ती स्त्री असते...

Submitted by मी मी on 8 March, 2013 - 05:04

जन्म घेऊन या जगात येण्या इतके तुम्ही सक्षम होत नाहीत तोपर्यंत स्वतःच्या उदरात जी तुम्हाला जपते...ती स्त्री असते

जन्मानंतर जगण्यासाठी लागणार सर्वात पहिल पोष्टिक अन्न जिच्या उदरात तयार होतं ...ती स्त्री असते....

चालायला, बोलायला आणि सर्वाइव करायला लागणारी प्रत्येक महत्वाची शिकवण जी देते ...ती स्त्री असते....

सतत तुमच्या सोबतीने वावरणारी, पहिली स्त्री-पुरुष मैत्रीची देणगी देणारी तुमची हक्काची मैत्रीण तुमची बहिण ...स्त्री असते

शाळेतल्या पहिल्या दिवशी घाबरत-रडत शाळेच्या दारात पाय ठेवतांना आधाराचा हाथ देणारी आणि तुमच्यात बाहेरच्या जगासाठी विश्वास निर्माण करणारी तुमची पहिली शिक्षिका सुद्धा स्त्री असते...
तीच मग पुढे आयुष्याचे धडेसुद्धा गिरवते ....

कितीही मित्र असले तरी मैत्रीण होऊन अनेक पहिल्या पहिल्या सुंदर आंतरिक भावनांच्या जाणीवा तुमच्यात निर्माण करते ती स्त्री असते....

..जिवापलीकडे तुमची काळजी घेणारी, सोबत राहण्यासाठी अनेक अडचणी-संकटांना तोंड देऊन प्रेम देणारी आणि तुमच्यात खर प्रेम जागृत करणारी 'प्रेयसी' स्त्री असते....

स्वतःच हक्कच सगळं सोडून तुमच्यासोबत येणारी.. सुख-दुखत समान वाटेकरू, तुमच्या यशाच्या मार्गात तुम्ही घेत असलेल्या कष्टात तुमच्या सोबत होरपळ सहन करणारी,आणि तुम्हाला मिळालेल्या यशात सर्वात आधी खुश होणारी, एवढच नाहीतर बाप होण्याची सर्वात मोठी पदवी जिच्या मुळे तुम्हाला बहाल होते ती पत्नी स्त्रीच असते....

स्त्री जन्म देते..जीवन देते , स्त्री नाती देते, स्त्रीच मैत्री देते, स्त्री प्रेम देते आणि स्त्रीच जन्माची सोबत देते...मृत्यू नंतरही आत्म्याच्या शांतीसाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी दिवा लावून अश्रू गाळत अनेक दिवस-रात्र जागते ती सुद्धा कोणीतरी स्त्रीच असते....

स्त्रिजन्म हि ब्रम्हंडातली सर्वात सुंदर निर्मिती आहे....निसर्गातल्या प्रत्येक सजीवाच्या निर्मिती आणि संचीतासाठी अमुल्य देणगी आहे.......स्त्रीमनाची निरागसता, नैसर्गिक गुणधर्म पस्थितीत होरपळून निरुपाय होऊन बदलन्या आधी स्त्रीमन जपलं पाहिजे...

स्त्रियांना शरीरापलीकडे एक भावना म्हणून बघायची आणि आदराने वागायची बुद्धी पुरुषांना येऊ दे आजच्या दिवशी हीच सदिच्छा....

जागतिक महिला दिनाच्या सर्व 'माणसांना' हार्दिक शुभेच्छा....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालचा दिवस तसा बरा गेला....

नेहेमीसारखाच.....

दिवस सरता सरता
दिवसभरयाच्या घडामोडी आठवत राहिले कधी नव्हे ते....

मिश्र प्रतिक्रिया होत्या मनातही आणि गालावरच्या खळीतही ...

आणि डोळा लागला....

मग लालेलाल रंगात सजलेली ती रंगभूमी डोळ्यासमोर तरळत राहिली रात्रभर
.
.
.
.
'झुबेदा' करिष्मा

'जख्म' मधली पूजा

'अर्थ' ची शबाना

'घर' मधली रेखा...आणि

'उंबरठा' ओलांडणारी स्मिता

एका पाठोपाठ एक उगाचच नजरेसमोर येत राहिल्या जात राहिल्या......

आज सकाळ पासून मनातून मात्र जातच नाहीयेत .....

नजरेच्या टप्प्यात दिसणाऱ्या ...येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकित कुठेतरी झळकत आहेत.....

छान!

मस्त.

स्त्रियांना शरीरापलीकडे एक भावना म्हणून बघायची आणि आदराने वागायची बुद्धी पुरुषांना येऊ दे आजच्या दिवशी हीच सदिच्छा....>>> आमेन!

शुभेच्छा.. सुरेख लिहिलंयस, आज वाचलं!

खूप छान !!
<<जागतिक महिला दिनाच्या सर्व 'माणसांना' हार्दिक शुभेच्छा...>>> हे आवडलं!

कालचा दिवस तसा बरा गेला....

नेहेमीसारखाच.....

दिवस सरता सरता
दिवसभरयाच्या घडामोडी आठवत राहिले कधी नव्हे ते....

मिश्र प्रतिक्रिया होत्या मनातही आणि गालावरच्या खळीतही ...

आणि डोळा लागला....

मग लालेलाल रंगात सजलेली ती रंगभूमी डोळ्यासमोर तरळत राहिली रात्रभर
.
.
.
.
'झुबेदा' करिष्मा

'जख्म' मधली पूजा

'अर्थ' ची शबाना

'घर' मधली रेखा...आणि

'उंबरठा' ओलांडणारी स्मिता

एका पाठोपाठ एक उगाचच नजरेसमोर येत राहिल्या जात राहिल्या......

आज सकाळ पासून मनातून मात्र जातच नाहीयेत .....

नजरेच्या टप्प्यात दिसणाऱ्या ...येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकित कुठेतरी झळकत आहेत.....>>>>>आहा! मस्तच मयी

धन्यवाद सख्यांनो …. परत सगळ्या सख्याच … सख्यांनीच सख्यांना शुभेच्छा दिल्या सख्यांनीच सख्यांचे कौतुक केले …

कोई बात नही … हम साथ साथ है … ये भी कुछ कम नही

महिला दिन आणि त्या निमित्ताने मनात आलेले प्रामाणिक विचार अर्थात मागील वर्षी मांडले होते,पण ते तसे थोडे दुर्लक्षित राहिले. पहा आपणास पटतंय का ?
http://www.maayboli.com/node/41704