भाग १ वाचायचा असल्यास. नाहीतर जसा 'धूम' कुठलाही भाग पाहिला तरी चालतो तशी ही कथा आहे. आधीच्या भागात दोन बहिणी असतात, एक कथा ऐकल्याने श्रीमंत रहाते, तर दुसरी न ऐकल्याने गरीब होते एवढे एकोळीचे कथानक घडले आहे.
कहाणी आदित्यराणूबाईची (भाग-२)
पांचव्या आदितवारीं आपण उठली, तळ्याच्या पाळीं उभी राहिली. दासींनीं तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरीं नेलं. न्हाऊं घात्लं. माखूं घातलं, पाटच बसायला दिला. प्रधानाची राणी आदितवाराची कहाणीकरूं लागली. ” काय वसा करतेस तो मला सांग.” बहीण म्हणाली, “अग अग चांडाळणी, पापिणी, बापाची कहाणी ऐकली नाहींस, म्हणून तुला दरिद्र आलं.”
(बहीणीला इतका थेट फिडबॅक! वसा सांग म्हणलं तर वसा सांगावा उगा पापिणीची पिपाणी वाजवू नये.)
राजाच्या राणीनं विचारलं, बहिणीच्या घरीं राहिली. श्रावणास आला. सांगितल्याप्रमाणं सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावूं धाडलं. “मावशी मावशी, तुला छत्रं आलीं, चामरं आलीं, पाईक आले, परवर आले.”
(परवर भाजी असते, ती कशाला पाठवली राजाने??!!)
“मला रे पापिणीला छत्रं कोठली? चामरं कोठलीं? पाईक कोठले? परवर कोठे?” बाहेर जाऊन दाराशीं बघतात, तो राजा बोलावूं आला आहे. राजा आला तशी घरीं जायला निघाली. एकमेकींना बहिणीबहिणींनीं अहेर केले. वाटेनं जाऊं लागलीं.
(आहेर काय केले ते पण सांगा म्हणजे #घनघोर नांदणे द्यायचा की नाय ते ठरवायला… )
पहिल्या मजलेस स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं, तों कहाणीची आठवण झाली. ” करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा. नगरांत कोणी उपाशी आहे का? याचा शोध करा.” “तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ? माझं पोट भरलं पाहिजे.” असं म्हणून तो राणीकडे आला. तशीं सहा मोत्यें राणीनं घेऊन तीन त्याला दिलीं. तीन आपल्या हातांत ठेवलीं. मनोभावें कहाणी सांगितली, चित्त भावें त्यानं ऐकली. त्याची लांकडाची मोळी होती, ती सोन्याची झाली. तो म्हणाला, “बाई बाई! कहाणी ऐकल्याचं एवढं फळं, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा.” ” तुला रे वसा कशाला हवा? उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील,” उतत नाहीं, मातत नाहीं, घेतला वसा टाकीत नाहीं.” तेव्हां वसा सांगितला.
(सहा मोत्यांची काय पद्धत आहे!! गरीबाला तर हा ‘कॅच-२२’ आहे. #कॅच २२. मोती नाही म्हणून वसा नाही, वसा नाही म्हणून मोती नाही. आणि सोन्याची मोळी कुठून आणली म्हणून पोलिस डांबत कसे नाहीत ह्या मोळीविक्याला??! )
पुढं दुसर्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढला, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं, तेव्हां कहाणीची आठवण झाली. ” करा रे हांकारा, पिटा रे डांगोरा. नगरांत कोणी उपाशी आहे का? याच शोध करा.” “उपाशी नाहीं, कांहीं नाहीं” माळ्याचा मळा पिकत नाहीं, विहिरीला पाणी लागत नाहीं, असा एक माळी चिंतेनं बसला आहे त्याला हाक मारली. ‘आमच्या बाईची कहाणी ऐक.” तो आला. राणीनं सहा मोत्यें घेऊन तीन आपण घेतलीं, तीन माळ्याला दिलीं. राणीनं कहाणी मनोभावें सांगितली. चित्तभावें माळ्यानं ऐकली. माळ्याचा मळा पिकूं लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, ” बाई बाई! कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा.” मग राणीनं त्याला वसा सांगितला.
(आता मळ्यात एवढं पिकलं, रोपांना फळ आली तरी वसा घेतल्याच काय फळ?! एवढं त्या कहाणीच माहात्म्य सांगतात पण ती कहाणी कोणती. ही आदित्यराणूबाईची कहाणी ती कहाणी नाही कारण ही कहाणी त्या कहाणीमुळे घडते आहे… बाकी तीन मोती कहाणी नंतर परत करावे लागतात का? #कॅच २२)
पुढं तिसर्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं. मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं, तेव्हा कहाणीची आठवण झाली. ” करा रे हांकारा, पिटा रे डांगोरा. नगरांत कोणी उपाशी आहे का? याचा शोध करा.” “उपाशी नाहीं, कांहिं नाहीं.” एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनांत गेला होता, एक डोहांत बुडाला होता, एक सर्पानं खाल्ला होता, त्यामुळं चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाले, “आमच्या बाईची कहाणी ऐकू.” ती म्हणाली, ” कहाणी ऐकून मी काय करूं? मी मुलांसाठी रडतें आहें. बरं येतें” मग ती राणीकडे आली. राणीनं पहिल्याप्रमाणं तिला कहाणी सांगितली. तिनं चित्तभावें ऐकली. तिचा मुलगा वनांत गेला होता तो आला. डोहांत बुडाला होता तो आला. सर्पानं खाल्ला होता तो आला. ती म्हणाली,” बाई बाई! कहाणी ऐकल्याचं हें फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा.” मग राणीनं तिलाही वसा सांगितला.
(ये कहाणी नाही बालाजी टेलिफिल्म्स हो गई… फॉरेन्सिक सायन्स मधली मंडळी ‘एक पे रेहना...बुडाला या खाल्ला.. कभी बुडला कभी खाल्ला’ अशाने ‘कॉज ऑफ डेथ’ काय लिहायचं सर्टीफिकेटवर… त्या गोंधळापायीच यमराजाने परत पाठवला असावा. बाकी इथे टायटल ९ एज-सेक्स डिस्क्रिमिनेशनची केस होऊ शकते. म्हातारीला तीन मोती नाही दिले… )
पुढं चौथ्या मजलेस गेलीं. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं, तेव्हां कहाणीची आठवण झाली. “करा रे हांकारा, पिटा रे डांगोरा. नगरांत कोणी उपाशी आहे का? याचा शोध करा.” “उपाशी नाहीं, कांहीं नाहीं.” काणा डोळा, मांसाचा गोळा, हात नाहीं, पाय नाहीं, असा एक मनुष्य रस्त्यामध्यें होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालथा होता तो उताणा केला. सहा मोत्यें होतीं. तीन मोत्यें त्याच्या बेंबीवर ठेवलीं, तीन मोत्यें आपण घेतलीं, राणीनं मनोभावे कहाणी सांगितली; ती त्यानं ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाला. तो म्हणाला, “कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला.
(तीन मोती परत आले, बिचाऱ्याला आधीच हात-पाय नाही त्याच्यावर पाणी कशाला ओतायचं?!! कहाणी आहे की जीन-एडीटींग थेरपी. असो… मोती कपाळावर किंवा इतर दर्शनीय अवयवावर ठेवावे… उगा नायतर हात-पाय फुटल्यावर ‘मी टू’ केस करायचा)
पांचव्या मुक्कामाला घरीं आलीं. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. साती दरवाजे उघडले. लोहघंगाळं पाणी तापवलं. पड्रस पक्कान्नं जेवायला केलीं. सूर्यनारायण भोजनाला बसले, त्यांना पहिल्या घांसाला केंस लागला. ते म्हणाले, “अग अग, कोणा पापिणीचा केंस आहे?” राजाच्या राणीला बारा वर्षं दरिद्र आलं होतं. तिनं आदितवारीं वळचणीखालीं बसून केस विंचरलें. “काळं चवाळं, डोईचा केंस; वळचणीची काडी, डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे.” राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला, तसा कोणाला होऊं नये.
( अरे काय गोष्ट आहे की मस्करी.. पुन्हा दारिद्र्य … इतक्या लोकांच्या दु:खी कथा ऐकून बिचारीला टेंशनने गळाला एखादा केस तर काय एवढं कोपयाचं. व्हिटॅमिन डी कमी पडल असेल तिला तर…. देवा, सूर्यनारायणा 'सूरज तो ला दो जरा' ही ऍड बघा तुम्हीच!! )
ब्राह्मणाला, मोळीविक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कोणा डोळा मांसाचा गोळा, इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला, तसा तुम्हां आम्हां होवों. ही साठां उत्तराची कहाणी, पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.
(उन्हात बसा, केस गळत असतील तर काळजी घ्या. श्रीमंताला अधिक श्रीमंत होणे सोपे असावे म्हणून तीन मोत्या इतके पैसे तरी जवळ सेव्हींग मध्ये बाळगा. #मॉडर्न चातुर्मास.)
धमाल लिहिले आहे.
धमाल लिहिले आहे.
पापिणीची पिपाणी किती वेळा , सहाच का ? मोतीच का ? मोती कुत्रा तर नाही ना? आधी कमी लेखून मगंच वसा सांगतात ! मूळ कहाणीचीच कहाणी ऐकून 'चमत्कार पे चमत्कार' झाले. मोळी काय , फॉरेन्सिक , जेनेटिक एडिटिंग काय कहर आहे.
तीन थोर हंक्स म्हणून गेलेत ' सूरज की बाहों में अब है यह ज़िन्दगी किरणे हैं साँसों में बातों में रौशनी' टमाटे फेकून उद्यापन केलेयं.
-----
'पड्रस' शब्द प्रथमच वाचला. हे सूर्याच्या तोंडात केस जाण्याचे मीही ऐकलेय. पुसातल्या म्हणजे पौषातल्या रविवारी स्त्रिया नहाल्या की सूर्याच्या तोंडात केस जातात म्हणे. रविवारी शाम्पू केलं की पुसातल्या अंगतीपंगतीला ऐकावे लागायचे.
. ही आदित्यराणूबाईची कहाणी ती
. ही आदित्यराणूबाईची कहाणी ती कहाणी नाही कारण ही कहाणी त्या कहाणीमुळे घडते आहे…...+१.
बाकी सी तुला शि.सा.न
अनबीलीवेबल आहे कि गोष्ट.
अनबीलीवेबल आहे गोष्ट.
कंस कॉमेन्ट्री
मजलेस म्हणजे ??मजल दरमजल म्हणतात,ते का?
पड्रस नसेल षद्रस असेल म्हणजे
पड्रस नसेल षद्रस असेल म्हणजे 6 रस असलेले
भारी पिस काढलेत...
भारी पिस काढलेत...
धन्यवाद सर्व.
धन्यवाद सर्व.
हो षड्र्स असावे. कहाण्या विकीवरून घेते त्यामुळे त्या मु.शो. झालेल्याच असतात असे नाही आणि मी मौखिक परंपरेने जशा आल्या तशा म्हणून बदल करत नाही. हो, मजल म्हणजे केबीसीच्या हिंदीत 'पडाव' म्हणतात तसा प्रकार. सूरज की बाहोंमे मस्त गाणे आहे.
भारी धमाल आहे एकदम.. :d
भारी धमाल आहे एकदम..
कहाण्या विकीवरून घेते>>
कहाण्या विकीवरून घेते>> तुम्हाला संपूर्ण चातुर्मास हे पुस्तक माहीत आहे का? त्यात सर्व कहाण्या आरत्या व शनिमहात्म्य रामरक्षा अशी स्त्रोत्रे आहे विकी वर पण त्यातूनच कॉपी पेस्ट केल्या असतील. माझ्याकडे आहे ते आईचे आहे. म्हणजे पार लहान पणा पासूनचे उदबत्ती धूप गंध निरांजन वास त्यात आहेत. आई बाबांच्या वस्तू डिस्पोज ऑफ केल्या पुण्यातल्या तेव्हा दोनच चीजा जवळ ठेवल्या आईची साईबाबांची जुनी फ्रेम व हे पुस्तक. सांस्कृतिक ठेवाच. वाटीत साखि घेउन वाचायला मजा येते कहाण्या.
माझी लै भारी बेस्ट म्हणजे खुल भर दुधाची कहाणी. त्याचा मनावर फार परीणाम झाला आहे लहान पणी वाचल्याने . सर्वांना खायला प्यायला देउन मग काय तो देव धर्म. फीड एव्हरीवन डू युअर ड्युटीज . ( बायबलात तरी वेगळे काय सांगितले आहे.!)
आपलं पान वाढून घेतलं, तेव्हां
आपलं पान वाढून घेतलं, तेव्हां कहाणीची आठवण झाली >>> आधीच आठवण का नव्हती पण? बरं, पहिल्यांदा आयत्यावेळी आठवण झाली असेल समजा. पण नंतर प्रत्येकवेळी तीच चूक? काय हे!
ही फारच बोर आहे. कोणी व्रत
ही फारच बोर आहे. कोणी व्रत केले, नक्की काय केले, नक्की कोणावर कोप झाला, गुड डीड्स आणि बॅड डीड्स चा इफेक्ट व्हॅक्सिनसारखा वेअर आऊट होतो का? हे होत असेल तर यु बेटर नॉट... सॅंटाक्लॉज इज कमिंग टू टाऊन टाका तिकडे. एका श्रावणात नक्की किती रविवार असतात? श्रावण अधिक होता का? का नकर्त्याच्या वार रविवार म्हणत त्या काळी? काहीच कळेना.
मला खुलभर दुधाची, श्रीमंत भाऊ आणि गरिबाघरी दिलेली बहिण, जिला गरीब आहे, कसं दिसेल म्हणून भाऊ बोलवत नाही, आणि पैसे आल्यावर बोलावतो आणि ही दागिने काढून त्यांना जेवायला वाढते या दोन आठवता. आणि शनिवारची ज्यात पत्रावळ खोचुन मोती बनतात. ती आल्येय बहुतेक.
श्रीमंत भाऊ आणि गरिबाघरी
श्रीमंत भाऊ आणि गरिबाघरी दिलेली बहिण, जिला गरीब आहे, कसं दिसेल म्हणून भाऊ बोलवत नाही, आणि पैसे आल्यावर बोलावतो आणि ही दागिने काढून त्यांना जेवायला वाढते>> ती शुक्रवारची. ताईंची मिस झाली बहुतेक. मस्त आहे ही. मी ही शिकवण कधीच विसरलेले नाही. व अनुभव पण घेतला आहे.
शुक्रवारची दुसरी ती गरीबाचा मुलगा शिळी भाकरी घेउन काहीतरी राजाचे हरवलेले असते ते शोधायला सर्व जनता जाते त्यात जातो पण आई सांगते बाजूला बसून खा आपला डबा. ही पण शिकवण चांगली आहे. ह्यात दोन राण्या एक आवड्ती व एक नाव्ड्ती. त्या राण्यांची नावे गमतीशीर आहेत. पाटमाधव राणी आणि चिमादेव राणी. !!! कोण अशी नावे ठेवते?! आता इथे कोणी हपिसात जास्त फलकारे मारून बोलायला लागली की मी मनात बोलतेय पाटमाधव राणी असे म्हणून हसते खुदु खुदू.
ह्यात मध्यरात्री कोल्हापुरात महालक्ष्मी जाती जागती झाली असा उल्लेख आहे तेव्हा खरेच महाकाय मूर्ती जागी होते व तिच्यात एनर्जी जागते
लखलखते दागिने हिरवी गुलाबी साडी तेजस्वी डोळे अशी व्हिजन डोळ्या समोर येते.
पाटमाधव राणी आणि चिमादेव राणी
पाटमाधव राणी आणि चिमादेव राणी >> ही नावं वाचताना मला संगमेश्वर आज्जी, गुहागर आजोबा वगैरे शब्दप्रयोग आठवतात. गावांच्या नावावरून आज्जी आजोबांना हाक मारणे कुणी सुरू केले ह्याची काही कथा आहे का?
ह्याची काही कथा आहे का?>> ते
ह्याची काही कथा आहे का?>> ते माहीत नाही पण मुले अमेरिकेत व आजी आजोबा एक बंगलोरला एक पुण्यत तेव्हापासून झाले आहे हे.
पूर्वी सगळे एक त्रच होते ना.
इथे एक तुम्ही तुमच्या बाळाला कोणत्या लाडीक नावाने हाक मारता असा एक बा फ होता. तो फारच गोड मिट्ट होता. तीबाळे आता डायपरातून बाहेर गेली असतील व आज्जू आज्जी डायपरात गेले असतील.
यातून असेच आठवले.
यातून असेच आठवले.
रत्नाकर मतकरींच्या एका कथेत एका राजाचा पाय मुरगळला आणि गुराख्याने त्याच्या गुडघ्यावर कांदा भाकरी बांधली आणि त्याचा गुडघा दुखायचा बंद झाला.(भाकरी आणि कांदा वाया गेला )
अमा, तसे नसावे. मी लहान
अमा, तसे नसावे. मी लहान असताना माझ्या वडिलांची काकू मुंबईला राहायची, तिला मुंबई आजी आणि आईची काकू पुण्याला राहायची, तिला पुणे आजी म्हणायचो. सगळे भारतात, महाराष्ट्रातच होते. सख्ख्या आजीला फक्त नुसतं आजी म्हणायचो, बाकीच्या आज्या ह्या गावांवरून ओळखल्या जायच्या.
बरं मग?
बरं मग?
(भाकरी आणि कांदा वाया गेला>>>
(भाकरी आणि कांदा वाया गेला>>>>+१.
मग काय, निवांत!
मग काय, निवांत!
(No subject)
(No subject)
एवढी दहा वर्ष धागे काढते पण
एवढी दहा वर्ष धागे काढते पण धागे भरकटतच नाही. आपण भरकटतो धागा म्हणून फुरंगटावे, इतर चार आय डींनी समजूत घालावी, अॅडमिनने जरा लोकांना ताकीद द्यावी. केवढा स्वीटी तेरा ड्रामा... घडायचाच नाही. कित्ती कित्ती वाईट वाटायचं मला.... आज ह्या निवांत आजीमुळे फिटली एकदाची हौस. आयुष्यातला 'मायबोलीवर धागा भरकटावा' हा चेक बॉक्स झाला एकदाचा चेक..... चातुर्मासाचेच फळ नि काय
मुळ कहाणी 'अ आणि अ' कॅटेगरी
मुळ कहाणी 'अ आणि अ' कॅटेगरी आहे, त्यावरच्या लेखिकेच्या टिप्पणी भन्नाट आहेत.
आणि लेखिकेचा शेवटचा प्रतिसाद षटकार आहे.
विनोदी मालिका (?) मख्ख चेहऱ्याने पाहणारी मी, प्रतिसाद वाचुन फिस्कन हसल्यावर, नवरा आणि मुलगा सीमंतिनीच्या विनोदबुद्धीवर प्रचंड इम्प्रेस झाले. त्यांच्या समजण्याच्या पलिकडे असल्याने न वाचताच.
(No subject)
एक नंबर लिहिलं आहे...
एक नंबर लिहिलं आहे...
ओ सीमंतिनी, ती जिवतीची कहाणी पण लिहा की जरा प्लीज...
त्यात पण कायच्या काय तपशील आहेत..... बाईच्या पोटी वरवंटा आला वगैरे ...
सीताई
सीताई
बाईच्या पोटी वरवंटा आला वगैरे
बाईच्या पोटी वरवंटा आला वगैरे ...>>> खरंच? ईई काहीही. एकुणात श्रावणातील सगळ्या कथाच अ आणि अ आहेत तर. या सगळ्या कुठे वाचायला मिळतील? (आईने व्रतं केली नाहीत की मुलगी अज्ञानी रहाते शिवाय करमणुकीपासुन वंचित रहाते)
बाईच्या पोटी वरवंटा आला वगैरे
बाईच्या पोटी वरवंटा आला वगैरे ... मज्जा आहे नुसती... नावं मस्त आहेत दोन्ही.. त्या घागरिंमुळे लहानपणी आजीकडे घागर पाहिली की फुंकणे try करायला पाहिजे वाटायचं...
बाईच्या पोटी वरवंटा आला वगैरे
बाईच्या पोटी वरवंटा आला वगैरे ... मज्जा आहे नुसती... नावं मस्त आहेत दोन्ही.. त्या घागरिंमुळे लहानपणी आजीकडे घागर पाहिली की फुंकणे try करायला पाहिजे वाटायचं...
वरवंटावरूनच तर ही मालिका सुरू
वरवंटावरूनच तर ही मालिका सुरू झाली. अस्मिताने आषाढी गुरूवारी पुरण घातले. मी तेलगू पंचांग बघितले आणि श्रावणी शुक्रवार समजून गोष्ट सांगितली. (तेलगू पंचांग मराठी पंचांगापेक्षा १५ दिवस पुढे आहे ह्याचा साक्षात्कार मला नुकताच झालेला आहे.) ते वरवंटावरूनच वेगळा धागा काढ सुरू झालं.
(आता तिने गुरुवारी पुरण का केलं, मी तेलगू पंचांङग का बघितलं इ इ विचारू नका. एवढं मन लावून विचार करत जगत असतो तर बिर्ला-अंबानी झालो असतो. माईंडलेसली चाललंय तर आहोत इथे मजा करायला... .)
रत्नाकर मतकरी कांदा भाकरी
रत्नाकर मतकरी कांदा भाकरी ऑर्थोपेडिक रिमेडी पार्ट 2:
मग तो गुराखी राजा झाला.त्याला सुंदर राणी मिळाली.एकदा तिचा गुडघा दुखायला लागला आणि तिने अंथरूण धरले.मग गुराखी उर्फ राजा धावत जंगलात गेला.ढोलीत ठेवलेली कांदा भाकर शोधू लागला.(इतक्या वर्षांनी?तो काय मॅक डी चा प्रोसेसड बर्गर आहे का?)
तर पऱ्यालोकांनी त्याला ढोलीतून हिरे दिले.त्याने फेकून दिले.मग सोने दिले.त्याने फेकून दिले.मग फायनली पऱ्यालोक्सनी त्याला त्याची कांदा भाकरी परत दिली.आसमंतात मंद संगीत वाजू लागले.त्याने ती राणीच्या गुडघ्यावर बांधली आणि राणी बरी झाली.दोघे खूप वर्षे जगले.(भाकरी गोदरेज डिजिटल लॉकर मध्ये ठेवली.)
तात्पर्य: गुडघेदुखी बरी होते.कांदा भाकरीला नाकं मुरडू नये.नी रिप्लेसमेंट सर्जरी च्या जाहिरातींना भुलू नये.गुडघेदुखीच्या रुग्णांना आपले म्हणा.(आधीच आपले असतील तर आपले म्हणणे कन्टीन्यू ठेवा.)
Pages