मुक्तस्रोत(Open Source)
तडका - घेरलेलं बजेट
घेरलेलं बजेट,...
बजेट जाहिर करताना
भावना म्हणे दूजी आहे
महा-बजेट वरती सुध्दा
कुठे महा-नाराजी आहे
बजेट आणि नाराजीचं
असं हे सुत्र ठरलेलं असतं
प्रत्येक-प्रत्येक बजेटला
नाराजीनं घेरलेलं असतं
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783
१९ मार्च २०१५ दै. प्रजापत्र
आयुष्य
आयुष्यात कधी कधी माणसाने कस वागव हे कळत नाही.. खुपदा आपण आपल्याच विश्वात रममाण असतो आणि आपले problem, आपली space या सारखे point कुरवाळत बसतो ..सहज आठवल विमानात जेव्हा आपण बसतो ना?तेव्हा आपल्या विश्वाला खूप मोठ मानणारी माणस अगदी किड्या मुंगीसारखी दिसतात तेव्हा आपली नेमकी लायकी कळते आणि मनाशी हसू येत ...बघ संपूर्णा विश्वामधे आपले स्थान काय आहे ?तरीही आपण आपला मी पणा सोडायला तयार होत नाही ...सगळ कळतय पण वळत मात्र काही नाही...का होत अस?हे पशुबाबत होत का?
माझे स्मार्टपण !
शीर्षक वाचून ,.... माझे माहेरपण, किव्वा माझे बालपण, असे काहीतरी वाचकाच्या मानता यावे, हा उद्देश !
कारण, एखादी नववधू, जेव्हा लग्न करायचे ठरवते, त्यानंतर साधारण, १-२ वर्ष ती आणि तिचे कुटुंब, चांगल्या स्थळाचा शोध घेतात, ४ ठिकाणी चौकशी करतात, इतराना लाभलेल्या नवर्यांचे भले बुरे गुण जाणून घेतात आणि मगच योग्य त्या स्थळाशी सौरिक जूळवतात.
इतके सारे करून देखील, सप्तपदी मधील शेवटचे पा उल टाकताना ती शासंक असते … काय होईल ?, कसे होईल?, मला जमेल का ?...माझे आयुष्य कायमचे बदलून जाणार ….मी चांगला निर्णय तर घेतला आहे ना ?…. एक ना हज्जार गोष्टी.
सोप्या पद्धतीने मराठीत लेखन (भाग २ - युबंटू लाईव्ह सीडी)
माझा "सोप्या पद्धतीने मराठीत लेखन" हा लेख ज्यांनी वाचला असेल त्यांना मराठीत स्पेल चेक, अॅटो करेक्ट वगैरे कसे वापरायचे ते लक्षात आलेच असेल.
http://www.maayboli.com/node/39752
पण त्यासाठी कितीतरी सॉफ्ट्वेअर टाकावी लागतात. कॉन्फ्युगरेशन शिकावे लागते. हाताशी विंडोजची सिडी असावी लागते. विंडोजमध्ये मराठीत टाईप करायचे असेल तर किती सव्य / अपसव्य करावे लागतात ते इथे पहा.
तू येण्याच्या आधी काही तू गेल्याच्या नंतर..
तू येण्याच्या आधी काही तू गेल्याच्या नंतर..
सखये मी मग मोजत बसतो दोघांमधले अंतर..!!
सोपे नसते.कळले..!आयुष्याचे चंदन होणे..
वेढा घालुन बसलेला प्रश्नांचा नाग निरंतर..!!
येता-जाता 'तो' डोकावत असतो विहिरीपाशी..
'भरल्या' विहिरीतुन नक्की जगण्याचा मिळतो मंतर..!!
सारवलेली मायेने स्वप्ने शेणा-मातीची..
फरशीवर त्यांना 'पुसण्या'वाचुन नाही गत्यंतर..!!
कृष्णाला पाहुन त्या पुतनेलाही फुटला पान्हा..
मग का आजमितीच्या कैक यशोदांचे स्थित्यंतर..??
-गणेश शिंदे..
दुसरबिड,बुलडाणा...
हकनाक वेदनांचा येथे जमाव बसतो..
पाऊसलेखणीने जमिनीत काव्य कसतो..
कवितेत जिंदगीच्या तो एकरूप दिसतो..!!
म्हणतात कैक आधी जोडी खिलार होती..
आता खुटा रिकामा दारी उदास हसतो..!!
सत्कार सोहळ्याला ज्याच्याकडून शाली..
बांधावरी बिचारा तो बोडखाच असतो..!!
नुसताच आसवांचा अंदाज बांधल्याने,
रोपास भावनेच्या बघ कोंब येत नसतो..!!
इतक्या सुरेल ताना घेऊ नकोस दुःखा..
हकनाक वेदनांचा येथे जमाव बसतो..!!
-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
९९७५७६७५३७
मी नास्तिक आहे असा माझा समज आहे.... पण
सामान्य माणूस नास्तिक असू शकतो का ?
कारण मी नास्तिक आहे, असा माझा समज आहे. मी नास्तिक असण्याने इतरांना त्रास होतोय असं आजवरच्या वाटचालीवरून वाटलं नाही. पण मी नास्तिक का आहे याची कारणं मला माहीत असलीच पाहीजेत असा आजूबाजूच्यांचा आग्रह का ?
मग मिळेल ते वाचावं लागतं. म्हणजे असं वाटतं की आपण इतरांच्या कटकटीला वैतागून वाचतोय हे सर्व..
पण खरं म्हणजे
माझ्या नास्तिक असण्याशी माझा अंतर्गत झगडा चालू असतो. निरंतर.
मग सगळी तत्त्वज्ञानं थोडी थोडी, झेपेलशी चाळून मेंदू बधीर होतो. वाचनासाठी डोळे खोबणीतून बाहेर येतात आणि झोप न झाल्याने आता आत खेचले जाऊन मेंदूला चिकटतात.
तू गेल्यावर.....!!
तू गेल्यावर पक्के घर नुसते कोसळते..
आधाराला कोणी नसले की मन छळते..!!
राहू दे ना हात घडीभर स्वप्नांभवती..
'अंगण झाडायाचे आहे' मजला कळते..!!
वापरतो तू कुठले अत्तर सांगत जा रे..
धरतीवर तू कोसळतांना जग दरवळते..!!
मी नसले की वार्यावरती लक्ष असू दे..
आठवणींच्या पानोपानी मी सळसळते..!!
बांधावरचे सुकले होते झाड जरासे..
त्याला कळले जमिनीमधले दुःख तरळते..!!
प्रत्येकाचे 'घर कौलारू' सुंदर नसते..
अंदर गेल्यावर कळते,छप्परही गळते..!!
आयुष्याची भाकर साला चन्द्र नसावा..
ते तर नक्की सुर्याइतके सत्य उजळते..!!
विषय क्रमांक २ - आमच्या दाते बाई
जून-जुलै महिन्यातील एक दुपार आणि बाहेर पडत असलेला धुवाधार पाऊस. तिसर्या मजल्यावरच्या आमच्या वर्गात खिडकीजवळच्या बाकावर बसून आषाढातल्या पावसाचे विहंगम सौंदर्य पाहण्यात मी गढून गेले होते. सायन स्टेशनबाहेरचा तो एरवी गजबजलेला परिसर, दुपार आणि त्यात पाऊस यामुळे शांत पहुडला होता. फळे, भाज्या विक्रेते आपापल्या गाड्यांवर प्लॅस्टिक घालुन आडोशाला उभे होते. रस्त्याच्या दुतर्फा असलेली अशोक, वड, पिंपळ ही झाडे नुकत्याच न्हाऊन आलेल्या, ओलेचिंब केस पाठीवर मोकळे सोडलेल्या, हिरवाजर्द शालू नेसलेल्या नवरीसारखी तजेलदार दिसत होती. त्यावर काही पक्षी अंग चोरुन बसले होते.
Pages
