ललित

वो फिर नही आते ...!!

Submitted by मी मी on 2 May, 2014 - 14:23

आपण बरेचदा स्वतःला एका विशिष्ट चौकटीत बांधून घेत असतो ....एखाद्या वस्तूच्या मोहात, एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात, एखाद्या कामाच्या धुंदीत तर कधी स्वतःच्याच संकुचित विचारांच्या विळख्यात ........या परिस्थितीत असतांना तशाच किंवा त्यापेक्षा सुरेख आकर्षक किंवा आव्हानात्मक गोष्टी या चौकटीच्या बाहेर असू शकतात आणि त्या आपल्या हाथून निसटत चालल्या आहेत याचे भान सुद्धा गमावून बसतो ......जेव्हा जाग येते, चौकट सुटते तेव्हा मात्र आपण या जगापासून, चांगल्या जगण्यापासून फार मागे सुटलो आहोत किंवा सगळं चांगलं मागे सोडून देऊन खूप पुढे निघून आलो आहोत याची जाणीव होते........

विषय: 
शब्दखुणा: 

पाऊस भावना... (स्फुट)

Submitted by मी मी on 28 April, 2014 - 11:44

पावसाचंही कसं असतं ना...वळवाचा पाउस ...
कधीतरी कोसळतो आभाळ फाटून गेल्यासारखे…. धो धो धो धो
जणू कशाचेच भान नाही, आपल्याच तोरयात

झाडे-फुले, डोंगर-दरी, पक्षी-प्राणी कुणाचीच काळजी नसावी असे,
सगळ्यांनाच उन्मळून टाकायला धावून आलाय जसे ....

सगळंच असण्याचं नसणं करायला व्याकूळ ....
निसर्गाचं मापन खोळंबून टाकावं इतकी असूया घेऊन

एकाच संधीत सगळं लुटून घ्यावं या हावरट भावनेनं व्यापून....
पावसाचंही कसं असतं ना..

पण हाच पाउस फार हळुवार असतो कधी .. रिमझिम किंवा सरसरत
अखंड पडत असतो.. पण सारं सारं भिजवायला फक्त येतो....

कुणालाही इजा होऊ नये इतका अलगद इतकं जपून ...

विषय: 
शब्दखुणा: 

कथालेखनाविषयी काही कथाबाह्य (म्हटले तर यक्ष-) प्रश्न

Submitted by बोबो निलेश on 21 April, 2014 - 12:20

-------------
कथालेखनाविषयी काही कथाबाह्य (म्हटले तर यक्ष-) प्रश्न
खरं तर हे कुठल्याही लेखनाला लागू पडतील.
-------------
१. कथालेखनासाठी स्फूर्ती देवतेची वाट पहात बसावी की "दिसामाजी काहीतरी ते लिहावे" हे प्रमाण मानून रोज काहीतरी लिहावे(च)
२. खूप मेहनत घेऊन तुम्ही एक कथा लिहिलीत. स्वतःवर प्रचंड खुश झालात आणि अचानक कुणीतरी तुमच्या निदर्शनास आणून दिले की त्या कथेची सुरुवात, शेवट किंवा संपूर्ण कथा कुठल्यातरी अमुकतमुक कथा, कादंबरी, चित्रपट किंवा नाटकाशी मिळती जुळती आहे. तुम्ही ती दुसरी कथा, कादंबरी, चित्रपट किंवा नाटक पाहिलेले नाही. अशा वेळी आपल्या कथेचे काय करावे?

शब्दखुणा: 

प्रवास

Submitted by ज्योति_कामत on 28 March, 2014 - 02:56

बरेच दिवसांनी नवर्‍याबरोबर रेल्वेने एका छोट्या प्रवासाला निघाले होते. आदल्या दिवशीच पुण्याहून बसने परत आले होते आणि तत्कालमधे रिझर्व्हेशन करायलाही जमलं नव्हतं. तीन साडेतीन तासांचा प्रवास आहे, जाऊ जनरलमधे बसून म्हटलं आणि निघालो. स्टेशनवर पोचलो तर गाडी अर्धा तास लेट असल्याचं शुभवर्तमान कळलं. मग तिकीट काढून जनरलचा डबा समोर येईल अशा बेताने प्लॆटफॉर्मवरच पेपर टाकून मस्त बैठक मारली. रूळ क्रॉस करणार्‍या बर्‍याच मंडळीचं निरीक्षण करून झालं. एक पाणचट चहा पिऊन झाला. शेवट अर्धा तास उशीरा येणारी गाडी एक तास उशीरा येऊन प्लॆटफॉर्मला लागली.

शब्दखुणा: 

लेखकाला लिखाणाची प्रचंड भूक लागलेली असते ....

Submitted by मी मी on 2 December, 2013 - 00:12

लेखकाला खरतर लिखाणाची प्रचंड भूक लागलेली असते लिहिणे सुचले नाही किंवा लिहायला मिळाले नाही कि उपासमारच झाल्यागत होते जणू.

जसे चवी चवीचे जेवणाचे प्रकार तसे अनेक विषयवार लिखाण पण त्यातल्या त्यात एखादा विषय जास्त चविष्ट लागतो चघळून चघळून चोथा होईपर्यंत चर्वण करत राहावा वाटतो.

विषय: 
शब्दखुणा: 

प्रवाहपतित.......

Submitted by अलका गांधी-असेरकर on 26 October, 2013 - 14:12

किती भराभर चाललेत ना दिवस.२०१३ आता कालपरवा तर सुरू झालं न् संपतही आलं एवढ्यात..?
फांदिवरून पिकलेलं एकेक पान गळत राहावं तसा कॅलेंडरमधून गळत राहतो एकेक दिवस..उजाडताच जगण्याच्या चहुदिशांनी भिरभिरत राहतो दिवस...आणि जगण्यालाच संपवत राहतो...रात्रीच्या कुठल्यातरी प्रहरी, गर्द कुहरात विरत राहतो ...

कधी डायरीत जाऊन बसतो दिवस. ...पिरॅमिडमधल्या ममीसारखा राहतो तिथं जपून..आपली ओळख नाव नंबरासह राखून..
पानं फुटत राहतात ...झाडाला ...तशीच कॅलेंडरलाही...झाडाला माहीत नसतं नेमकं कुठल्या पानानंतर सुरू होतं वठणं..जगण्याला तरी कुठं ठाऊक असतं कॅलेंडरच्या नेमक्या कोणत्या पानात असतंय त्याचं संपणं..

विषय: 
शब्दखुणा: 

पैला नंबर

Submitted by आतिवास on 25 September, 2013 - 10:52

आमच्या म्हाडिक गुर्जींना बाळ झालं. म्हंजे त्यांच्या बायकोला वो.

गोरी मिटट पोरगी. मी कडे घेतलं की खिदळायची.
आमी सर्वे मऊ हून जायचो.
नादच झाला तिला कडेवर घेऊन हिंडायचा. कुटंकाबी जावा.

म्हाडिक बै सारखी वरडाय लागली, “आन्ज्ये, अगं घे की पोरीला ...”
अंक्या म्हणला, आता तुजा पैला नंबर पक्का.

पण मला कटाळा यायला.
सारखी बबली माझ्यासंगं.

कुणी मला खेळायला बी घेईना.
झाडावर चढता यीना, पळता यीना, मारामारी तर बंदच.
हात बी दुखायला लागला. बबली जड लई.

एक दिस कुणाचं ध्यान नाही ते बगितलं.
जोरात चिमटा काढला बबलीला.
रडली लई. खच्चून.

आता अजाबात येत न्हाई ती माझ्याकडं.

शब्दखुणा: 

मनाचं मेनडोर ….

Submitted by मी मी on 21 August, 2013 - 09:30

अर्धच दार उघडं
मनाचं मेनडोर ….
आणि आपण बसतो त्या पुढेच पहारा देत
येणाऱ्या जाणार्यांसाठी … विचार करत
कुणीतरी मनाच्या या दारातून आत येइल
कायमचा इथला भाग होईल… कदाचित !!

नाहीच … तर निदान डोकावेल तरी
बघून हसेल अन निदान
आज पुरता तरी दिवस बहरेल !!

घरातल्या खिडक्यांकडे मात्र लक्षही नसतं आपलं
त्या खिडकीत कधी चिमण्या येतात कधी सावरी
कधी मंद फुलांचा गंध
कधी कधी पावसाची सर, वार्याचा झोत…

पण … येतात अन निघून जातात
आपल्या बघण्याची वाट बघून…

कधीतरी त्या कवडस्याकडे तरी पाहिलंय का ?
कुठल्याश्या फटीतून आत शिरतो न विचारता न सांगता
जमिनीवर वाकून पायापर्यंत पसरत

विषय: 

लख्ख..!

Submitted by बागेश्री on 24 July, 2013 - 23:41

अपूर्णतेच्या खिन्नतेने तळमळत,
जागलेल्या रात्री...

चढत्या रात्रीने शहाणपण शिकवलं!
खरं खोट्याची सीमा लख्ख केली...

नवी उमेद श्वासात भरून घेता आली,
खंतावणार्‍या गोष्टींमध्ये अडकून राहिलेला पाय अलगद सोडवता आला..

ह्या खिन्नतेमुळे आलेली डोळ्यांवरची झापड, दूर सारता आली..
जगण्यातले अनेक पैलू, डोळसपणे बघता आले

कुठल्याही भावनांचा डोह आता दुरून पाहता येतो,
त्या भावनांत डुबकी मारून बाहेर आल्यानंतर,
अंगावरचे कपडे निथळेपर्यंतच त्याची ओल टिकते, ही अक्कल आली...

स्वतःहून अशी मारलेली उडी परवडते..
योग्य वेळी बाहेर येण्याचं भान राहतं,

शब्दखुणा: 

दहा रुपयांची नोट

Submitted by vaiju.jd on 19 June, 2013 - 13:38

||श्री||

सहावीत असेन मी! रात्री पपांनी हांक मारली. दहा रुपयांची नोट देत म्हणले, ” उद्या फी भरून टाक शाळेची.’
त्यांच्या समोरच मी माझे दप्तर घेऊन त्यातल्या एका पुस्तकात दप्तरातच ती नोट सरकवून ठेवली.ते पुस्तक शाळेच्या पहिल्या तासाच्या विषयाचे होते म्हणजे लगेचच फी द्यायला बरे!
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पपांनी विचारले ,” फी दिलीस का? पावती कुठे आहे?”
“आज आमच्या क्लासटीचर बाई रजेवर होत्या म्हणून फी दिली नाही.” मी
“ठीक आहे. ती नोट मला परत दे. उद्या मी भरून टाकीन.” पपा

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - ललित