साहित्य

अप्रकाशित विनोदी साहित्य हवे आहे

Submitted by विनिता.झक्कास on 11 April, 2022 - 07:30

नमस्कार लेखक मित्र-मैत्रिणींनो,

'सुचेतस आर्टस' आपले स्वागत करत आहे एका नवीन उपक्रमात…

आपण विनोदी साहित्य लिहीत असाल...जसे की विनोदी कथा, चुटकुले, नाटुकले इत्यादी तर आपण आपले स्वलिखित 'अप्रकाशित साहित्य' आम्हांला देऊ शकता. (फार ओढून ताणून केलेले विनोद नकोत, तसेच व्हॉट्सअप विनोद नकोत. कुठलेही कमरेखालचे विनोद नकोत.) निखळ फॅमिली ड्रामा हवा. उदा. वागळे की दुनिया, तारक मेहता का उल्टा चष्मा...आपल्या पुलंचं साहित्य.

विषय: 
शब्दखुणा: 

गझल - तोवर माझे शब्द संपले होते

Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 10 April, 2022 - 11:49

तोवर माझे शब्द संपले होते
- महेश मोरे (स्वच्छंदी)

ज्या रस्त्याने दुःख चालले होते
घर माझे मी तिथे बांधले होते

मी काट्याला बोट लावले नाही
या बोटाला फूल टोचले होते

तुला मजेने म्हणून गेलो "वेडी"
वेड मला तर तुझे लागले होते

या हृदयाने फितुरी केली कारण
या डोळ्यांनी तुला पाहिले होते

गुलाब चुंबुन फसली आहे रे ती
त्याहुन माझे ओठ चांगले होते

सुखे राहिली म्हणून शाबुत माझी
सुखाभोवती दुःख पेरले होते

हसता हसता पुसून गेली डोळे
हसून मीही दुःख सोसले होते

शब्दखुणा: 

माझे मराठीचे मास्तर / माझ्या मराठीच्या बाई..!! ( रुपाली विशे - पाटील)

Submitted by रूपाली विशे - पाटील on 2 March, 2022 - 11:41

माझे मराठीचे मास्तर ! माझ्या मराठीच्या बाई..!!

मराठी भाषेचा गोडवा आपल्या प्रत्येकाच्या मनात आहेच कारण, आपली मायबोली मराठी आहेच गोड.. वाचायला, लिहायला, ऐकायला आणि बोलायला..!!

महाराष्ट्राच्या भूमीत आपल्या संतानी, कवी, लेखकांनी त्यांच्या ओव्यात, श्लोकात, कवितेत, लेखनात भरभरून मराठीची थोरवी गायली आहे. मायबोली मराठीचे गुण कितीही गायले, वर्णिले तरी त्यासाठी शब्द तोकडेच् पडणार आहेत.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित माझे मराठीचे मास्तर / माझ्या मराठीच्या बाई उपक्रमाद्वारे मायबोलीने आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मभादि संयोजकाचे मनःपूर्वक आभार..!!

विषय: 
शब्दखुणा: 

" मेनका " मार्च २०२२ च्या अंकात प्रसिद्ध झालेली मी लिहिलेली कथा निष्ठा

Submitted by सतीशगजाननकुलकर्णी on 2 March, 2022 - 05:43

निष्ठा

विषय: 

मराठी भाषा दिवस : सरस्वतीची चिरंजीव मुले - शान्ता शेळके - भरत.

Submitted by भरत. on 1 March, 2022 - 09:51

शान्ता शेळके माझ्या सर्वाधिक आवडत्या कवयित्री. त्यांचं नाव, चेहरा आणि त्यांच्या रचना यांची एकत्रित ओळख ठसठशीतपणे केव्हा झाली ते आठवायचा प्रयत्न करतोय. माझं दहावी १९८३ चं. १९८२ मध्ये घरी टीव्ही आलेला, पण त्याने तोवर घड्याळातल्या सगळ्या घरांवर हक्क सांगितला नव्हता. कवी-लेखक दिसायचे ते पाठ्यपुस्तकात तेही नववीपासूनच्या - म्हणजे कुमारभारती आणि मग युवकभारती ; क्वचित वर्तमानपत्रात. पृथ्वीचे प्रेमगीत लिहिणारे कुसुमाग्रज आणि त्यांचं भव्य कपाळ, केवळ माझा सह्यकडा सोबतच्या वसंत बापटांचा चौकडीचा शर्ट हे लक्षात होते. बालकवींनी मात्र आधीपासूनच मनात जागा पटकावून तिथे नावही लावलं होतं.

टाटा स्टोरीज- माझे अनुवादित पुस्तक प्रकाशित झाले

Submitted by रेव्यु on 27 February, 2022 - 04:35

दि २५ फेब्रुवारी २२ रोजी माझे अनुवादित पुस्तक , # टाटा स्टोअरीज प्रकाशित झाले...
मूळ इंग्रजी पुस्तक श्री हरीश भट यांनी लिहिले असून ते बेस्ट सेलर आहे.
साकेत प्रकाशन व टाटा मॅनेजमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा साजरा झाला.
राष्ट्र्निर्मितीत टाटांचा १५० वर्षाहून अधिक कालावधीचा वारसा आहे. या दीर्घ कालखंडाच्या क्षितिजावर अनेक सुंदर आणि विसमयकारक कथा आहेत. या कथा आपल्याला प्रेरणा देतात, उत्तेजित करतात आणि एवढेच नव्हे तर आपल्या आयुष्यात अर्थपूर्ण कार्य करण्यात आपणास सक्रीय बनवतात.

विषय: 

सुटका

Submitted by वीरु on 13 February, 2022 - 13:57

गाडीने वेग पकडला आणि एकामागुन एक‌ उपनगरं मागे पडत गेले. थंडगार बोचरा वारा अंगाला झोंबायला लागला तेव्हा आतापर्यंत खिदळणारे आम्ही सारेच‌ गप्प झालो.. मागे पडलेलं घर, कावऱ्याबावऱ्या रडवेल्या चेहऱ्याने निरोप देणारे दोन्ही बच्चु, डोळ्यातलं पाणी लपवत कातरत्या आवाजात 'सांभाळुन रहा' सांगणारी अर्धांगिनी डोळ्यासमोर तरळुन गेली.. मागे एकदाही वळुन न पहाता निघालो होतो मी. माहित होतं की, तिघांचेही डोळे आपल्या पाठीवर खिळलेत, वाट बघताहेत की एकदातरी निरोपाचा हात दाखवेल. पण मी कटाक्षाने मोह टाळला.. वळुन पाहिलं तर पायात मणामणाच्या बेड्या पडतील म्हणुन..

विषय: 

मराठी साहित्यातील भयकथा आणि चित्रपट

Submitted by therising on 9 February, 2022 - 06:15

नमस्कार,
मराठीत भरपूर भयकथा लेखन झालं आहे. पण त्यावर काही अपवाद वगळता अजूनही चित्रपटनिर्मिती झाली नाही.
मायबोलीवर असणाऱ्या भयकथा वाचकांकडून अशा काही कथांची माहिती मिळू शकेल का ज्यावर अत्यंत चांगला भयपट बनू शकतो?
धन्यवाद!

प्रतिशोध.!! (भाग ३) अंतिम भाग

Submitted by रूपाली विशे - पाटील on 5 February, 2022 - 07:34

प्रतिशोध..! भाग-३ (अंतिम भाग)...!
_________________________________________

https://www.maayboli.com/node/81018

जेव्हा मला जाग आली, तेव्हा मी आतल्या खोलीत गादीवर होते. कुणीतरी माझ्या नाकाला कांदा धरलेला. मी हळूहळू डोळे उघडले. रडण्याचा, आक्रोशाचा अस्पष्ट आवाज माझ्या कानावर येऊ लागला.

मी पार्वती मावशींच्या आधाराने ओसरीत आले. घरात माणसांची गर्दी जमलेली...!!

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - साहित्य