सकाळ झाली सुर्य उगवला. उगवला ? हो आपण असच नाहीका म्हणत पिढ्यानपिढ्या ? मराठीतही तेच म्हणतो आणि आपल्याला अधुनिकतेचा वारसा शिकवणार्या इंग्रजीतही तेच म्हणतो.
खर तर सुर्य स्थिर आहे, पृथ्वी स्वतभोवती फिरते आणि सुर्यासमोर येते म्हणुन सकाळ होते हे सत्य आता शाळेतच शिकवले जाते. तरी आपल्या घरी, आजुबाजुला हेच बोलले जाते. किंबहुना शाळेत हे सत्य शिकवणारे शिक्षक सुध्दा अनवधानाने हेच म्हणत असणार की "सुर्य उगवला".
इथे सत्य जरी मान्य आहे तरी व्यवहारात बोलताना कोणीच सत्य बोलत नाही. याचा अर्थ जाणिवपुर्वक सत्य बोलायचे टाळले जाते असे नाही. आमच्या बोलीभाषेवरचा हा संस्कार आहे. हा पुसण अवघड आहे.
simone de beauvior चं 'द सेकंड सेक्स' चा करुणा गोखले यांनी केलेला अनुवाद वाचनात आला हल्लीच. ५५० पानाचं हे पुस्तक वाचायला मी तब्बल १० दिवस घेतले. कारण मांडलेल्या प्रत्येक विश्लेषणावर, संदर्भांवर विचार करतच पुढे जाणं गरजेचं होतं. हे पुस्तक तसं पहाता स्त्रीवादावरचं बायबल समजलं जातं पण आजच्या काळात, आजच्या पिढीचा आणि त्यांच्या जडणघडणीचा विचार करता त्याला आपण स्त्री घडणीचा इतिहास म्हणु शकतो. किंवा इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र सगळंच.
सृष्टीचं कौतुक जितक करावं तितकं कमीच असं वाटण्याला निसर्ग कायमच नवनविन बहाणे देत असतो मला. दरवर्षी वसंतात फुलून फुलून येणारी आणि भरभरुन वहाणारी फुलझाडं हे त्यातलच एक कारण. शिशिर सरुन गेला की झाडांना फुटणारी पालवी बघण्यात, त्यांचा तो हिरवट कडू गंध अनुभवण्यात, त्या तुकतुकीत कोवळ्या पानांना स्पर्श करुन पहाण्यात महिनाभर आरामात निघुन जातो. पण त्याच वेळी निष्पर्ण होवुन कळ्या मिरवणार्या, कुठे कुठे तुरळक फुलू लागलेल्या फुलांच्या तुर्यांनी अजुन लक्ष वेधुन घ्यायला सुरुवात केलेली नसते. हा एक्-दिड महिना सरता सरता बर्यापैकी पानं पोपटीतून हिरव्या रंगात जायला लागतात.
गुलजार.... नाव ऐकलं की आजही एक क्षण खूप मोठा प्रवास करुन येते मी.. काळजाचा ठोका चुकल्यासारखा वाटतो त्या सगळ्या क्षणांच्या आठवणींनी.. गुलजारविषयी हे असं नक्की कशामुळे वाटतं? "ए जिंदगी गले लगाले.." या त्यांच्या शब्दांचा आधार घेत अनेक कडवट क्षणांनंतर आयुष्याला मिठीत घेण्याचा प्रयत्न करत राहिले म्हणुन? मनाच्या तळापासुन जीव पिळवटुन प्रेम करावसं वाटलं तेव्हाही त्यांचे अनेक अनेक शब्द मनात घुमत राहिले म्हणुन? "मुस्कुराऊ कभी तो लगता है, जैसे होठोंपे कर्ज रखा है.." या शब्दांचा शब्दश: प्रत्यय घेतला म्हणुन?
सकाळी रात्री थंडी आणि दिवसभर उकाडा अशा वातावरणातून जेव्हा दिवसभर उकाड्याच्या स्थितीत ॠतू येतो तेव्हा कधी अचानक गाडीवरुन फिरताना / बस मधुन जाताना पांढर्या शुभ्र सुगंधाची एक झुळूक अंगावरुन वाहुन जाते.. आणि मनात स्पष्ट स्पष्ट मोगरा उमटुन जातो. सिझन मधली पहिली मोगर्याची खरेदी हा माझा एक स्वतंत्र सोहळा असतो. अशी चाहुल लागल्यानंतर लगेचच येणारा वीकेंड यासाठी निवडते मी.. सकाळी सगळं आवरुन बाहेर पडते..
असं म्हणतात की आयुष्यात प्रत्येक क्षण युनिक असतो. एकमेव्-अद्वितीय. आणि तो तसाच जगला पाहिजे. तरच आपण प्रत्येक अनुभवाचा परिपूर्ण प्रत्यय घेवु शकतो. पण प्रत्येक क्षणाला हा पण पाळणं अवघड आहे. आणि काही क्षण, काही नावांसाठी तर अशक्य. तसं प्रत्येकच गोष्टीला एक रुप असतं, एक रंग असतो, एक गंध असतो..पण काही नावं येतानाच आपल्यासोबत अनेक रुप, रंग, सुगंधांची गाठोडी घेवुन येतात. आजही कोणताही सिनेमा बघताना मी फक्त तो सिनेमा बघत नसते तर लहाणपणापासून सिनेमासोबत जुळलेल्या, भोगलेल्या सगळ्या आठवणी जगत असते. सिनेमाच्या त्या जगाबरोबरच अजुन एका वेगळ्या आठवणींच्या जगात फिरुन येत असते.
काल माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस होता. ते म्हणतात ना, big day of my life. (अचूक भाव व्यक्त करेल असं मराठी भाषांतर काय आहे याचं? असो..) काल दि. २६ फेब्रु. २०११ पुण्यात संगीत क्षेत्रातील दोन दिग्गज, दोन श्रेष्ठी, उस्ताद झाकिर हुसैन आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा कार्यक्रम होता. गणेश कला क्रिडा मंच. संध्याकाळी ६.३०. माझी अक्षरशः युगानुयुगांची इच्छा होती या दोघांनाही ऐकायची. कारण तालवाद्यात तबला आणि सूरवाद्यात बासरी हे आधीच माझ्या जिव्हाळ्याचे विषय. त्यात या दोन विभुती म्हणजे संगीतक्षेत्रातल्या दंतकथा. एकत्र..
आयुष्यात काही क्षण सुखाचे असतात, काही दु:खाचे, काही रागाचे, लोभाचे.. पण काही क्षण मात्र असे येतात की त्यावेळी त्या भावनेपेक्षा काळिज हलवुन टाकणारी त्या भावनेची तीव्रताच मनात घर करुन रहाते.. अगदी कित्येक वर्षांनी जरी आठवले ते क्षण तरी ते तितकेच तीव्र असतात. असं म्हणतात की काळाबरोबर सगळे रंग फिकट होत जातात. पण काही रंगांचे फटकारे मात्र सूर घोटुन अधिक अस्सल व्हावे तसे अधिकच चमकदार होत रहातात....
--------------------------------------------------------------------------------
सावित्री.. पु.शि.रेगेंची एक सुंदर कलाकृती.. ३-४ वर्षांपुर्वी मी पहिल्यांदा वाचलं हे पुस्तक आणि मग वाचतच राहिले अनेकदा. कधी उत्कट प्रीतीभावना मनात असताना, कधी विरहाचं दु:ख गोंजारताना तर कधी सन्यस्त, उन्मन अवस्थेत.. प्रत्येक वेळेस मला नवीच साऊ भेटली. नव्याने कळली. तरी प्रत्येक वेळी तितकीच भावली. कधी माझंच एक रूप माझ्यासमोर बसुन माझ्याशी बोलतंय असं वाटलं तर कधी आकाशाएवढी मोठी साऊ माझ्याचसाठी म्हणुन शब्दातुन बरसतेय असं वाटलं.