आयुष्य सुखकर करण्याकरता ज्योतिषशास्त्राद्वारे मार्गदर्शन करणारे एक अग्रगण्य ज्योतिषी म्हणून पंडित संदीप अवचट आपल्याला सगळ्यांना माहितीचे आहेत. ‘पूर्वापार चालत आलेल्या अंधश्रद्धा आणि थोतांड अश्या प्रकारांना संपूर्णपणे फाटा देऊन नव्या युगात विज्ञानवादी दृष्टीकोनातून ज्योतिषाचे महत्व पटवणारे’ ही त्यांची खरी ओळख म्हणता येईल. काही दिवसापूर्वी सानफ्रान्सिस्को बे एरियामध्ये त्यांच्या ‘दिलखुलास राशी’ या कार्यक्रमामुळे त्यांची भेट झाली. या भेटीदरम्यान त्यांच्याशी झालेल्या संवादाची ही एक झलक:
फॅशनची झगमगती दुनिया डोळे दिपवणारी एक जादूमयी सृष्टी असते. पण या सुंदर, नेत्रदीपक आविष्कारामागे व झगमगाटामागे असते अपार मेहनत, कष्ट, चिकाटी आणि अशक्य वाटणार्या कल्पनांना वास्तवात आणण्याचे कसब. आपल्या स्वप्नांना व्यवहाराची जोड देत जवळपास गेली तीस वर्षे फॅशन डिझायनिंग करणार्या व व्ही. बी. बानावळकर बूटिकच्या संचालिका शीतल बानावळकर कोलवाळकर यांच्याशी संवाद साधताना जाणवतात ते त्यांनी आपल्या व्यवसायासाठी घेतलेले उदंड कष्ट, जिद्द, मेहनत आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची त्यांची आकांक्षा. मायबोलीच्या वाचकांसाठी घेतलेली ही त्यांची खास मुलाखत.
एक मुलाखत: गप्पाटप्पा शिळबाबांसोबत
श्रोतेहो, आज होळीनिमीत्त आपल्या स्टुडीओमध्ये प्रसिद्ध शिळपादक श्री. शिळबाबा आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलून त्यांच्या या आगळ्यावेगळ्या छंदाबाबत माहीती करून घेवूया.
निवेदकः नमस्कार शिळबाबा. होळीनिमीत्ताने आपणाला शुभेच्छा.
शिळबाबा: नमस्कार, नमस्कार. आपणालाही होळीच्या शुभेच्छा!
निवेदकः शिळबाबा, संपूर्ण राज्यात आपल्या शिळपादनाची किर्ती पसरलेली आहे. गावोगावी आपल्या शिळपादनाचे कार्यक्रम होतात. या सर्व कार्याबद्दल आपल्याला काय वाटते?
शेतसाहित्यीक श्री. भरत कुलकर्णी यांची मुलाखत
नमस्कार श्रोतेहो.
आज आपल्या स्टूडीओमध्ये ग्रामीण भागातले शेतसाहित्यीक श्री. भरत कुलकर्णी आलेले आहेत. त्यांच्या कादंबर्या, लेख, कथा, निबंध प्रसिद्ध आहेतच तसेच कवितांचे पीक ते जोमाने दर हंगामात घेतात. पंचक्रोशीतील इतर शेतकवी त्यांच्या उत्पादनातून नेहमीच प्रेरणा घेत आलेले आहेत. त्यांच्या शेतसाहित्याविषयी आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत.
मी: नमस्कार भरत कुलकर्णी साहेब.
भरत कुलकर्णी : नमस्कार.
आयुष्यात एक गरज म्हणून नोकरी-व्यवसाय करणारे अनेकजण असतात. परंतु स्वतःची वैयक्तिक आवड जोपासत डोळ्यांसमोर निश्चित उद्दिष्ट ठरवून व्यवसायाच्या दृष्टीने शिक्षण घेणे, त्यानुसार मार्ग आखत योजनाबद्ध सुरुवात करणे, व्यवसायाचा नियोजनपूर्वक टप्प्या-टप्प्यांत विस्तार, नवनवीन आव्हानांच्या शोधात स्वतःतील कौशल्यगुणांना वाव देत राहणे हे सर्वांनाच जमते असे नाही!
कॅनिंग किंवा फळप्रक्रिया म्हटले की प्रथम नजरेसमोर येतात ते हवाबंद डबे. एखादा अन्नपदार्थ विशिष्ट प्रक्रिया करून हवाबंद डब्यात सील करून जास्तीत जास्त टिकविण्याच्या पद्धतीला कॅनिंग असे म्हटले जाते. फळांवर वेगवेगळ्या प्रक्रिया करून त्यांपासून सॉस, सरबते, पावडरी इत्यादी टिकाऊ प्रकारांत त्यांचे रुपांतर करण्याचा व्यवसाय हा जसा घाऊक प्रमाणात चालतो तसाच तो घरगुती स्वरुपातही करता येतो.
आमची सोसायटी म्हणजे एक छोटे गावच जणू. त्यात आमचा एक सांस्कृतिक मंचही आहे. गाण्यांचे कार्यक्रम, मुलाखती, काही माहितीपर कार्यक्रम त्यात आम्ही सादर करतो.
कधी आमच्याच सोसायटीतील मुलांच्या गाण्याचा कार्यक्रम असतो , कधी सोसायटीतील गाणे शकलेल्या महिलांचा गाण्याचा कार्यक्रम , कधी बाहेरच्या नव्या कलाकारांना संधी तर कधी प्रतिथयश कलाकारांचा कार्यक्रम वा त्यांची मुलाखत ! असे विविध कार्यक्रम यात सादर होतात.
वर्षातून ६ ते ८ कार्यक्रम आम्ही सादर करतो. सोसायटीतील अनेक जण या मंडळाचे वर्गणी देऊन सभासद आहेत, तर काही नुसतेच कार्यक्रम बघायला येणारे ही आहेत
(खुप दिवसांपासून माझे वरिष्ठ संपादक मला सुप्रसिद्ध अभिनेत्री करूणा कर्पूर यांची मुलाखत घेण्यास सांगत होते. गेल्या पंधरवड्यात एके दिवशी तिच्या सेक्रेटरी आहूजाशी फोनाफोनी करून तिची वेळ ठरवून घेतली. गेल्या आठवड्यात गोरेगावात फिल्मीस्तानमध्ये तिच्या आगामी पिच्चर 'तेरी आंखे काली काली - The Black End' याची शुटींग चालू होती. आम्हाला तिने तेथेच बोलावले. गेटवर आमचे नाव सांगीतले. स्टूडीओत अजून इतर चार पिच्चरचे शुटींग असल्याने बर्यापैकी गर्दी होती. आम्हास आतमध्ये सोडण्यात आले. स्पॉटवर गेलो तर करूणा कर्पूर अन वहिद कर्पूर यांच्या 'तेरे हाथमें अंगूठी हिरेकी' या गाण्याचे टेक चालू होते.