जन्म घेऊन या जगात येण्या इतके तुम्ही सक्षम होत नाहीत तोपर्यंत स्वतःच्या उदरात जी तुम्हाला जपते...ती स्त्री असते
जन्मानंतर जगण्यासाठी लागणार सर्वात पहिल पोष्टिक अन्न जिच्या उदरात तयार होतं ...ती स्त्री असते....
चालायला, बोलायला आणि सर्वाइव करायला लागणारी प्रत्येक महत्वाची शिकवण जी देते ...ती स्त्री असते....
सतत तुमच्या सोबतीने वावरणारी, पहिली स्त्री-पुरुष मैत्रीची देणगी देणारी तुमची हक्काची मैत्रीण तुमची बहिण ...स्त्री असते
गूगल विज्ञान जत्रा ही एक जागतिक आंतर्जालीय विज्ञान स्पर्धा आहे. ही स्पर्धा १३ ते १८ वयोगटातील कोणत्याही देशाच्या मुलांसाठी खूली आहे. गूगल, जगात बदल घडवून आणणार्या कल्पनांच्या शोधात आहे. ह्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी गूगल वर आपले खाते असणे आवश्यक आहे. आपली प्रवेशिका दाखल करण्याची अंतीम तारीख आहे ३० एप्रिल २०१३.
मायबोलीवरील जास्तीत जास्त पालक शिक्षकांनी आपापल्या पाल्या / विद्यार्थ्यांना सहभागी होण्यास उत्तेजन द्यावे.
अधिक माहीती साठी ह्या दुव्यावर टिचकी मारू शकता......
कृपया कमकुवत हृदयाच्या वाचकांनी इथेच थांबावे.
हा प्राणी पहा. (चित्र आंतरजालावरून साभार)
या प्राण्यास सार्वजनिक ठिकाणी असे वागताना पाहून आपण काय केलं असतं हे थोडक्यात किंवा विस्ताराने किंवा कसेही लिहा.
घराचं फाटक उघडून मी आत शिरलो. कॅप्टन झाडांना पाणी घालण्यात मग्न होते. मी जिन्यावर चार पावलं चढलो न चढलो, तोच मागून आवाज आला,
“या विजयराव, चहा घेऊ.”
त्यांची ती विनंती म्हणजे ऑर्डरच. ती मोडण्याची हिंमत माझ्यात नव्हती. मी ‘अबाउट टर्न’ केलं आणि खाली आलो. कॅप्टनच्या हातातला पाण्याचा पाइप घेतला, तोंडावर गार पाण्याचे शिबके मारले, आणि रुमालानं तोंड पुसत हॉलमध्ये शिरलो. कॅप्टन शिर्के ग्रीन रंगाचा टी-शर्ट अन रंगीबेरंगी बर्मुडा घालून बहुदा माझीच वाट बघत बसले होते.
मायबोली हे संकेतस्थळ कोणत्या प्रणालीवर आधारीत बनवले आहे?
मराठी मंडळ कोरियाचे अश्याच प्रकारचे संकेत-स्थळ बनवण्याचा विचार आहे,त्याकरीता संकेतस्थळ बनवणारे निष्णात तज्ज्ञ असणे गरजेचे आहे का की ज्याला थोडाफार अनुभव आहे, तोही (मर्यादीत प्रमाणात का होईना) बनवु शकेल?
अगावू धन्यवाद
सुप्रभात मित्रांनो.
अग्निकोल्ह्याचे नवीन व्हर्जन आले आहे. (Firefox 18)
मोझिल्लाचे म्हणणे आहे की या नवीन व्हर्जनमध्ये पेज लोडींगची स्पिड २५ टक्क्यांनी वाढली आहे.
अजून काय नवीन आहे पाहण्यासाठी :
||
\/
What's New ?
मायबोलीसारख्या संकेतस्थळावर बहुतेक सर्व लोक ब्राऊजरमध्येच ऑनलाईन लेखन करत असावेत. पण जर आपल्याला ऑफलाईन लेखन करायचे असेल तर त्यासाठी बरीच डोकेफोड करावी लागते. ऑफलाईन लेखनाचे फायदेही बरेच आहेत. आपण आपले लेखन नीट सेव्ह करू शकतो, स्पेल चेक करू शकतो. अॅटो करेक्ट, अॅटो टेक्स्ट वापरू शकतो. पानेच्या पाने लिखाण करायचे असेल तर ऑफलाईनला पर्याय नाही. खाली दिलेली सॉफ्टवेअर वापरून मराठीत टंकलेखन करणे अगदी सुलभ आहे. हे सॉफ्टवेअर उतरवून घ्यायला काही मिनिटांपासून ते काही तासांपर्यंत वेळ लागू शकतो. (इंटरनेटच्या स्पीडवर अवलंबून) पण एकदा का डाऊनलोड झाले, की इन्स्टॉल मात्र काही मिनिटांत होईल.
आपल्या आवडीची एखादी गोष्ट करायची असं बरेच दिवस मनात असावं, पण काही कारणांमुळे त्यात व्यत्यय यावा, आणि मग अचानक एके दिवशी ती संधी स्वत:हून चालत आपल्या दारी यावी, याहून दुसरा आनंद तो कशात असणार? माझ्या बाबतीत असंच काहीसं घडलं. कित्येक दिवसांपासून बाईकवरुन कुठेतरी लांब भटकायला जायचं मनात होतं, आणि यंदाच्या दिवाळीत अखेरीस ती संधी आली.
मी आणि सोबत अजून ३ riders नी सुट्ट्यांचा फ़ायदा घेऊन एक आठवड्याचा बेत ठरवला, आणि जागा ठरली ती दक्षिण भारतातील कर्नाटकाची किनारपट्टी आणि पश्चिम घाटांमधील काही भाग. Google maps वापरून पक्का plan बनवला, आणि अखेरीस ९ नोव्हेंबरला आम्ही निघालो.
हल्ली मला वाढत्या पोटाची भयंकर भीती वाटू लागली आहे आणि त्यापेक्षाही त्याच्यावर उगीचच सल्ले देन्यार्यांची तर जरा जास्तच...पोटा वर ( अर्थातच वाढत्या ) फुकट सल्ले देनार्याना सरकारने " पोटा " च्या कायद्या खाली अटक करावी असाच वाटू लागलय आता . " सकाळी उठून सूर्यनमस्कार घाला,पहाटे उठून रोज पलायाला जावा " इति पितामह .." तू .... आसन करायला सुरवात कर आणि मघ बघ सकाळी केलास तर दुपारपर्यंत २ इंच पोट कमी ......८ दिवस कर पोट कुठ आणि पाठ कुठ आहे हे बघनार्याला शोधून ही सपदयाच नाही ....
मानवी मन विचित्र असते. प्रत्येक वेळी ताक फुंकून प्यायची वेळ आली ; कि मग तशीच सवय लागते. आपण मुरतो त्यात. असा वाटत जगायचं असेल तर अशाच पद्धतीने जगायला हवे. हे सत्य आहेच. अर्थात हे सत्य असावे कि नाही हा वादाचा मुद्दा होऊ शकतो !
काहींना ताक फुंकायची वेळ येतच नाही. कारण गुंत्याच्या पलीकडे किवा गुंत्यात राहून लढण्याची किवा डीप्लोमातिक राहता येते त्यांना. केवळ वरून असे राहिले तर स्वतःला मानसिक आणि शारीरिक त्रास होतोच. मात्र देवच्या दयेने ज्यांना खरेच मनाचे बंध मृत माणसाच्या इ. सी. जी प्रमाणे ठेवीता येतात; त्याला हे देवदत्त वरदानच.