतं. तसच तो कोणतंही काम करायला तयार असे. म्हणून त्याला ऑफिसमध्ये फार भाव होता. जर एखादं काम तुम्हाला जमत नसेल , म्हणजे तुमच्याबरोबर मिटिंग ऍटेंड करणं, बजेट तयार करण , बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मिटिंग कंडक्ट करणं इथ पासून ते डांबरट कस्टमर कडून वसूली करणं, चहा नाश्ता आणण्या पर्यंत वगैरे सर्व कामं तो करीत असे.