ऐका आदित्यराणूबाई तुमची कहाणी.
आटपाट नगर होतं. त्या नगरांत एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा, फुलं, दूर्वा, आणायला रानांत जात असे. तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या.
-(नॉर्थ इंडियन प्रोड्यूसर असेल तर ह्या पांढऱ्या हाफ साडीत, साऊथ इंडियन असेल तर श्रीदेवीच्या ‘ताथैय्या ताथैय्या’ ड्रेस मध्ये मात्र रुद्राक्षासहित दिसतील. आपला मराठी प्रोड्यूसर असल्याने मगनलाल ड्रेसवालाचा ‘कर्नलच्या पोरी तुझे हिथं काय काम गं’ ड्रेस मध्ये नागकन्या देवकन्या भेटल्या).
ब्राह्मणानं विचारलं,”काय ग बायांनों, कसला वसा वसतां? तो मला सांगा.” ” तुला रे वसा कशाला हवा? उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील.” ब्राह्मण म्हणाला, “उतत नाहीं, मातत नाहीं, घेतला वसा टाकीत नाहीं.”
-(घेतला वसा टाकला तर ह्या वसावसा ओरडणार. कैरीचा चिक उततो, वसा उतणे म्हणजे काय?)
तेव्हां त्या म्हणाल्या, “श्रावणमास येईल, तेव्हां पहिल्या आदितवारीं मौन्यानं (मुकाट्यानं) उठावं, सचीळ (वस्त्रासहित) स्नान करावं,
-(रविवारला आदितवार म्हणणे म्हणजे रविकिशन चालेल अशा भोजपुरी सिनेमात आदित्य रॉय कपूरला कास्ट करायचं. सचीळ वस्त्रासहित म्हणजे बहुतेक क्लोदिंग ऑप्शनल बीच वर गेलात तरी कपडे घालूनच चिल करत परत या असे असावं).
अग्रोदक पाणी आणावं. विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्यराणूबाई काढावी. सहा रेघांचं मंडळ करावं, सहा सुतांचा तातू करावा. त्याला सहा गांठी द्याव्या. पानफूल वहावं, पूजा करावी. पानाचा विडा, फुलांचा झेला, दशांगांचा धूप, गुळाखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, सहा मास चाळावी, सहा मास पाळावी, माघी रथसप्तमीं संपूर्ण करावं.
(हे काय गणित म्हणायचं- श्रावणात सुरु करायचं, सहा माहितीने चाळावी, सहा महिने पाळावी मग परत श्रावणच तर येईल. रथसप्तमी कशी आली??)
संपूर्णाला काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्यांची खीर, लोणकडं तूप, मेहूण जेवूं सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोडगळसरी द्यावी, ती नसेल तर दोन पैसे दक्षणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं.” असा वसा ब्राह्मणानं केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला.
(असा मेन्यू असेल तर कुणी भीष्म ही चटचट मेहूण गटात जायचा प्रयत्न करेल. चिरचोळी काय भानगड आहे? डिंपलने ‘पहले तुम पहले तुम’ गाण्यात घातलं तसला काही चोळीचा प्रकार असावा.)
भाग्यलक्ष्मी आली. तेव्हां राजाच्या राणीनें ब्राह्मणाला बोलावूं धाडलं, ब्राह्मण जाते वेळेस भिऊं लागला. कांपूं लागला. तेव्हां राजाच्या राणीनं सांगितलं, ” भिऊं नका, कांपू नका, तुमच्या मुली आमचे येथें द्या” “आमच्या मुली गरीबाच्या, तुमच्या घरीं कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल.” राणी म्हणाली, ” दासी करीत नाहीं, बटकी करीत नाहीं. राजाची राणी करूं, प्रधानाची राणी करूं.”
(राणीने बोलावून तुमच्या मुलीला राणी करू सांगितलं… #सवतमाझीलाडकी)
मार्गेश्वराचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या, एक राजाचे घरीं दिली. दुसरी प्रधानाचे घरीं दिली. गेल्या पावलीं मुलींचा समाचार घेतला नाहीं. बारा वर्षांनीं समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेंकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. “बाब बाबा, गूळ खा पाणी प्या.” गूळ खात नाहीं, पाणी पीत नाहीं. माझी कहाणी करायची आहे ती तूं ऐक.” तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाहीं. राजा पारधीला जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याचे मनांत राग आला.
(बारा वर्ष समाचाराला आले नाही, तिने कहाणी ऐकली नाही तर आता बाबा बारा तास थांबले तर बिघडलं असतं? )
तेथून निघाला प्रधानाच्या घरीं गेला. तिनं पाहिलं, आपला बाप आला. म्हणून बसायला पाट दिला; पाय धुवायला पाणी दिलं. “बाबा, बाबा, गूळ खा, पाणी प्या.” ” गूळ खात नाहीं पाणी पित नाहीं, माझी कहाणी करायची आहे, ती तूं अगोदर ऐक. ” तुझी कहाणी नको ऐकूं तर कोणाची ऐकूं?” घरांत गेली, उतरडींची सहा मोत्यें आणलीं. तीन आपण घेतलीं. तीन बापाच्या हातांत दिलीं.
(कहाणी ऐकताना मोती का हाती घ्यायचे…आदित्य म्हणजे सूर्य तर मोती चंद्राचे प्रतीक… लैच गोंधळ. )
त्याने मनोभावें कहाणी सांगितली लेकीनं चित्तभावें ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरीं आला. बायकोनं विचारलं, ” मुलींचा समाचार कसा आहे?” जिनं कहाणी ऐकलीं नाहीं, ती दरिद्रानं पीडली. दुःखानं व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली होती, ती भाग्यनं नांदत आहे.”
( बाबा थांबून तिला कहाणी सांगून मगच घरी जायचं तर हे काय… ये बाबूल है या बाभूळ….#हानिकारकबापू )
इकडे दरिद्री जी झाली होती, तिनं आपल्या लेकाला सांगितले. “मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन कांहीं दिलं तर घेऊन ये.” पहिल्या आदितवारीं पहिला मुलगा उठला, तळ्याच्या पाळीं जाऊन उभा राहिला.” अग अग दासींनों, तुम्ही दासी कोणाच्या?” ” आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे.” “कसा आला आहे? तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे.” ‘परसदारनं घेऊन या.’ परसदारानं घेऊन आल्या. न्हाऊं माखूं घातलं, पीतांबर नेसायला दिला, जेवू खाऊं घातलं. कोहोळा पोखरला, होनमोहोरा भरल्या. “वाटेस आपला जाऊं लागला. तों सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला. हातींचा कोहोळा काढून नेला. घरीं गेला. आईनं विचारलं, ” काय रे बाबा, मावशीनं काय दिलं?” दैवें दिलं, कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं. पण सर्व गेलं.
(कोहळा पोखरून मोहरापेक्षा बॅकपॅक नव्हतं काय त्या काळी. #घनघोरनांदणे)
पुढं दुसर्या आदितवारीं दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळीं जाऊन उभा राहिला. “अग अग दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या?” “आम्ही दासी प्रधानाच्या.” प्रधानाच्या राणीला निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरीं नेऊन न्हाऊं माखूं घातलं पीतांबर नेसायला दिला, जेवूं खाऊं घातलं. काठी पोखरून होनामोहोरांनीं भरून दिली. ” बाबा, ठेवूं नको. विसरूं नको. जतन करून घरीं घेऊन जा, ” म्हणून सांगितलं. वाटेंत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला, हातची काठी काढून घेतली. घरीं गेला, झालेली गोष्ट राणीला सांगितली. “दैवें दिलं, तें सर्व कर्मानं नेलं.”
(कधी माळी, कधी गुराखी. बच्चे की जान लोगे क्या? #घनघोरनांदणे चालूच)
पुढं तिसरे आदितवारीं तिसरा मुलगा गेला, तळ्याच्या पाळीं उभा राहिला. त्यालाही पहिल्यासरखं प्रधानाचे घरीं नेऊन न्हाऊं माखूं घातलं, पीतांबर नेसायला दिला, जेवूं खाऊं घातलं, नारळ पोखरून होनमोहोरांनीं भरून दिला. ” ठेवू नको, विसरूं नको.” म्हणून सांगितलं, घरीं जाताना विहिरींत उतरला. तों नार्ळ गडबडून विहिरींत पडला. घरीं गेला. आईनं विचारलं. ” काय रे बाबा, मावशीनं काय दिलं?” आई ग, मावशीनं दिलं, पण दैवानं तें सर्व बुडालं.”
(ह्यावेळी सूर्य नारायण प्रत्यक्ष आले नाही तरी म्हणजे लैच धांदरट दिसतंय #घनघोरनांदणे अजूनही चालूच)
चवथ्या आदितवारी चवथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळीं उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरीं नेऊन न्हाऊं माखूं घातलं, पीतांबर नेसायला दिला. जेवूं खाऊं घातलं. त्याला दह्याची शिदोरी होनामोहोरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरीं गेला. आईनं विचारलं, “काय रे बाबा, मावशीनं काय दिलं?” “आई मावसशीनं दिलं, पण दैवानं तें सर्व नेलं.”
(चार मुले ह्या राणीला. बारा वर्षात चार मुले म्हणजे ‘दुसरे मूल केव्हा? पहिले जाता शाळेला’ कॅम्पेनची पोस्टर गर्ल की ही. #घनघोरनांदणे अजूनही चालूच)
- क्रमशः
पुभाप्र.
पुभाप्र.
चिरचोळी म्हणजे जर चीर +चोळी अशी फोड असेल तर चीर म्हणजे वस्त्र किंवा साडी असू शकते. :विचारमग्न भावली.
हो. म्हणूनच द्रौपदी चीरहरण
हो. म्हणूनच द्रौपदी चीरहरण म्हणतात.
भारी लिहिते आहेस
भारी लिहिते आहेस
घनघोर नांदणे आणि हानिकारक बापू
(No subject)
१.नॉर्थ इंडियन प्रोड्यूसर
१.नॉर्थ इंडियन प्रोड्यूसर असेल तर ह्या पांढऱ्या हाफ साडीत, साऊथ इंडियन असेल तर श्रीदेवीच्या ‘ताथैय्या ताथैय्या’ ड्रेस मध्ये मात्र रुद्राक्षासहित दिसतील. >>>>> चित्रपट्सृष्टीचा गाढा अभ्यास!
२.सहा मास चाळावी>>> पण काय? पोथी चाळावी की चाळणीने चाळावे? ते स्पष्ट करावे.
३.बारा वर्षांनीं समाचारास ब्राह्मण निघाला.>>> नंतर तरी का निघाला? उगाच नाय तो शाणपणा केल्यावर राणीला दारिद्रय आले ना!बाबा भेटला नव्हता तोपर्यंत सर्व कुशल मंगल होते.
४.राणीच्या चारही मुलांनी बेपर्वाई दाखवून कर्मावर आळ घातला.एकाही मुलाला राणीने सटकावले नाही? परत ती
प्रधानाची बायको,४ भाचे चारही वेळेला होन, मोहोरा आदि.हरवताहेत आणि ही परत भरुन देतेय.
मगनलाल ड्रेसवालाचा ‘कर्नलच्या
मगनलाल ड्रेसवालाचा ‘कर्नलच्या पोरी तुझे हिथं काय काम गं’>>>>
गोष्ट भारीच
पुभाप्र.
भारीच. आधीच्याही भारी होत्या.
भारीच. आधीच्याही भारी होत्या. कर्नलच्या पोरी मस्तच.
चीर म्हणजे वस्त्रच. आपण कापडचोळी म्हणतो. (किंवा कापडचोळी म्हणत असू.)
आणि सचीळ म्हणजे सचैल असावे. म्हणजेच अर्थात सवस्त्र.
आणि विहिरीवर कोणी विवस्त्र स्नान करत असेल असे वाटत नाही. तरी ठासून सचीळ म्हटले आहे कहाणीत. म्हणजे कोणी कोणी तसे करीत असणार त्या काळी.
(पूर्वी पुरुष लोक विहिरीवर किंवा नदीवरच स्नान करीत. म्हणजे बाहेर उघड्यावर.)
हेहेहेहे, आदीत्यराणूबाईची
हेहेहेहे, आदीत्यराणूबाईची कहाणी. चतुर मासीच्या तोंडून. बघ ही मुलं पण एकमेकांशी बोलत नाहीत का? मावशी देते ते सुमडीत घेउन यायचं तर
कर्नलच्या पोरी , कर्नल कबीर
कर्नलच्या पोरी , कर्नल कबीर बेदी थोडी आहे सुधीर जोशी आहे ,हाच ड्रेस असणार की मग
सचीळ >> ' स चीळ चीळ' हे 'जस्ट चिल चिल' सारखे गाणे घालता येईल. ......आदितवारी व्रतसे मिलाले दिल सचीळ चीळ सचीळ
हानिकारक बापु, डिंपल, रविकिशन, धमाल !
सगळीच्या सगळी पात्र बावळट कशी वाटतेयं ! नेहमी धाकटी सून किंवा धाकटा मुलगा जे योग्य ते करतात तोपर्यंत गोष्टीत त्याचत्या चुका होत रहातात. ते शब्द ते वातावरण मागे पडलय तरी पण मूळ गोष्टी सुद्धा वाचायला मजा येते आहे , त्यात तुझा आजकालचा मसाला , मस्तच !
सगळेच छान माहिती लिहीताय,
सगळेच छान माहिती लिहीताय, नायतर छान चिरफाड करताय.
हो अस्मिता, मूळ गोष्टी फार फार भाबड्या आहेत. म्हणजे शेवटी सगळे छानच वागतात. व्रताने सगळे प्रश्न सुटतात. गोष्टींना एक लय आहे, एक ताल आहे. एखाद्या किर्तनकाराने सांगावा असा 'नाद' आहे. नुसतं वाचूनच 'खरं होतं बरं' अशी श्रद्धा निर्माण होईल.... पण भाषेच्या पलिकडे पाहिले तर हल्लीच्या काळात असे 'असेल माझा हरी तर देईल व्रतानंतरी' विचार नको.
ह्या कहाणीच्या वरचे सूर्याचे
ह्या कहाणीच्या वरचे सूर्याचे हस्रे चित्र फार छान आहे. टेली टबीज मधील हसरा बाल सूर्य आठवतो. ह्यात ले व्रत पण त्यातल्या त्यात सोपे आहे.
सूर्य पूजा अनेक संस्कृतींमध्ये आहे. जपानात आहे.
ह्या राजपुत्रांचा सन वर्शिपर्स असा व्हॉट्सॅप गृप हवा होता. म्हणजे चारी गिफ्ट घरी आल्या असत्या.
अशी व्रते करोन नियतीचा फेरा चुकवता येतो हेच क्रिएटिन्ग अ फीलिन्ग ऑफ फॉल्स सिक्युरिटि इन द मासेस. गुंतवून ठेवायचे.
मूळ कहाण्यांची भाषा छोट्या
मूळ कहाण्यांची भाषा छोट्या छोट्या वाक्यांची, नादमय, अनुप्रासयुक्त अशी गोड आहे. मला वाटते छपाईची साधने नसताना सर्व काही स्मरणशक्तीवरच अवलंबून होते त्या काळात लक्षात राहायला, पाठ करायला सोपी अशी भाषा वापरली गेली असावी. भोंडल्यातल्या गाण्यांची भाषासुध्दा अशीच होती. हे सर्व स्त्रीसाहित्य वाचताना चार पाचशे वर्षांमागच्या काळात गेल्यासारखे वाटते.
लेखातले कॉमेंट्स भारी आहेतच, प्रतिसादही तसेच भारी आहेत. सगळी मालिकाच भारी आहे.
Sachail स्नान म्हणजे वस्त्रे
Sachail स्नान म्हणजे वस्त्रे घालून स्नान हे माहिती नव्हते! मला वाटायचं, अगदी मनसोक्त, स्वच्छ आंघोळ!
बाय द वे, अशा मुद्दाम सांगितलेल्या सचैल स्नानाचे काय महत्त्व असेल?
सचैल स्नानाचे काय महत्त्व
सचैल स्नानाचे काय महत्त्व असेल?>> तीर्थावर ओपन मध्ये?! सोपे जावे व्रत पाळायला म्हणून केले असावे.
चीर म्हणजे साडी गरजुंनी गाजुवाका पिल्ला हा व्हिडीओ बघावा. त्यात मी आणलेली साडी का ग नाही नेसलीस असे पोरगा पोरगीला विचारतो तेव्हा ना चीर ( तो उच्चारी सीर म्हणतो.) गाजुलु म्हणजे बांगड्या चीर साडी सब्बू साबण तो ही होतकरू प्रियकराने दिलेला.
शिवाय असे दान केले गेलेले कपडे वस्तू कोणा तरी गरजूला उपयोगी पडत असावे.
चीर शब्द तसा न वापरता नाही.
चीर शब्द तसा न वापरता नाही. उत्तरेत सर्वत्र द्रौपदी वस्त्रहरण ह्या शब्दासाठी द्रौपदी चीरहरण असाच शब्द वापरतात. दक्षिणेतही ह्या शब्दाचा वापर आहे.
घनघोर नांदणे.....घनघोर
घनघोर नांदणे.....घनघोर युद्धासारख वाटतं ते......:))
Ama...हो..पण इथे घरीच सचैल
Ama...हो..पण इथे घरीच सचैल स्नान करायला म्हटले आहे.
अग्रदक पाणी म्हणजे काय आणि?
घनघोर नांदणे.....घनघोर
घनघोर नांदणे.....घनघोर युद्धासारख वाटतं ते...... +११ 007
मस्त
मस्त
मस्त! घनघोरनांदणेचालूच
मस्त!
घनघोरनांदणेचालूच
घनघोरनांदणेचालूच Lol
घनघोरनांदणेचालूच....
एकच नंबर कमेंट्री
एकच नंबर कमेंट्री
#हानिकारकबापू , #घनघोरनांदणे
#हानिकारकबापू , #घनघोरनांदणे >>>