"माणगाव आलंय, ज्यांना उतरायचं आहे त्यानी पटकन उतरा. गाडी जास्त वेळ स्टॉपवर थांबणार नाही." कंडक्टर नेहमीच्या सवयीने ओरडला.
त्या आवाजामुळे अजिंक्य खडबडून जागा झाला आणि घाई घाईने आपले सामान उतरवू लागला.
"तुम्हाला इथे उतरायचे आहे का?" अजिंक्यच्या शेजारील प्रवाशी उठून बाजूला होत विचारू लागला.
"हो." अजिंक्यने स्मितहास्य करत उत्तर दिले आणि उतरण्यासाठी दरवाजा जवळ जाऊ लागला.
"अहो! लवकर उतरा चला, गाडीला जास्त वेळ थांबता येणार नाही" कंडक्टर थोडा नाराजीच्या सुरात म्हणाला.
अजिंक्य उत्तर न देताच खाली उतरला आणि सवयीप्रमाणे स्टॉपवर असलेल्या नवनाथ रसवंती गृहात शिरला.
"एक जंबो ग्लास" त्याने लगेचच ऑर्डर दिली आणि समोरच मांडलेल्या बाकावर आपली बॅग ठेवत तो बाजूच्या खुर्चीत रेलून बसला. इतक्यात तिथे काम करत असलेल्या पोराने उसाच्या रसाचा ग्लास त्याच्या समोर आणून ठेवला. अजिंक्यने तो ग्लास पटकन संपवला आणि पैसे देऊन तो बाहेर पडला.
फलाट वर उभं राहून तो गोरेगावला जाणाऱ्या गाडीची वाट बघू लागला. इतक्यात कोणीतरी आपल्याकडे बघत आहे हे जाणवल्याने त्याने मागे वळून पाहिले आणि त्याला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला.
"अनघा... " अजिंक्य मनातल्या मनात म्हणाला आणि लगेचच दुसरीकडे बघू लागला. त्याच्या श्वासाची गती चांगलीच वाढली होती आणि हृदय इतके जोराने धडधडत होते की कुणाला ऐकू येईल की काय अशी विचित्र भीती त्याच्या मनात क्षणभर चमकून गेली.
अनघा आणि अजिंक्य तिसरी पासून एकाच वर्गात शिकत असल्याने एकमेकांना चांगले ओळखत होते. ते दोघेही स्वभावाने आणि विचारांनी जवळ जवळ एक सारखेच होते शिवाय दोघांच्या बौद्धिक पातळीत कमालीची समानता होती. दोघांमध्ये फरक एवढाच होता की अनघा दिसायला खूपच सुंदर होती आणि तिच्या वागण्या बोलण्यात कमालीचा आत्मविश्वास होता तर अजिंक्य दिसायला सर्वसाधारण होता शिवाय आपण दिसायला खूपच शुल्लक आहोत असं त्याचं स्वतःविषयीच प्रामाणिक मत असल्याने त्याचा आत्मविश्वास नेहमीच कमी पडायचा. त्यामुळेच अनघाला जरी माहित असले की त्याचे तिच्यावर प्रेम आहे तरी अजिंक्यला ते तिच्यासमोर व्यक्त करणे कधीच जमले नव्हते. शेवटी, ते दोघे आपापल्या करिअर साठी वेगवेगळ्या दिशेने निघून गेले आणि त्यानंतर आज तब्बल चार वर्षांनी योगायोगानेच भेटले होते.
"आज योगायोगाने आपली भेट झाली आहे आणि ही संधी आपल्याला मुळीच गमावता कामा कामा नये. आज आपण तिच्याशी बोलायचेच." असं मनोमन स्वतःशीच ठरवत अजिंक्यने आपला स्वेपट शर्ट काढून आपल्या बागेत ठेवला आणि अनघाशी बोलण्यासाठी तो वळला पण अनघा तिथे नव्हतीच. कदाचित आपल्याला भास झाला असेल असे वाटून त्याचे मन अधिकच खिन्न झाले. तोपर्यंत त्याची गाडी स्टेशनवर लागली होती. तो पुन्हा एकदा अनघा तिथे नसल्याची खात्री करून घेत शेवटी नाईलाजाने बस मध्ये चढला आणि खिडकी शेजारील सीट वर जाऊन बसला.
"तिकीट, तिकीट..." कंडक्टर अजिंक्य कडे येत म्हणाला.
"गोरेगांवचे एक तिकीट द्या!" असे म्हणत अजिंक्यने शंभर रुपयांची नोट कंडक्टर समोर धरली. आहो, साहेब माझ्या जवळ सुट्टे पैसे नाही आहेत. तुम्ही कृपया बारा रुपये सुट्टे पैसे द्या.
"हं, हे घ्या!" अजिंक्य सुट्टे पैसे देत कंडक्टरला म्हणाला.
अजिंक्य निराश होऊन बाहेर पाहत होता. इतक्यात त्याला अनघा पुन्हा दिसली. ती फलाट वर उभी राहून त्याच्याकडेच बघत होती. ह्यावेळी मात्र त्याने स्व:ताला एक चिमटा काढून बघितला पण तो भास नव्हता. ती खरोखरच अनघा होती.
काळया रंगाचा टॉप वर तिने पांढऱ्या रंगांचा स्कार्फ मानेभवती गुंडाळला होता. एका हातात मोबाईल व दुसऱ्या हातात बॅग घेऊन ती बसची वाट बघत होती. पण तिचे सर्व लक्ष मात्र अजिंक्यकडेच होते.
आता आपल्याला तिच्याशी बोलायलाच हवे असे म्हणून अजिंक्य बसमधून उतणार एवढ्यात त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, तिला आपल्याशी बोलायचे नसेल म्हणून ती लपली असेल तर... आणि अजिंक्य जागीच खिळून राहिला. त्यामुळे दोघे एकमेकांना फक्त पाहत राहिले.
काही वेळाने अजिंक्यची गाडी निघाली आणि अनघाला दूर जाताना तो पाहू लागला. शेवटी गाडी स्टॉप बाहेर आली आणि गाडीने वेग पकडला. गाडीच्या वेगासोबत अजिंक्यच्या विचारांनी सुद्धा चांगलाच वेग पकडला.
"अनघा, आपल्याकडेच बघत होती का की आपल्यालाच असं उगीच वाटलं? मूळात ती आपल्याकडे का बघेल ते ही इतक्या वर्षांनी? तिला ही आपण आवडत असू का?"
गाडीने अचानक ब्रेक लावला आणि ब्रेकमुळे बसलेल्या धक्क्याने अजिंक्य विचारांच्या गर्दीतून बाहेर आला. त्याने खिडकीतून पाहिले तेव्हा गाडी स्टॉपवर पोहचल्याचे त्याच्या लक्षात आले. तो पटकन आपली बॅग घेऊन खाली उतरला आणि आपल्या घराच्या दिशेने चालू लागला.
आजूबाजूला बदललेले दृश्य पाहण्यात तो इतका गुंतून गेला की तो कधी घराजवळ पोहचला हे त्याचे त्याला ही कळले नव्हते. त्याने घराचे दार ठोठावल्या बरोबर अजिंक्यच्या आईने दार उघडले. ती त्याच्याच येण्याची वाट बघत होती.
"या, आत या साहेब! इतक्या वर्षांनी तुला आईची आठवण झाली का? अजिंक्यची आई सुलभा थोड्या नाराजीच्या सुरात म्हणाली कारण अजिंक्य तब्बल चार वर्षानी घरी आल्यामुळे तिला त्याचा प्रचंड राग आला होता.
"अगं, आई तुझी आठवण नेहमीच येत होती पण कॉलेज आणि पार्ट टाईम जॉब मुळे वेळच मिळत नव्हता येयला. तुला माहीतच आहे आणि तरीसुद्धा तू अशी रागवतेस माझ्यावर; हे काही बरोबर नाही." अजिंक्य आईला समजावत म्हणाला.
"हो, मला ते माहित आहे. पण एक दिवस सुद्धा तुला सुट्टी काढून येता नव्हतं येत का?" सुलभा बाईंनी आपली री पुन्हा एकदा ओढली.
आता आई काही आपलं ऐकणार नाही हे समजल्यावर अजिंक्य विषय बदलण्यासाठी आईला म्हणाला, "अगं, आई मला खूप भूक लागली आहे काहीतरी खायला दे पहिले."
"हो, देते खायला. पहिले जा तोंड हातपाय धुऊन घे!" सुलभा बाईंनी अजिंक्यला आदेश दिला.
अजिंक्यने तोंड हातपाय धुण्यासाठी पडवीत गेला. सुलभा बाईची विचारपूस चालूच होती तीच्या प्रश्नांना उत्तर देत अजिंक्यने तोंड हातपाय धुतले आणि आतमध्ये येऊन टॉवेलला हातपाय पुसू लागला. तेवढ्यात सुलभा बाईंनी मॅगी ची डिश अजिंक्य पुढे आणून ठेवली. कारण, अजिंक्यला मॅगी खूप आवडायची.
अजिंक्यने मॅगी ची डिश घेऊन सोफ्यावर बसला आणि त्याने टिव्ही ऑन केला. कित्येक वर्षांनी आज तो टिव्ही बघत होता कारण हॉस्टेल मध्ये टिव्ही बघण्याची सोय नव्हती. टिव्हीवर अजिंक्यची सर्वात आवडत्या हिरोची म्हणजेच अल्लू अर्जुन ची आर्या नावाची मूव्ही लागली होती. इतर वेळी अजिंक्यची आर्याची मूव्ही बघताना पूर्ण जगाचा विसर पडे पण आज मात्र त्याच मूव्ही बघताना त्याचे काही लक्ष लागतं नव्हतं. अनघाचेच विचार त्याच्या मनात पिंगा घालत होते त्यामुळे तो टिव्ही बंद करून हॉल मध्येच फेऱ्या मारू लागला. त्या विचारताच त्याने अनघाला इंस्टाग्राम वर रिक्वेस्ट पाठवली. ती रिक्वेस्ट ॲक्सप्त करणार नाही हे त्याला पक्कं माहीत असल्याने त्याने लगेचच मोबाईल खाली ठेवला आणि पुन्हा विचारात हरवून गेला.
"ती आपल्याकडेच पाहत होती का? ती पुण्यालाच जात होती का? इतक्या उशिरा ती एकटी सुखरूपपणे पोहचली असेल का? हिला जरा लवकर च्या गाडीने निघता नव्हतं येत का? कोणी सोबत असेल की एकटीच निघाली आहे?" असे अनेक प्रश्न सध्या त्याच्या मनात येत होते त्यामुळे अजिंक्याला नीट झोप ही लागत नव्हती म्हणून तो शेवटी उठलाच आणि बेडरूमला असलेल्या बाल्कनीत येरझाऱ्या घालू लागला.
क्रमशः
- अक्षय समेळ.
अरे अर्धीच गोष्ट आहे का?
अरे अर्धीच गोष्ट आहे का? क्रमशः लिहीले नाही खाली? की इथेच संपली अजिंक्यच्या येरझार्यात?
सुरुवात तर बरी होती.
अजिंक्यच्या आईने पोहे करायला
अजिंक्यच्या आईने पोहे करायला हवे होते, नाहीतर चिवडा - लाडु.
स्टेशन आहे की बस स्टॉप??
स्टेशन आहे की बस स्टॉप??
मजेदार गोष्ट. कंटेंट कमी आणि
"गोरेगांवचे एक तिकीट द्या.. "
असं पूर्ण वाक्यात कोण म्हणतं कंडक्टर ला?
आणि सुटे पैसे दिल्यावर...
"ये हुई ना बात, साहेब. ये लो आपका तिकीट.."
म्हणून , इतका खुश होणारा कंडक्टर माझ्या तरी पाहण्यात नाही बुआ.....!!
तो अनघाचा आत्मा होता बहुतेक.....
मॅगी फारच आवडते आहे वाटते,
मॅगी फारच आवडते आहे वाटते, हॉस्टेल वरून येऊन पण मॅगीच..
स्टेशन आहे की बस स्टॉप??>>>>>
स्टेशन आहे की बस स्टॉप??>>>>> नाही, एस टीच्या आवारात जिथे गाडी लागते त्याला पण फलाट म्हणतात.
मॅगी फारच आवडते आहे वाटते,
मॅगी फारच आवडते आहे वाटते, हॉस्टेल वरून येऊन पण मॅगीच..>>>> म्हणूनच लिहीले होते की आईने पोहे किंवा चिवडा लाडु द्यायला हवा होता.
रश्मी जी तुमचे मनःपूर्वक
रश्मी जी तुमचे मनःपूर्वक धन्यवाद कथेतील त्रुटी सांगितल्याबद्दल... मी नक्की सुधारणा करेन...
King_of_net बस स्टॉप लिहायला
King_of_net बस स्टॉप लिहायला हवे होते... लिहण्याच्या भरात स्टेशन झाले...
आंबट गोड, ही माझी पहलीच कथा
आंबट गोड, ही माझी पहलीच कथा आहे आणि मी मुळात कविता लिहतो त्यामुळे वर्णन जास्त झाले असावे... धन्यवाद!
सहृद, हो अजिंक्य ला मॅगी खूपच
सहृद, हो अजिंक्य ला मॅगी खूपच आवडते... धन्यवाद!
पहिला प्रयत्न चांगला जमलाय
पहिला प्रयत्न चांगला जमलाय
संपली कि पुढे आहे कथा? असेल तर क्रमशः लिहा.
पुढील लेखनास शुभेच्छा!
अक्षय , मग पुढचा भाग लिही.
अक्षय , मग पुढचा भाग लिही.
एला, हो पुढे कथा आहे... अजून
एला, हो पुढे कथा आहे... अजून लिहली नाही आहे... क्रमशः लिहलंय... धन्यवाद!
रश्मी, धन्यवाद... तुम्ही
रश्मी, धन्यवाद... तुम्ही सुचवल्याप्रमाणे क्रमशः लिहलंय... हो, नक्कीच.
माझ्या पहिल्याच कथेला मला
माझ्या पहिल्याच कथेला मला एवढा प्रतिसाद अपेक्षित नव्हता... आपण सर्वांनी वेळात वेळ काढून माझी कथा वाचलीत आणि आपली मते, आणि आवश्यक बदल सांगितल्याबद्दल तुम्हां सर्वांचे मन:पूर्वक आभार!
अक्षय, कथा, सुरवात चांगली
अक्षय, कथा, सुरवात चांगली वाटते आहे, म्हणून सर्वांनी काही न काही प्रतिसाद दिलेत, सगळ्यांचे धन्यवाद एकत्रच मानले तर कोणीही चिडणार नाही.