डॉ. अनिल अवचट यांच्याशी गप्पा : व्हिडिओ लिंक

Submitted by अवल on 27 December, 2010 - 02:24

आमची सोसायटी म्हणजे एक छोटे गावच जणू. त्यात आमचा एक सांस्कृतिक मंचही आहे. गाण्यांचे कार्यक्रम, मुलाखती, काही माहितीपर कार्यक्रम त्यात आम्ही सादर करतो.

कधी आमच्याच सोसायटीतील मुलांच्या गाण्याचा कार्यक्रम असतो , कधी सोसायटीतील गाणे शकलेल्या महिलांचा गाण्याचा कार्यक्रम , कधी बाहेरच्या नव्या कलाकारांना संधी तर कधी प्रतिथयश कलाकारांचा कार्यक्रम वा त्यांची मुलाखत ! असे विविध कार्यक्रम यात सादर होतात.

वर्षातून ६ ते ८ कार्यक्रम आम्ही सादर करतो. सोसायटीतील अनेक जण या मंडळाचे वर्गणी देऊन सभासद आहेत, तर काही नुसतेच कार्यक्रम बघायला येणारे ही आहेत Happy
अर्थात सोसायटीतल्या सगळ्यांनाच हे कार्यक्रम बघायला आम्ही आमंत्रित करतो.

या महिन्याच्या सुरवातीला प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, लेखक, कलाकार मा. डॉ. अनिल अवचट यांना आमच्या सोसायटीतील या सांस्कृतिक मंचातर्फे बोलावले होते. इतक्या चटकन त्यांनी यायचे मान्य केले. आणि आल्यावर इतक्या छान, मोकळ्या आणि मनसोक्त गप्पा मारल्या त्यांनी... खुप खुप छान झाला कार्यक्रम.

आमच्यातल्या अनेकांना वाटलं ही मुलाखत परत परत ऐकावी. मग हा व्हिडिओ नेटवर टाकायचा विचार केला. यालाही बाबांनी इतक्या चटकन मान्यता दिली...

अतिशय सरळ, स्वच्छ, निर्लेप मनाचे, अतिशय प्रगल्भ असे हे व्यक्तिमत्व...

खरे तर त्या दिवशी आमचा इलेक्ट्रिशीयन आयत्या वेळेस एका अडचणीत अडकला. त्यामुळे लाईटची सोय नेहमीसारखी करता आली नव्हती.

बाबांना प्रेक्षक अन प्रेक्षकांना बाबा नीट दिसत नव्हते. पण तरीही गप्पा रंगल्या. हा व्हिडिओही लाईट नीट नसल्याने छान नाहीये याची मला कल्पना आहे. पण बाबांशी झालेल्या गप्पा सगळ्यांशी शेअर कराव्यात म्हणून तो पिकासावर टाकलाय.

खरं तर ही संपूर्ण मुलाखत शब्दांकित करून इथे लिहिणार होते. पण हे सर्व शब्दांकन करायला खुप वेळ लागू लागला. त्यामुळे त्याऐवजी हा व्हिडिओच इथे टाकतेय. अ‍ॅडमिन हे चालेल ना ?
आशा आहे की तुम्हालाही आवडेल ऐकायला.

पिकासावरची लिंक : http://picasaweb.google.com/aratikhopkar/AnilAwachat#5555233155511877842

धन्यवाद !

गुलमोहर: