गूगल विज्ञान जत्रा - मुलांसाठी एक स्पर्धा

Submitted by हर्पेन on 21 February, 2013 - 05:13

गूगल विज्ञान जत्रा ही एक जागतिक आंतर्जालीय विज्ञान स्पर्धा आहे. ही स्पर्धा १३ ते १८ वयोगटातील कोणत्याही देशाच्या मुलांसाठी खूली आहे. गूगल, जगात बदल घडवून आणणार्‍या कल्पनांच्या शोधात आहे. ह्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी गूगल वर आपले खाते असणे आवश्यक आहे. आपली प्रवेशिका दाखल करण्याची अंतीम तारीख आहे ३० एप्रिल २०१३.

मायबोलीवरील जास्तीत जास्त पालक शिक्षकांनी आपापल्या पाल्या / विद्यार्थ्यांना सहभागी होण्यास उत्तेजन द्यावे.

अधिक माहीती साठी ह्या दुव्यावर टिचकी मारू शकता......

https://www.googlesciencefair.com/#!/en/2013/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आगाऊ, अरे वा! मग मागील स्पर्धांमधे भाग घेताना आलेल्या अनुभवावर लिहाल का?
कोण कोणते विषय होते, कशी आणि काय काय तयारी केली होती, विजेता ठरवण्याची पद्धत, विजेत्यांच्या तुलनेत आपण कुठे आहोत, ई. ई.

अरे वा.
मायबोलीवरील जास्तीत जास्त पालक शिक्षकांनी आपापल्या पाल्या / विद्यार्थ्यांना सहभागी होण्यास उत्तेजन द्यावे. >>++

मस्त स्पर्धा आहे ही! >> हो, हो. गेल्या वर्षी त्याच्या आदल्या वर्षीचे विजेते आणि त्यांनी सादर केलेली प्रोजेक्टस् मी पाहिली होती. एक-एक अफलातून कल्पना होत्या. Happy

मस्त आहे स्पर्धा, विद्यार्थ्यांची प्रोजेक्ट्स ही भारी आहेत, विशेष म्हणजे भारतीय विद्यार्थीही मागे नाहीत अजिबात,
त्यांची ही प्रोजेक्टस ही छान आहेत