जसा एक धागा असंबद्ध गप्पांसाठी आहे, तसा हा सुसंबद्ध गप्पांसाठी. नियम फक्त तीनच पाळायचे:
१. प्रतिसाद आधीच्या प्रतिसादाशी सुसंगत असायला हवा
२. विषयाचे बंधन नाही पण व्यक्तिला/प्रतिसादकर्त्याला उद्देश्यून/व्यक्तिगत प्रतिसाद नकोत
३. दीर्घ प्रतिसाद नकोत. एकदोन ओळीच ठीक.
"पांडू दा काय केलं?" म्हणत बाळू दा म्हशींच्या मागोमाग गावातून सडकेवर यायचा.
पांडू दा आणि अजून चार सहा माणसं सडकेला पिंपळाच्या पाराखाली एसटीची वाट बघत निवांत उभी असायची.
"मात्र बाई लै जिगरबाज वो" एकजण म्हणायचा
"तर काय वो... एकेकाला पुरून उरतीया. टाचेखाली कशी दाबून ठीवल्यात माणसं. जीतल्या तित्त. ह्या ह्या... सादं काम न्हायी त्ये..." दुसरा तंबाकू चोळता चोळता बोलायचा
"आता लावती ब कशी एकेकाला कामाला" लांबवर बसलेला कोणतरी वरच्या पट्टीत आवाज काढून बाकीच्यांच्या सुरात आपला सूर लावायचा.
एक मुलाखत: गप्पाटप्पा शिळबाबांसोबत
श्रोतेहो, आज होळीनिमीत्त आपल्या स्टुडीओमध्ये प्रसिद्ध शिळपादक श्री. शिळबाबा आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलून त्यांच्या या आगळ्यावेगळ्या छंदाबाबत माहीती करून घेवूया.
निवेदकः नमस्कार शिळबाबा. होळीनिमीत्ताने आपणाला शुभेच्छा.
शिळबाबा: नमस्कार, नमस्कार. आपणालाही होळीच्या शुभेच्छा!
निवेदकः शिळबाबा, संपूर्ण राज्यात आपल्या शिळपादनाची किर्ती पसरलेली आहे. गावोगावी आपल्या शिळपादनाचे कार्यक्रम होतात. या सर्व कार्याबद्दल आपल्याला काय वाटते?
आज संकष्ट चतुर्थीच्या शुभ दिवशी हा गगो गणेश सादर करताना मला विशेष आनंद होत आहे. ह्यात गप्पागोष्टी या गप्पांच्या पानावर नियमित येणार्या काही सदस्यांचे आयडी गुंफले आहेत मूळ रेखाचित्र काढणार्या उदय इनामदार म्हणजेच udayone यांनी तर संगणकावर त्याला विविध कलाकारी दाखवून अधिक देखणं केलं आहे पद्मजा जोशी म्हणजेच पद्मजा_जो यांनी.

निरुद्देश गप्पा
"काय ग ! फोन केला होतास ना आपल्या प्रियसखीला ? आपण सगळे जमलोत नि तिचा मात्र पत्ता नाही. येतेय् ना ती ?"
" येतेय् मालिका संपल्यावर ! फार अटीतटीच्या वळणावर आली आहे म्हणे गोष्ट ! इकडे आली तरी ’गप्पात लक्ष लागणार नाही’ म्हणाली."
"काय बाई हे टी व्ही चं वेड तरी! बरं काही नाविन्य तरी असतं का य मालिकात? तेच ते नि तसंच ते!"
" हो ना! आता गावाकडली मुलगी शहरातल्या श्रीमंत, आधुनीक घरात येणे ही कल्पना किती मालिकात वापरली गेली आहे !
’मन उधाण वार्याचे’, तुजवीण सख्या रे, कुंकू --"
गप्पागोष्टी ह्या गप्पांच्या पानाला फार काळ लोटलेला नसल्याने आणि इथे येणारी लोकं प्रचंड कार्यमग्न असल्याने पानही फारसे वाहतं नसतं. अनेकांचे भ्रमणध्वनी क्रमांकही एकमेकांकडे नव्हते यामुळे गटगला उपस्थिती किती असेल ह्याबाबत मी जरा साशंकच होतो, तरीही Slow and steady... ह्या इंग्रजी म्हणीप्रमाणे गटग आयोजित करण्याचे धाडस तर करुया या विचाराने सगळ्यांना विपत्र टाकले. त्याप्रमाणे एक ऑगस्टला संध्याकाळी पाच वाजता कोथरुड येथील किमया हॉटेलमध्ये भेटायचं ठरलं.