मानवी मन

गजर

Submitted by पॅडी on 19 March, 2024 - 01:11

बीप-बीप..! बीप-बीप..!! बीप-बीप...!!!

गजर झाला अन त्यांची झोप चाळवली. नेहमीच्या सवयीने तिला जवळ ओढण्यासाठी, दुलईमधून हात बाहेर काढत, त्याने पलंग चाचपडला. तोपर्यंत डोळ्यांमधली झोप बरीच कमी झाली होती.

ती हाताला आली नाही.

अचानक; त्याला रात्रीचं कडाक्याचं भांडण आठवलं. मग साग्रसंगीत आदळआपट. थयथयाट. आरोप प्रत्यारोप. शेवटी , एकाच पलंगावर छत्तीसचा आकडा करून, एकमेकांपासून शक्य तितक्या अंतरावर झोपणे वगैरे त्याला सर्व आठवलं. सुस्पष्ट.

हात दुलईत खेचून तो ढिम्म पडून राहिला.

विषय: 

ऑन द वे फॉर डिवोर्स

Submitted by मुक्ता.... on 23 February, 2020 - 07:49

सरमिसळ ही भयकथामालिका लिहिते आहेच. ही एक आधी अर्धवट राहिलेली लघुकथा काल पूर्ण केली. आज प्रकाशित करतेय, आय होप की भयकथेशी असलेली लिंक तुमची आणि माझीही तुटणार नाही.ही सिम्पल साधी कौटुंबिक आणि त्याच्यातील व्यक्तीच्या समाजाची आहे. प्लिज सांगा कशी वाटली ते...

ऑन द वे फॉर डिवोर्स....

मी थबकलो, काहीतरी चुकतंय,काहीतरी नाहीय...क्षणात ती ही बावरली....म्हणाली काय रे काय झालं? तर्क लढवू लागली...काही तर बोलले नाही ...मग आता हा मागे का वळला...त्याने शब्दाला शब्द द्यावा...पण मी शब्द मनातही म्हटले नाही...मग हा का वळला? काय झालं असं विचारलं म्हणून आता वाद होईल का?

विषय: 

ताक फुंकून पिणार्याचा किस्सा !

Submitted by Diet Consultant on 22 November, 2012 - 15:01

मानवी मन विचित्र असते. प्रत्येक वेळी ताक फुंकून प्यायची वेळ आली ; कि मग तशीच सवय लागते. आपण मुरतो त्यात. असा वाटत जगायचं असेल तर अशाच पद्धतीने जगायला हवे. हे सत्य आहेच. अर्थात हे सत्य असावे कि नाही हा वादाचा मुद्दा होऊ शकतो !
काहींना ताक फुंकायची वेळ येतच नाही. कारण गुंत्याच्या पलीकडे किवा गुंत्यात राहून लढण्याची किवा डीप्लोमातिक राहता येते त्यांना. केवळ वरून असे राहिले तर स्वतःला मानसिक आणि शारीरिक त्रास होतोच. मात्र देवच्या दयेने ज्यांना खरेच मनाचे बंध मृत माणसाच्या इ. सी. जी प्रमाणे ठेवीता येतात; त्याला हे देवदत्त वरदानच.

Subscribe to RSS - मानवी मन