सकाळ झाली सुर्य उगवला. उगवला ? हो आपण असच नाहीका म्हणत पिढ्यानपिढ्या ? मराठीतही तेच म्हणतो आणि आपल्याला अधुनिकतेचा वारसा शिकवणार्या इंग्रजीतही तेच म्हणतो.
खर तर सुर्य स्थिर आहे, पृथ्वी स्वतभोवती फिरते आणि सुर्यासमोर येते म्हणुन सकाळ होते हे सत्य आता शाळेतच शिकवले जाते. तरी आपल्या घरी, आजुबाजुला हेच बोलले जाते. किंबहुना शाळेत हे सत्य शिकवणारे शिक्षक सुध्दा अनवधानाने हेच म्हणत असणार की "सुर्य उगवला".
इथे सत्य जरी मान्य आहे तरी व्यवहारात बोलताना कोणीच सत्य बोलत नाही. याचा अर्थ जाणिवपुर्वक सत्य बोलायचे टाळले जाते असे नाही. आमच्या बोलीभाषेवरचा हा संस्कार आहे. हा पुसण अवघड आहे.
जस सुर्य उगवतो हे म्हणताना सत्य काय आहे हे गृहीत असते तश्या अनेक गोष्टी आपण गृहीत धरलेल्या असतात.
जश्या बोलताना आपण काही गोष्टी गृहीत धरलेल्या असतात तसे सामाजिक स्तरावर काही गोष्टींचे संकेत अगदी पक्के असतात.
स्त्रियांची कामाची क्षेत्र कुठली आणि पुरुषांची कोणती याबाबत सुध्दा अशीच गृहीते असतात.
मा. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची राष्ट्रपती पदावर निवड झाल्यावर या संकेताला पुरक असे वाद वर्तमान पत्रात रंगले. आता राष्ट्रपतींना राष्ट्रपती म्हणायच की भारतीय घटनेत या पदाला राष्ट्राध्यक्ष म्हणण्याचे बदल करुन घ्यायचे इत्यादी.
हे फ़क्त राष्ट्रपती पदाच्या बाबतीत होत अस नाही. साध्या साध्या गोष्टींमध्ये झालेले बदल समाजाच्या नजरेला खुपतात.
काही दिवसांपुर्वी पेट्रोल पंपावर एका मुलीला पेट्रोल विक्री करताना, वाहनांमध्ये पेट्रोल भरताना, पैसे देताना घेताना पाहिल. माझ्या बरोबरच्या सहकार्याने लगेच पुणेरी तिरकस शेरा खाजगीत मारला. " हे म्हणजे अतीच झाल. खर तर मुलांनी करण्याच हे काम मुलींना का दिल ?"
मी म्हणालो "काय बिघडल ? आज जरा विचीत्र वाटेल कारण आपल्या डोळ्यांना याची सवय नाही. पण उद्या सवय झाली की काही गैर वाटणार नाही."
"हा हा चक्क पेट्रोलची विक्री वाढवायचा उपक्रम आहे. मुलींना पाहुन इथे गर्दी होईल आणी व्यवसाय वाढेल हा पेट्रोल पंप मालकाचा अंदाज दिसतो आहे". सहकारी मला तोडत बोलला. आता माझ्या सहकारी मित्राचा दृष्टिकोन पुरुषांची मक्तेदारी हा नव्हता तर स्त्रियांचा व्यावसायीक कारणांसाठीचा वापर या मुद्यावर आला होता.
मी म्हणालो "मुन्नी बदनाम हुवी हे गाण किंवा तत्सम शीला की जवानी या सारख्या आयटम साँगचा हाच तर व्यावसायीक दृष्टीकोन असतो. हे समाज शांतपणे पहातो मग या पेट्रोल पंपावरच्या मुली मात्र रुचत नाहीत अस का ?"
सहकारी निरुत्तर झाला होता.
समाजाच असच आहे. क्रिकेटच्या खेळात चिअर्स गर्ल्स नाचताना पहाताना कुणाला वावग दिसल नसेल पण महिला क्रिकेटची आजची स्थिती काय आहे ? किती लोक महिला क्रिकेटचे सामने पहायला उत्सुक असतील ? फ़ारच कमी. जुन्या काळात असे सामने झाले. डायना एडलजी हे नाव सोडता महिला क्रिकेटीयर्सची नावे स्मरणातुन गेलेली आहेत.
प्रसिध्दी सोडाच महिला क्रिकेटीयर्सच्या वाट्याला उपेक्षाच जास्त आली असावी नाहीतर त्यांचे नाही का वल्ड कप आणि विक्रम झाले असते ? पण नाही, समाजाच्या गृहीतात क्रिकेट हा पुरषी खेळ आहे. समाजाला अपेक्षीत उन्माद/करमणुक महिलांच्या क्रिकेट खेळण्याने येत नाही.यामुळे व्यावसायीक गणितात महिला क्रिकेट बसत नाही. हे झाल व्यावसायिकांच मत पण व्यावसायीक नसलेले महिला क्रिकेटचे सामने पहायला, शाळा कॉलेजच्या स्तरावर घडवुन आणायला काय हरकत आहे ?
नको ग बाई क्रिकेट खेळताना काही दुखापत झाली तर तुला कोण पत्करेल ही मुलींच्या आयांची मानसिकता जर आड आली नाही तर मुली किमान या खेळाचा तर आनंद लुटु शकतील.
चक दे इंडियाचा विषय हा महिलाहॉकीच्या खेळाबाबत समाजाचा दृष्टीकोन बदलण्याचा होता तसाच राणी मुखर्जीचा दिल बोले हड्डीप्पा या सिनेमाचा विषय हेच सांगुन गेला पण व्यर्थ.
काल बस मधुन जाताना थेरगाव चिंचवडच्या पदमजी पेपर्स मिल जवळच्या मैदानावर एक मुलगी क्रिकेट खेळताना दिसली. क्षणभर वाटल ही मुलगी मुलांच्या बरोबरीने क्रिकेट खेळते आहे. नंतर लक्षात आल की ही एक मुलगी मुलांच्या बरोबर क्रिकेट खेळत नसुन अनेक मुली क्रिकेट खेळत आहेत.
शहरात बिल्डर्स च्या तडाख्यातुन वाचलेली मैदाने फ़ारशी नाहीत. जी आहेत ती मुलांच्या क्रिकेट किंवा अन्य खेळांनांच उपलब्ध आहेत अश्या गृहीतातुन वाचलेल हे मैदान क्रिकेट खेळणाया मुलींना नक्कीच काही काळापुरता आनंद देऊन गेल असेल.
(No subject)
छान लिहिलय
छान लिहिलय
ह्म्म्म
ह्म्म्म
ह्म्म्म खरच की!
ह्म्म्म खरच की!
एका उपेक्षित विषयाला हात
एका उपेक्षित विषयाला हात घातलात बरं वाटले. अहो साध्या साध्या गोष्टी घ्या.... ऑफिसमधल्या महिलांना पुरेशी आणि स्वच्छ् प्रसाधनग्रुहे देखील नसतात हे माझे निरीक्षण आहे बाकी सुधारणा विसरूनच जा. एखादी कविता महाजन किंवा मेघना पेठे लिहिते तेव्हा केवढा साहित्यिक गोंधळ उडतो !
पटले ..... अभिनंदन वेगळा विषय
पटले ..... अभिनंदन वेगळा विषय वेगळ्या रुपात समोर आला
हम्म!
हम्म!
पुरेपूर सहमत छान लेख
पुरेपूर सहमत छान लेख
छान विषय.
छान विषय.