डॉ. अनिल अवचट
'जब जाना आतमराम...' - डॉ. अनिल अवचट
परबत सालिगराम ।
सब नदिये गंगा भयी
जब जाना आतमराम ॥
या कबीराच्या दोह्यानं 'हा भारत माझा' या चित्रपटाची सुरुवात होते. आपल्या अंतर्मनात डोकावयाला भाग पाडणार्या या चित्रपटाबद्दल सांगत आहेत डॉ. अनिल अवचट...
डॉ. अनिल अवचट यांच्याशी गप्पा : व्हिडिओ लिंक
आमची सोसायटी म्हणजे एक छोटे गावच जणू. त्यात आमचा एक सांस्कृतिक मंचही आहे. गाण्यांचे कार्यक्रम, मुलाखती, काही माहितीपर कार्यक्रम त्यात आम्ही सादर करतो.
कधी आमच्याच सोसायटीतील मुलांच्या गाण्याचा कार्यक्रम असतो , कधी सोसायटीतील गाणे शकलेल्या महिलांचा गाण्याचा कार्यक्रम , कधी बाहेरच्या नव्या कलाकारांना संधी तर कधी प्रतिथयश कलाकारांचा कार्यक्रम वा त्यांची मुलाखत ! असे विविध कार्यक्रम यात सादर होतात.
वर्षातून ६ ते ८ कार्यक्रम आम्ही सादर करतो. सोसायटीतील अनेक जण या मंडळाचे वर्गणी देऊन सभासद आहेत, तर काही नुसतेच कार्यक्रम बघायला येणारे ही आहेत
'मुक्तांगणची गोष्ट' - डॉ. अनिल अवचट
मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचं हे रौप्यमहोत्सवी वर्षं. डॉ. सुनंदा अवचट आणि डॉ. अनिल अवचटांनी हे केंद्र सुरू केलं त्याला निमित्त ठरला त्यांच्या एका स्नेह्यांचा व्यसनाधीन मुलगा. दारू, गर्द यांचं विश्व किती भयप्रद आहे, हे या निमित्तानं अवचट दांपत्याच्या ध्यानी आलं. 'गर्द' ही लेखमालिका अनिल अवचटांनी व्यसनाधीनांच्या आयुष्यावर लिहिली, आणि त्यातून जन्म झाला 'मुक्तांगण'चा.