कळा ज्या लागल्या जिवा !...
Submitted by Sujata Siddha on 31 May, 2021 - 05:41
माझ्या अवतीभवती बऱ्याच अश्या स्त्रिया आहेत ज्यांनी आपलं घर, कुटुंबाला प्राधान्य देत समाजात स्वतःची अशी एक ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. अश्या काही स्त्रियांचं काम, कला आपल्या पर्यंत पोचवण्याचा मी प्रयत्न करते आहे. ह्या मालिकेतली पहिली स्त्री होती, बाहुल्यांच्या दुनियेत रमणारी रमणी. त्याला आपण सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला. मनापासून सगळ्यांना धन्यवाद! आज जिच्याबद्दल मी लिहिणार आहे, ती आहे सुप्रिया पोतदार. सुप्रिया चारचौघींसारखीच एक मुलगी. पदवी घेतली, नोकरी केली, जोडीदार स्वतः शोधला, लग्न झालं, संसार सुरू झाला....... आटपाट नगरातल्या सर्वसामान्य मुलीची कहाणी.