काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो....
चिनी अधिकारी प्रवेशतो- "अजुनी वेळ गेलेली नाही. अणूबॉम्बचे रहस्य सांग. आम्ही तुझी मुक्तता करु. अन्यथा या नीरव शांततेत काही वेळातच, प्रत्येक ठिबकणार्या थेंबाचा आवाज तुला घणाघाती वाटत जाईल. तुला वेड लागेल वेड. अरे वेड्या एकदा तसे झाले की कुठली मातृभूमी आणि कुठले देशप्रेम! "
"चालता हो. प्राण गेला तरी मी ते रहस्य तुमच्या हाती पडू देणार नाही. जय हिंद!"
या कहाण्यांनी मला काय दिलं? इतका जमाखर्च अजून मांडला नाही. कधी फार व्रत केली नाहीत, जी एक-दोन हातून घडली त्यात श्रद्धा कितपत नि परक्या गावात ‘सोशलायझेशनार्थ’ कितपत हे ही उमगलं नाही. माझ्या टिवल्याबावल्या सोसल्याबद्दल श्रद्धेने व्रते करणाऱ्यांची मी ऋणी आहे. उतराई होण्यापेक्षा काही ऋणातच मोक्ष आहे _/\_. काहींनी अजून कथा सुचवल्या पण त्या नंतर कधी लिहीन. ह्या श्रावणातील ही शेवटची कथा…
__________________
भाग १ वाचायचा असल्यास. नाहीतर जसा 'धूम' कुठलाही भाग पाहिला तरी चालतो तशी ही कथा आहे. आधीच्या भागात दोन बहिणी असतात, एक कथा ऐकल्याने श्रीमंत रहाते, तर दुसरी न ऐकल्याने गरीब होते एवढे एकोळीचे कथानक घडले आहे.
नमस्कार.
'पुस्तकगप्पा' या नव्या उपक्रमाची ओळख करून देण्यासाठी हे टिपण.
लायब्रऱ्या, कागदी पुस्तकांची दुकानं, वर्तमानपत्रातली मराठी पुस्तकांची जागा आक्रसत जात असताना, मराठीतल्या महत्त्वाच्या, लोकप्रिय, रंजक, अनवट, नव्याजुन्या पुस्तकांवर गप्पाटप्पा करण्यासाठी या कार्यक्रमाची कल्पना सुचली. प्रत्यक्ष भेटणं दुरापास्त होण्याचं एक सकारात्मक फलित म्हणजे कार्यक्रम करण्यासाठी जागा आणि तिथवर सदेह पोचण्यातल्या अडचणी हे दोन्ही प्रश्न रद्दबातल होणं. ते पथ्यावर पडल्यानं ही कल्पना ऑनलाईन राबवायची ठरवली.
ऐका आदित्यराणूबाई तुमची कहाणी.
आटपाट नगर होतं. त्या नगरांत एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा, फुलं, दूर्वा, आणायला रानांत जात असे. तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या.
-(नॉर्थ इंडियन प्रोड्यूसर असेल तर ह्या पांढऱ्या हाफ साडीत, साऊथ इंडियन असेल तर श्रीदेवीच्या ‘ताथैय्या ताथैय्या’ ड्रेस मध्ये मात्र रुद्राक्षासहित दिसतील. आपला मराठी प्रोड्यूसर असल्याने मगनलाल ड्रेसवालाचा ‘कर्नलच्या पोरी तुझे हिथं काय काम गं’ ड्रेस मध्ये नागकन्या देवकन्या भेटल्या).