Submitted by एक प्रतिसादक on 20 February, 2013 - 00:56
कृपया कमकुवत हृदयाच्या वाचकांनी इथेच थांबावे.
हा प्राणी पहा. (चित्र आंतरजालावरून साभार)
या प्राण्यास सार्वजनिक ठिकाणी असे वागताना पाहून आपण काय केलं असतं हे थोडक्यात किंवा विस्ताराने किंवा कसेही लिहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हातच्या मुठी बंद कराव्यात
हातच्या मुठी बंद कराव्यात ...लहानपणी मैत्रीणीने सांगितलं होतं की गाढव दिसलं की मुठी बंद कराव्यात नाहितर बुद्धी निघुन जाते.... ;)..... आम्ही ते फॉलो केलय....
साहेबाच्या पुढे अन या
साहेबाच्या पुढे अन या प्राण्याच्या मागे शक्यतो उभ राहु नये अस अनुभवी लोकांकडून ऐकलय ते अमलात आणण्याचा प्रयत्न असतो.
वा ! चांगल्या आहेत कि
वा ! चांगल्या आहेत कि प्रतिक्रिया..
लोकहो, तुमच्या प्रतिक्रिया कळवा प्लीज.
सार्वजनिक ठिकाणी असे वागताना
सार्वजनिक ठिकाणी असे वागताना पाहून >>>>>>>>> असे म्हणजे कसे??
असे म्हणजे कसे?? >>>>>म्हणजे
असे म्हणजे कसे?? >>>>>म्हणजे काय ?
तुम्हीच लिहलंय ना सार्वजनिक
तुम्हीच लिहलंय ना सार्वजनिक ठिकाणी असे वागताना पाहून म्हणुन म्हटलं असे म्हणजे कसे??
असे मधे स्पेलिंग मिस्टेक आहे
असे मधे स्पेलिंग मिस्टेक आहे का असं वाटलं. चित्रं दिसतंय का तुमच्याकडे ?
वरच्या दृश्य दोन गाढवांचं
वरच्या दृश्य दोन गाढवांचं वागणं राहूंद्या हो ! सार्वजनिक ठिकाणी असा उकीरडा करणार्या चित्रात नसलेल्या गाढवांचं काय करायचं, तें बोलूंया !!!
पॉईण्टाचा मुद्दा !
पॉईण्टाचा मुद्दा !
वरच्या दृश्य दोन गाढवांचं
वरच्या दृश्य दोन गाढवांचं वागणं राहूंद्या हो ! सार्वजनिक ठिकाणी असा उकीरडा करणार्या चित्रात नसलेल्या गाढवांचं काय करायचं, तें बोलूंया !!! >>>> अगदी अगदी. भाऊंना अनुमोदन.
चालू घडामोडीच्या ऐवजी कुठल्या
चालू घडामोडीच्या ऐवजी कुठल्या विभागात हलवावं हे लक्षात न आल्याने सूचना केली नव्हती.
आकडा टाकून वर काढला बाफ.
आकडा टाकून वर काढला बाफ. कुणीतरी तळाला ढकललेला
भाऊ एक फक्कड चित्र होवून
भाऊ एक फक्कड चित्र होवून जाउद्या !!!!
एक प्रतिसादक, फारा
एक प्रतिसादक,
फारा वर्षांपूर्वी ठाण्याला रहात होतो तेव्हाची गोष्ट आहे. घराच्या बाजूला डेरेदार वृक्षे असल्याने दुपारी चांगली दाट सावली पडे. त्या सावलीत एक गाढव येऊन विसावा घेत असे. बिल्डिंगीच्या गेटासमोर नेमके गाढव दिसल्याने लोक आमच्याकडे आश्चर्याने आणि तुच्छतेने बघत. मोठ्या लोकांनी त्या गाढवाला हाकून लावायचा प्रयत्न केला पण ते पुन्हापुन्हा येत असे. आम्ही (=बाळगोपाळ) लोकांनी एक युक्ती लढवली. दिवाळीचे दिवस होते. एक डांबरी फटक्यांची माळ पैदा केली. एक पत्र्याचा डबा आणला. कुठूनशी नायलॉनची रश्शीही मिळवली.
वाचकांना आगामी घटना लक्षात आल्यास यापुढे वाचायची गरज नाही!
गाढव बसलेले होते. त्याला हाकून उभे केले. शेपटीला डबा बांधला. माळ डब्यात टाकून पेटवली व घट्ट झाकण लावले. त्यानंतर त्या गाढवाने जी काही धूम ठोकली, की ते परत आलेच नाही.
उपरोक्त गाढवांबद्दल असाच प्रयोग करून पाहायला हरकत नाही.
आ.न.,
-गा.पै.
डेरेदार वृक्षे असल्याने
डेरेदार वृक्षे असल्याने दुपारी<<
वृक्षे!!!
वृक्षे ???????
गापै, मराठी नं तुम्ही?
प्लास्टीक खाऊन मरतील बिचारी
प्लास्टीक खाऊन मरतील बिचारी ती गाढवं .
अरेच्चा! वृक्ष म्हणायचं होतं
अरेच्चा! वृक्ष म्हणायचं होतं तर चुकून वृक्षे लिहिलं गेलं. चूक दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद, इब्लिस!
आ.न.,
-गा.पै.
तुम्ही मराठीच्या बाबतीत फारच
तुम्ही मराठीच्या बाबतीत फारच मेटिक्युलस असता म्हणून छोटी चूक पटकन डोळ्यात भरते.
तुमच्या दाराशी आणुन सोडली
तुमच्या दाराशी आणुन सोडली असती ,नाहीतर गाढवाच लग्न लावल असत्,मग बसली असती गपगुमान घरात.
गाढवं प्लॅस्टिक खातात ? गाढवं
गाढवं प्लॅस्टिक खातात ?
गाढवं प्लॅस्टिक खातात ?
गाढवं प्लॅस्टिक खातात ?
पु लं ची ही गोष्ट वाचली आहे
पु लं ची ही गोष्ट वाचली आहे ना?
..आणि एके दिवशी कधीही कारणाशिवाय न ओरडणारे ते दोन गाढव निष्कारण ओरडू लागले. एकमेकांना भयंकर लाथाळी करु लागले. चहूबाजूचे लोक धावून आले. 'अशी लाथाळी आम्ही जन्मात पाहिली नव्हती' असे जो तो म्हणू लागला. गाढवीण बुचकळयात पडली. जन्मभर सालसपणाने सेव...ा करणारे हे गाढव असे का वागताहेत? तिला काही सुचेना. येथे या गाढवांची लाथाळी चाललीच होती. त्या विवंचनेत एके दिवशी संध्याकाळी ती खिन्न मनाने गावातल्या भगिनी-समाजापुढला उकिरडा फुंकीत असताना तिला शेजारच्या कुंभाराची गाढवीण भेटली.
'का, गाढवीणबाई? अशा खिन्न का?'
'काय सांगू बाई तुला? आमच्या जोडीदार गाढवांची हकीकत कळली नाही का तुला?'
'त्या भयंकर लाथाळीची ना?' शेपूट वेळावीत गाढवीण म्हणाली.
'हो!' कुठल्याशा अध्यक्षीणबाईच्या गळयात पडलेला सुकलेला हार खुराने उडवीत पहिली गाढवीण म्हणाली. 'खरं सांगू का तुला?' 'काय?' 'हा लाथाळीचं कारण मला ठाऊक आहे. पण म्हटलं, उगीच दुसऱ्यांच्या भानगडीत आपण का पडा?' 'काय ते?' कानांना नाजुक हिसडा देत गाढवीण म्हणाली. तिच्या काळयाशार नाकपुडया थरथरत होत्या. 'विचारलंस तर सांगते बापडी! परवा काय झालं, मी आणि नाम्या कुंभाराची गाढवीण चरायला निघालो होतो. मी आपली नेहमी इथे भगिनी-समाजापुढे चरायला येते. इथे पुष्कळ अहवाल, भाषणं, प्रसिद्ध महिलांचे संदेश, वगैरे खायला मिळतात. आणि मागच्या खेपेपासून मला ही वर्तमानपत्रं पचेनाशी झाली आहेत. पण नाम्या कुंभाराच्या गाढवीणीनं आग्रह केला म्हणून वाचनालयापुढचा उकिरडा फुंकायला गेले मी! तिथे तुझे ते दोन गाढव आले होते. आणि कुणाला सांगू नकोस, पण दोघांनीही दोन निरनिराळ्या संपादकांची साप्ताहिकं खाल्ली. तेव्हापासून तिथेच त्यांची लाथाळी सुरु झाली... मागे एकदा त्या एका गाढवाने कसला मजूर पुढाऱ्याच्या भाषणाचा कागद खाल्ला होता, तेव्हा तो त्याच्या कुंभारालाच लाथा मारायला लागला होता.
'पण याला उपाय काय बाई?'
'अगं, सोपा आहे. गावात तो सिनेमा आहे ना तिथे नटींची चित्रं छापलेल्या जाहिराती वाटतात. पाच-पाच जाहिराती सकाळ- संध्याकाळ खायला घाल त्यांना. लगेच गप्प होतात की नाही पाहा.' असे म्हणून दुसरी गाढवीण 'महिला आणि क्रांती'तले उरलेले भाषण खाऊ लागली. पहिली गाढवीण सिनेमाच्या रस्त्याने धावू लागली.
'तिच्या धावण्यात एक मुक्त आनंदाचा अटूट आविष्कार होता' असे वाङमयमंदिरापुढे उभा असलेला एक गाढव नंतर कोणालासे सांगत होता.
@जो >>>>>>>>>>>
@जो >>>>>>>>>>>
घरी घेउन गेलो असतो आणि पाळले
घरी घेउन गेलो असतो आणि पाळले असते
आम्ही संसदेत पाहुन कुठे काय
आम्ही संसदेत पाहुन कुठे काय करतो!
कृपया कमकुवत हृदयाच्या
कृपया कमकुवत हृदयाच्या वाचकांनी इथेच थांबावे. >>
कृपया कमकुवत हृदयाच्या
कृपया कमकुवत हृदयाच्या वाचकांनी इथेच थांबावे.>>>>>>>>>>>>>
कृपया कमकुवत हृदयाच्या
कृपया कमकुवत हृदयाच्या वाचकांनी इथेच थांबावे.. हे वाचायच कस सुटल माझ्या नजरेतुन?
गंभीर प्रश्ण आणि त्याहुनही गंभीर चित्र पाहुन मन हेलावल्यामुळे सुट्ले असेल...
अहो, जेरूसलेम मधली गाढवं
अहो,
जेरूसलेम मधली गाढवं (http://cdn1.maayboli.com/files/u40756/jerusalem_donkeys_eating_among_the...) आहेत ती. तुम्हाला काय मौजे बाळापूर खुर्द येथील वाटलीत का?? म्हणून ते डिस्क्लेमर आहे.
इब्लिस, ती जेरुसलेम गाढवं
इब्लिस,
ती जेरुसलेम गाढवं (तथा ख्रिस्ती गाढवं) आहेत. चरण्याचं ठिकाण बानफोरा, देश बर्किना फासो असं आहे.
आ.न.,
-गा.पै.
जो एस मान गये
जो एस
मान गये
Pages