मग कधीतरी .....
त्या समुद्राला उधाण असेल,
त्या वाऱ्यालाही वेग असेल, त्या ढगातही गडगडाट असेल
त्या विजेचाही कडकडाट असेल
मग काय, तो थोडीच थांबनार, तो कोसळणारच , धो धो कोसळनार
चंद्राची सुट्टी असेल, बसची हलगर्जी असेल, दिव्यांचीही मर्जी असेल
त्या अंधारलेल्या पावसाळी,
तू आणि मी
माझ्यापुढे तू तुझ्यामागे मी, भेदरलेली तू, भांबावलेला मी
तो जीवघेणा एकांत, पावसाची सततधार,
भिजलेली मनं, पेटलेली शरीरं
काहीतरी नक्कीच घडनार आज
पण कसेचे काय,
माझी बस येइल आणि मी निघून जाइल
पण छत्री मात्र स्टॉपवरच विसरुन जाइल
मी छत्री विसरायचे कारण, तू नक्कीच समजलेली असेल
खर सांगू प्रिये, अग मी खरच छत्री विसरलो असेल
मग कधीतरी...
त्या बागेत मोकळी हवा असेल, वाऱ्यात गारवा असेल
डस्टबीनमधे कचरा असेल, लॉनवर फक्त ग्रास असेल
मुलांचा कल्ला असेल, पक्ष्यांची किलबिल असेल
म्हातारीचे समोसे असेल, काकांचे दाणे असेल,
त्या गर्दीच्या संध्याकाळी,
तू आणि मी
माझ्याबाजूला तू तुझ्याबाजूला मी, लोटलेली तू पहुडलेला मी
मनात विचारांचे काहूर तर डोळ्यात स्वप्नांची गर्दी
आयुष्य जगू या सोबतच ताप असो की सर्दी
मनात हा एकच विचार असेल, बाहेरच्या गर्दीची मात्र भिती असेल
पण त्या गर्दीतही एकांत असेल आणि एकांतातही गर्दी असेल
मग कधीतरी....
तुझ्या माझ्यात तो कॉफी डेचा टेबल नसेल
तुझ्या ओठांवर खेळनारा, पण मला डिवचनारा
तो कॅफे लॅटेचा फेसही नसेल,
ते पाच रुपयाच्या कॉफीला पन्नास रुपायचे लेबल नसेल
दोघ मिळून एक प्लेट आणि घशात अडकलेला गोलगप्पा
एवढेच काय ते भांडवल असेल
त्या मंतरलेल्या दुपारी
तू आणि मी
बिनधास्त तू बुजलेला मी, खुशीत तू विचारात मी
तू माझ्या जवळ येशील
मला ठसका लागेल, तू विचारशील माझ्या ठसक्याचे कारण
मी म्हणेल अग सवय आहे मला
तू आणखीन जवळ येशील, माझा हात हातात धरशील
माझ्या डोळ्यात डोळे घालून विचारशील
राजा लग्न करशील माझ्याशी, जन्माची साथ देइल तुला
मला परत ठसका लागेल, अग खरच सवय आहे मला
मग कधीतरी...
भर मे महीन्यातही गुलाबी थंडी असेल
दहा दहा वाजेपर्यंत रजइ पांघरुन झोपायची वेळ असेल
पाण्याचे टाके भरले असूनही आंघोळीचा कंटाळा असेल
त्या गुलाबी सकाळी
तू आणि मी
त्या कडावर तू या कडावर मी, उत्साहात तू निजलेला मी
तू मला जवळ ओढशील, घट्ट मिठी मारशील
माझ्या केसातन बोटे फिरवशील,
माझ्या डोळ्यात डोळे घालून विचारशील
राजा सारा उत्साह मलाच रे कसा
तू तर रजइ फक्त पांघारायलाच घेतो जसा
असाच रोज इथे स्टॉपवर उभा असतो मी, बघत तुझ्या बसकडे
कधीतरी नजर तुझी वळेल का ग माझ्याकडे
रोज विचार करतो, कधीतरी
या स्वप्नातही सत्य असेल, त्या सत्यातही स्वप्न असेल
मित्रहो
www.mitraho.wordpress.com
(No subject)