निर्णय
“आई, आज मी जरा बाहेर जाऊन येऊ का? चालेल नं?” विशाखाने सकाळचे चहाचे कप आवरता आवरता विचारलं.
“अगं, जा नं. मी तर म्हणतेय, तू आता तुझ्या घरी पण जायला हरकत नाही. किती दिवस रहाणार अशी इथे..” आई म्हणाली.
“घरी जाण्याचं नंतर बघेन. आज जरा थोडी बाकीची कामं करायची आहेत. येतांना पूजाकडे पण जाणार आहे. जेवायला थांबू नकोस. मी येईन सावकाश.”
“बरं. पण का गं, मंदार आला नाही एवढ्यात? माझंही लक्ष नव्हतं.” आईने काळजीने विचारलं.
“आला होता तो. तू झोपली होतीस.” पुढचे प्रश्न टाळण्याकरिता विशाखा पटकन बाथरूम कडे वळली.
" आई, काय ग कशी वागतेस तू. तुला ना कधी कसं वागायचं ते समजतच नाही. शी, लाज आणतेस कधी कधी." श्वेताचे जळजळीत शब्द ऐकून सीमा अगदी अवाक झाली.
" अग काय झालं काय एवढं?"
" आणि वर मलाच विचारतेस? का केलास तू मुग्धाच्या आईला फोन?" आपले संतापातिरेकाने भरलेले डोळे दिसू नयेत म्हणून श्वेता पाय आपटत तिच्या खोलीत निघून गेली. सीमा हतबुद्ध होऊन तिच्याकडे पाहतच राहिली.
तशा श्वेताच्या दिवसभरात लहान मोठ्या कुरबुरी चालूच असायच्या पण आताची वेळ वेगळी आहे हे लक्षात आल्यावर सीमा तिच्या खोलीत गेली.
"श्वेता, मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे, इकडे येऊन बस."
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी व्यक्ती अशी असते जी आपल्या खूप जवळची असते, आपली असते, जिच्या सोबत असताना कुठलाही संकोच नसतो की कसलेही वागण्या बोलण्याचे बंधन नसते. अगदी असाच होता तिचा अमित. तिचा जोडीदार जो कधीच तिचा होऊ शकला नाही.