वो फिर नही आते ...!!

Submitted by मी मी on 2 May, 2014 - 14:23

आपण बरेचदा स्वतःला एका विशिष्ट चौकटीत बांधून घेत असतो ....एखाद्या वस्तूच्या मोहात, एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात, एखाद्या कामाच्या धुंदीत तर कधी स्वतःच्याच संकुचित विचारांच्या विळख्यात ........या परिस्थितीत असतांना तशाच किंवा त्यापेक्षा सुरेख आकर्षक किंवा आव्हानात्मक गोष्टी या चौकटीच्या बाहेर असू शकतात आणि त्या आपल्या हाथून निसटत चालल्या आहेत याचे भान सुद्धा गमावून बसतो ......जेव्हा जाग येते, चौकट सुटते तेव्हा मात्र आपण या जगापासून, चांगल्या जगण्यापासून फार मागे सुटलो आहोत किंवा सगळं चांगलं मागे सोडून देऊन खूप पुढे निघून आलो आहोत याची जाणीव होते........

'जिंदगी कि सफर में गुजर जाते है जो मुकाम, वो फिर नही आते……. वो फिर नही आते'

मग काय परत सुटलेली गाडी पकडण्याची धडपड, धावपळ चालू होते.......
हा रस्ता गाठतांना धावत असतांना परत एखादे चिकट, विणलेले, मोहमयी जाळे लागणार नाही आणि अडकायला होणार नाही असेही सांगता येत नाहीच......पण तरीही अनुभव बरंच काही शिकवतो. निदान अडकलो तरी चिकटून बसायचं नाही, बाहेर पडायचं जगण्यासाठी धडपड करायचीच हे तरी लक्षात आणून देतो.

'सुबह आती है रात जाती है, वक्त चलता ही रहेता है रूकता नही
एक पल में वो आगे निकल जाता है, आदमी ठीक से देख पाता नहीं
और परदे पर मंझर बदल जाता है'

काही गाणी सुद्धा किती काही सांगू पाहत असतात… आपले मात्र केवळ कानाने ऐकणे तेवढे होते. आत ते झिरपतच नाही. आणि न कळलेले न वळलेले ते क्षण निघून जातात परत न येण्यासाठी. जेव्हा कळतात तेव्हा जरा वेळंच झालेला असतो…… नाही ?

' एक बार चले जाते है जो दिन रात सुबह शाम …. वो फिर नही आते'

https://www.youtube.com/watch?v=GgaIgQhn-Rk

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

Mayi far surekh vishay. My fev song. Jeevan jevha samjat nahi tevha far sunder asate pan jevha samjate tevha ...... Aaso rahval nahi mhanun ha pratisad... Tumhala lekhana chya khup subheccha .