मुक्तक

शाप

Submitted by पाचपाटील on 23 May, 2021 - 10:51

नेटफ्लिक्स,ॲमेझॉन,सोशल मीडिया
अन-इन्स्टॉल कर सगळं
गच्च भरून गेलंय डोकं
अजून किती कोंबशील
वाचूही नकोस
काही अर्थ नसतो त्यात
पुस्तकांचाही वैताग येण्याचे दिवस
आणि व्हिस्कीचाही कंटाळा येण्याच्या रात्री
सगळे स्वतःपासून पळण्याचे धंदे
बंद करून घे चहुबाजूंनी कडेकोट
मग स्वतःला कवटाळ
व्हायचं ते होईल बेंचो
कायकू डरताय ?
साधी हुरहूर तर आहे
तिला काय डरायचं ?
आणि डरण्याचं वय आहे का हे?
रोज संध्याकाळी ग्रेसची प्रॅक्टिस कर,
भय इथले संपत नाही वगैरे..

शब्दखुणा: 

यक्षप्रश्न

Submitted by आतिवास on 20 November, 2015 - 00:52

१.
गर्द जंगलात
निरुद्देश भटकताना
पाणी दिसले,
तेव्हा त्याच्या काठाशी
नकळत विसावले मी.
पापणीच्या
आतल्या पाण्याला
अचानक
बाहेरच्या पाण्याची ओढ.
मी ओंजळ पुढे करताच
कोठूनसा धारदार आवाज आला:
“माझ्या प्रश्नाचे
उत्तर दिल्याविना
पाण्याला स्पर्श करू नकोस.
अन्यथा प्राण गमवावे लागतील.”

२.
महाभारतातील
कूटप्रश्न विचारणाऱ्या
यक्षाची कथा
वाचली होती मी फार पूर्वी,
बहुधा त्याचाच वंशज असणार हा!
पण आता
अशा या सैलावलेल्या क्षणी
कोण माथेफोड करणार?
आणि ते करून
ना काही सिद्ध करायचे होते,
ना काही साधायचे होते.

प्राण, जीवन क्षणभंगुर आहे हे खरे,
पण ते उगाच
दुसरे कोणी म्हणते म्हणून

विषय: 
शब्दखुणा: 

मग कधीतरी

Submitted by मित्रहो on 20 August, 2014 - 12:24

मग कधीतरी .....
त्या समुद्राला उधाण असेल,
त्या वाऱ्यालाही वेग असेल, त्या ढगातही गडगडाट असेल
त्या विजेचाही कडकडाट असेल
मग काय, तो थोडीच थांबनार, तो कोसळणारच , धो धो कोसळनार
चंद्राची सुट्टी असेल, बसची हलगर्जी असेल, दिव्यांचीही मर्जी असेल
त्या अंधारलेल्या पावसाळी,
तू आणि मी
माझ्यापुढे तू तुझ्यामागे मी, भेदरलेली तू, भांबावलेला मी
तो जीवघेणा एकांत, पावसाची सततधार,
भिजलेली मनं, पेटलेली शरीरं
काहीतरी नक्कीच घडनार आज
पण कसेचे काय,
माझी बस येइल आणि मी निघून जाइल
पण छत्री मात्र स्टॉपवरच विसरुन जाइल
मी छत्री विसरायचे कारण, तू नक्कीच समजलेली असेल

मनाचं मेनडोर ….

Submitted by मी मी on 21 August, 2013 - 09:30

अर्धच दार उघडं
मनाचं मेनडोर ….
आणि आपण बसतो त्या पुढेच पहारा देत
येणाऱ्या जाणार्यांसाठी … विचार करत
कुणीतरी मनाच्या या दारातून आत येइल
कायमचा इथला भाग होईल… कदाचित !!

नाहीच … तर निदान डोकावेल तरी
बघून हसेल अन निदान
आज पुरता तरी दिवस बहरेल !!

घरातल्या खिडक्यांकडे मात्र लक्षही नसतं आपलं
त्या खिडकीत कधी चिमण्या येतात कधी सावरी
कधी मंद फुलांचा गंध
कधी कधी पावसाची सर, वार्याचा झोत…

पण … येतात अन निघून जातात
आपल्या बघण्याची वाट बघून…

कधीतरी त्या कवडस्याकडे तरी पाहिलंय का ?
कुठल्याश्या फटीतून आत शिरतो न विचारता न सांगता
जमिनीवर वाकून पायापर्यंत पसरत

विषय: 

अशी कशी ग तू ?

Submitted by मी मी on 2 July, 2013 - 11:41

ते म्हणायचे तिला,

"अशी कशी ग तू ?

पावसाची सर, वाऱ्याचा झोत, समुद्राची लाट, सांजवात, पहाट, पक्ष्यांचा किलकिलाट, झाडांचा सळसळाट...
सगळं सगळं तू अंतरातून अनुभवतेस, आत आत शोषून घेतेस.....

पण,,,उन्हाची झळ सोसवत नाही तुला......
सगळंच तर निसर्गाच देणं ना ?....
तू पारशालिटी करतेस बुवा....खरेपणा नाही या वागण्यात ........"

ती हसली, म्हणाली ...

" अस कोणी सांगितलय पण ...निसर्गान दिलेलं सगळंच 'आनंद' हि एकच भावना अनुभवायला दिलेलं आहे.....
सुख सुख मिळालं कि आनंदी व्हायचं, हसायचं आणि
दुखरी, खुपरी झळ आली तरीही आनंदी राहायचं?... हसायचं ?

दुःखावर अन्याय नाहीये का हा ?

विषय: 
शब्दखुणा: 

मनातल्या मनात

Submitted by जयनीत on 1 January, 2013 - 06:59

फार फार वर्षां नंतर
अचानक
तिला तिची मैत्रीण दिसते
जुनी जिव्हाळ्याची
बसमध्ये
समोरच्या सीट वर बसलेली
दोघींनाही खूप खूप आनंद होतो
विचारपूस होते
एकमेकींची
देवाणघेवाण होते
नवीन नाव, गाव, पत्त्यांची
जुन्या आठवणीत रमून जातात
काळ किती भुर्रकन उडून जातो की नाही
ह्यावर एकमत होतं
तिचा स्टॉप येतो
पुन्हा भेटण्याच्या आश्वासनाची देव घेव करून ती उतरते
पण राहूनच जातं
भेटणं निवांत
कुठल्यान कुठल्या कारणामुळे...

ही झाली फार वर्षापूर्वीची गोष्टं

फार फार वर्षानंतर
अगदी अलीकडेच
काही वर्षांपूर्वी
तिची भेट होते
तशाच जुन्या जिव्हाळ्याच्या
अजुन एकीशी

विषय: 
शब्दखुणा: 

खबरदारी -

Submitted by विदेश on 9 October, 2012 - 00:55

तुला असे मुळूमुळू रडतांना पाहून,
मी थोडातरी विरघळेन,
असे वाटले असेल तुला -

माझ्या य:कश्चित जिवासाठी
तू तुझे हे अनमोल अश्रू ढाळतेस...

माझ्या रुक्ष चेहऱ्यावर जाऊ नकोस
माझ्या कठोर काळजातही
ते अश्रू जपून साठवताना -

माझी किती तारांबळ होत आहे
हे तुला न दिसण्याची मी
खबरदारी घेत आहे !

शब्दखुणा: 

देव नाही देवळात

Submitted by विदेश on 30 September, 2012 - 11:24


देव आहे, का देव नाहीच !
एक शंका घुटमळणारी,
सदैव मनाला पोखरत आहे -

देवळाबाहेर लंगडा माणूस
एका आंधळ्याच्या ताटलीत
आदबीने जवळचे नाणे टाकत आहे -

हे असे का, ते तसे का
अपंग नसतांना माझे मन
पंगु बनायला सरावत आहे -

देव जवळून गेला तरीही
रांगेतल्या लोकांसोबत
आस्तिक-नास्तिक चर्चा रंगत आहे !
.

शब्दखुणा: 

मुक्तके

Submitted by भरत कुलकर्णी on 17 July, 2012 - 03:40

अगदी पहाटे पहाटे
रात्र पेंगुळली
शेवटी सुर्य उगवला
अन मग ती झोपी गेली

दुर कोठेतरी
रानातला वारा
कानात बोलला
अरे बघ तरी
किती छान
पाऊस पडला

नदी म्हटली
बाळांनो
वाळूसाठी खड्डे
खणू नका हो
न जाणो
कधीतरी तुम्हीच
त्यात पडाल

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - मुक्तक