"माणगाव आलंय, ज्यांना उतरायचं आहे त्यानी पटकन उतरा. गाडी जास्त वेळ स्टॉपवर थांबणार नाही." कंडक्टर नेहमीच्या सवयीने ओरडला.
त्या आवाजामुळे अजिंक्य खडबडून जागा झाला आणि घाई घाईने आपले सामान उतरवू लागला.
"तुम्हाला इथे उतरायचे आहे का?" अजिंक्यच्या शेजारील प्रवाशी उठून बाजूला होत विचारू लागला.
"हो." अजिंक्यने स्मितहास्य करत उत्तर दिले आणि उतरण्यासाठी दरवाजा जवळ जाऊ लागला.
"अहो! लवकर उतरा चला, गाडीला जास्त वेळ थांबता येणार नाही" कंडक्टर थोडा नाराजीच्या सुरात म्हणाला.
अजिंक्य उत्तर न देताच खाली उतरला आणि सवयीप्रमाणे स्टॉपवर असलेल्या नवनाथ रसवंती गृहात शिरला.
Attached for your reading pleasure is an article from my Marathi eBook
https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=280721062030&P...
ग्रेस
मुळात ग्रेस म्हणजे एक मोठे गारुड आहे. एखाद्या आरसे महालात गेल्यावर एकाच व्यक्तीच्या प्रतिमा वेगवेगळ्या कोनांतून दिसाव्यात की प्रत्येक प्रतिमेचा भिन्न भिन्न भास व्हावा, आपल्याच मनाला भुरळ पडावी की खरी प्रतिमा सुंदर की ती व्यक्ती? असेच काहीसे घडते पुष्कळदा. आठवणींना अंत नाही हेच खरे.
माझे प्रेरणा स्त्रोत असलेले महाकवी ग्रेसना ही कविता समर्पित.
अथांग साहित्याच्या सागरात
एक माणिक खास चमकून गेला
आपल्या शैलीशी तडजोड न करणारा
एक महाकवी असाही होऊन गेला
अर्थाचे जाळे त्याला शब्दांची किनार
त्याचे काव्य जणू विश्वाचा आकार
गहन अन् गंभीर विषयाला गुढतेचे वलय
कवी ग्रेस म्हणजे कोणी साधा कवी नव्हे
एक एक शब्द जणू परका वाटावा
अगदी विद्वाना देखील अर्थ न लागावा
असेच आहे काहीसे ग्रेस चे साहित्य
वाचकांना मंत्रमुग्ध करणारी भाषेची किमया
- अक्षय समेळ.
'सोडून जाशील अर्ध्यावरती'
दिलास हा अभिशाप मला
जाता जाता विस्मरणाचा
दिलास तू उ:शाप मला
तुला, नशीबा..; बोल लावू मी (?)
कणखर केले तूच मला
चौकट व्यापक करण्याचेही
तूच दिले सामर्थ्य मला
तुझ्या नि माझ्या मधले अंतर
'मिटावेच', ना ध्यास मला
जसे नि जेव्हा, जे जे होईल
विना शर्त ते मान्य मला
(तशी जुनीच आहे ही कविता. इथे आणली नव्हती हेच लक्षात नव्हत, ते आज लक्षात आलं म्हणून इथे आणली)
गावाबाहेरचा हा पिंपळाचा पार म्हणजे गावातल्यांची हक्काची जागाच होती म्हणा ना. इथे बसलं की गावात येणाऱ्या जाणाऱ्यावर नजर ठेवता यायची. तसा हा पार सदासर्वदा गजबजलेलाच असायचा. सकाळच्या पारी फिरायला गेलेले जरा वेळ म्हणुन टेकायचे, तर संध्याकाळी रिटायर मंडळी जागा अडवुन बसायचे आणि अपचनापासुन अमरिकेपर्यंत सगळ्या विषयावर बोलत रहायचे. चुकुन आमच्यासारखा एखादा तरणा बकरा त्यांच्या हाताला सापडला तर मग विचारुच नका..तुझ्या वयाचा होतो तेव्हा आमचे कसे दोनाचे चार हात झाले होते, लग्नासाठी पोरीवाले कसे मागे लागले होते. एकजण कसा सायकल, रेडीओ द्यायला तयार होता..घासलेटच्या दिव्यावर कसा आभ्यास केला होता.
माझं चांदण्यांचं झाड, माझी कस्तुरमोगरी
तिचा सुगंधाचा पाश, तनामनास मोहवी
तन मन मोहरते, येता साजण ग दारी
स्वर चांदणे शिंपीते, त्याची जादुई बासरी
भान नुरते मी होते, पुरी बावरी बावरी
अंगभर फुलतसे, मग कस्तुरमोगरी
मीच चांदण्याचे झाड, मीच कस्तुरमोगरी
स्पर्श होता साजणाचा, सडा चांदण शिवारी
आस्तिक्यसूक्तमय अस्तिसूत्र – लेखक सुरेंद्र दरेकर
‘’बुड़ता आवरी मज ‘’ या कादंबरीनंतर अल्पावधीत सुरेंद्र दरेकर यांचं दुसरं पुस्तक ‘’अस्तिसूत्र ‘’ संवेदना प्रकाशनाकडून आलं आहे. यातही दोन दीर्घकथा किंवा लघुकादंब-यांचा समावेश आहे.पहिली अस्तिसूत्र आणि दुसरी आरण्यक.
अस्तिसूत्र हे मध्यवर्ती आणि अन्य विपुल स्त्रीस्वरांनी गजबजलेलं कथासूत्र. .हे कथेचं पहिलं वैशिष्ट्य.
फिन्द्री - मुलीच्या नकुशीपणाची गोष्ट.
“फिन्द्री” लेखिका सुनिता बोर्डे यांनी लिहिलेली कादंबरी. कादंबरीतल्या संदर्भावरून १९७६ ते २००२ या काळात हि कथा घडत जाते. यातील प्रसंग जरी कौटुंबिक स्वरूपाचे असले तरी फिन्द्री ही सामाजिक कादंबरी आहे. कादंबरी वाचत असताना दलित समजातील विषमता, दारिद्र्य, जातपात, धर्म, पुरुषसत्ता संस्कृती, शिक्षणाचा अभाव या साऱ्या समस्या आपल्यासमोर व्यक्त होत जातात.
गाडीत एकटी, दूरचा प्रवास आणि हवी ती गाणी लावायचं स्वातंत्र्य. अजून काय हवं असं वाटत असतानाच समोर लक्ष गेलं आणि मिररमध्ये बॅकसीटवर कलंडलेल्या तरूणाचा पांढराफटक चेहरा दिसला.
प्रेमाकरता कायकाय करावं लागतं! मागच्याच गाडीतून वॅकी येत असेल. खरतर हे सगळं करायला त्याचा ठाम विरोध! पण मी अजिबात लक्ष देणार नाहिये!
कट!
आयुष्यात अशी संधी वारंवार येत नाही जेव्हा आपलं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता दिसते! मग अशा वेळेस मागेपुढे बघण्याइतकी मी पुळचट नाहिये! मागच्या वेळचा भरभक्कम अनुभव गाठीशी आहे आणि प्रायवेट गाडीही!