आयुष्यात काही क्षण सुखाचे असतात, काही दु:खाचे, काही रागाचे, लोभाचे.. पण काही क्षण मात्र असे येतात की त्यावेळी त्या भावनेपेक्षा काळिज हलवुन टाकणारी त्या भावनेची तीव्रताच मनात घर करुन रहाते.. अगदी कित्येक वर्षांनी जरी आठवले ते क्षण तरी ते तितकेच तीव्र असतात. असं म्हणतात की काळाबरोबर सगळे रंग फिकट होत जातात. पण काही रंगांचे फटकारे मात्र सूर घोटुन अधिक अस्सल व्हावे तसे अधिकच चमकदार होत रहातात....
--------------------------------------------------------------------------------
३रीत असताना शहिद भगतसिंग चित्रपट पाहिला तेव्हा त्यांच्या फाशीच्या वेळेस अक्षरशः धाय मोकलुन रडलेली ती. आणि आईने कितीही समजावलं तरी इंग्रज हा देश सोडुन गेलेत आता यावर कितीतरी दिवस तिचा विश्वास बसत नव्हता.
-------------------------------------------------------------------------------
ती बाबांची वाट बघत शाळेबाहेर उभी होती. समोरुन एक गाडी चाललेली. त्यावरचं बाळ तिच्याकडे आणि ती त्या बाळाकडे बराच वेळची पहात होते. आणि नजरेआड जायची वेळ आली तेव्हा अचानकच ते बाळ खूप गोड हसलं आणि तिला बाय्-बाय करायला हात हलवले त्याने. आज इतक्या वर्षांनंतरही ते बाळ जसंच्या तसं नजरेसमोर येतं तिच्या.
--------------------------------------------------------------------------------
१३-१४ वर्षांची असताना कधीतरी एका हिवाळी रात्री कोणत्यातरी नातेवाइकाकडे सुट्टी घालवताना "दिल ढूंढता है फिर वोही.." ऐकलं होतं. काय समजलं त्यातलं? माहित नाही. पण एक प्रश्नही न विचारता ती आता आयुष्यभरासाठी ते लिहिणार्या माणसाच्या प्रेमात पडली होती.
---------------------------------------------------------------------------------
८-९ त असताना तिच्या बिल्डींगमधल्या बांधकामाच्या इथे मांजरीची २ पिल्लं आलेली. ती तासन् तास त्यांच्याशी बोलत बसायची. त्यांना तिची भाषा सगळीच्या सगळी समजते यावर विश्वास होता तिचा. खरतर, त्यावेळेला सगळं जगच गप्पा मारायचं तिच्याशी. हल्ली खूप शांतता असते. तिनेच ऐकायचं बंद केलय का?
---------------------------------------------------------------------------------
हॉस्टेलवर तशी शांतताच होती सेमिस्टर संपल्यामुळे. तिला अजुन घरी जायला २ दिवस होते.
रात्री वळवाचा पाऊस आला. आता असह्य होतं हे म्हणजे. रात्री २ ला पावसात चिंब चिंब भिजत उभी होती ती. आणि त्या धुवांधार पावसात तिला स्पष्ट ऐकु आले सूर. आये ना बालम, का करु सजनी..
----------------------------------------------------------------------------------
फुलवेडीच ती.. सह्याद्रीच्या कुठल्यातरी घाटात हुंदडताना तिने अशीच खूप सारी फुलं गोळा केली होती. त्या गुच्छावर एक फुलपाखरु येवुन बसलं तेव्हा तिचा आनंद गगनात मावेना. तरी स्तब्धपणे बघत राहिली त्याच्याकडे ते उडुन जाईपर्यंत..
----------------------------------------------------------------------------------
त्यांच्या दाटलेल्या आठवणीने कित्येकदा ती उशीत तोंड खूपसुन रडली होती. आज खूप वर्षांनी ते सगळे चॅटवर एकत्र भेटले. तिला खूप काही बोलायचं होतं. त्यांना सांगायचं होतं की तुम्ही सगळे खूप खूप काही आहात माझ्यासाठी. मी कधीही व्यक्त करु शकेन त्याहीपेक्षा जास्त. पण नाही बोलु शकली काहीच. त्या रात्री रडताना पहिल्यांदा परकेपणा दाटलेला.
-----------------------------------------------------------------------------------
रोज संध्याकाळी ऑफिसमधुन घरी येताना त्या फुलवालीकडुन २ रु. ची फुलं घ्यायची ती देवपुजेला. फुलवाली एकदा म्हणाली, "बाई गं, मी कदी कोनालाच २ रु. ची फुलं देत नाही. पन तुला न्हायी म्हनायला जमतच न्हायी बघ." कशानेतरी हवेवर तरंगल्यासरखं झालं तिला काही काळ नक्कीच...
कॅलिडोस्कोप
Submitted by मी मुक्ता.. on 21 February, 2011 - 23:19
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मुक्ते,खूप छान गं,आवडलं,काय
मुक्ते,खूप छान गं,आवडलं,काय सुंदर लिहितेस.
तू तिच ना ग?
धन्यवाद नोरा.. विपु पहा..
धन्यवाद नोरा.. विपु पहा..
खूप सुंदर!!! लिहित्या
खूप सुंदर!!! लिहित्या राहा.......
खुप सुंदर
खुप सुंदर
खूप खूप आभार स्वातीजी, हसरी..
खूप खूप आभार स्वातीजी, हसरी..
असे क्षण आपापले. कुणाला
असे क्षण आपापले. कुणाला सांगून त्यातली गंमत कळतच नाही !
सुरेख. नाजूक, हळवे, आपले
सुरेख. नाजूक, हळवे, आपले स्वत:चे क्षण ........
दिनेशदा, कदाचित नाही कळणार
दिनेशदा, कदाचित नाही कळणार गंमत पण तरिही..
कौन रोता है किसी और की खातिर मेरे दोस्त,
सबको अपनीही किसी बात पे रोना आया..
असंच काहितरी..
धन्यवाद मामी..
आह..... मुक्ता अप्रतिम......
आह..... मुक्ता अप्रतिम...... कोणीतरी काळजाला हात घातल्यासारखं वाटलं....
असा कॅलिडोस्कोप खरं तर प्रत्येकाने लिहून पाठवायला हवा..... कितीतरी समान धागे समोर येतील....
पु.ले.शु.
आवडलं. विशेषतः, 'काही रंगांचे
आवडलं.
विशेषतः, 'काही रंगांचे फटकारे मात्र सूर घोटुन अधिक अस्सल व्हावे तसे अधिकच चमकदार होत रहातात' हे वाक्य फारच पटले.
आता हेच रंग-प्रसंग का मागे रेंगाळतात त्याचे काही लॉजिक नाही. बर्याचवेळा ते तसे तथाकथित महत्वाचेही नसतात.
'जाने क्या सोच कर नही गुजरा, एक पल रात भर नही गुजरा' हेच खरे!
धन्यवाद भुंगा.. आगाऊ, 'जाने
धन्यवाद भुंगा..
आगाऊ,
'जाने क्या सोच कर नही गुजरा, एक पल रात भर नही गुजरा' >> अगदी अगदी..
(No subject)
हे वाचलं मला अजूनच वय
हे वाचलं मला अजूनच वय वाढल्यासारखं वाटतं.
लिहीत रहा मुक्ता.
आगाऊला अनुमोदन.
खूप आभार रैना.. नीधप..
खूप आभार रैना..
नीधप..
आवडले.
आवडले.
अप्रतिम....सिम्पली अप्रतिम
अप्रतिम....सिम्पली अप्रतिम
ग्रेट..! आयुष्यातील
ग्रेट..!
आयुष्यातील वेगवेगळ्या वयांची टप्पे सुंदर क्षणांनी वर्णन केलीएस.
खूप धन्यवाद स्वाती, शामा,
खूप धन्यवाद स्वाती, शामा, अमितजी..
एकदम दिलसे ... मुक्ता स्टाईल
एकदम दिलसे ... मुक्ता स्टाईल !!!
...शाखोंपे खिले फुल नये ...और दर्द पुराने याद आये...
सुंदर!!! थेट...
सुंदर!!!
थेट... नेहमीसारखं...
शुभेच्छा!!
गिरिशजी, शाखोंपे खिले फुल नये
गिरिशजी,
शाखोंपे खिले फुल नये ...और दर्द पुराने याद आये... >> खरंय
आनंदयात्री, धन्यवाद...
मुक्ता. एकदम खेचून नेणारं
मुक्ता. एकदम खेचून नेणारं लिहिलयस...
<<'काही रंगांचे फटकारे मात्र सूर घोटुन अधिक अस्सल व्हावे तसे अधिकच चमकदार होत रहातात>>
मै खयाल था किसी और का मुझे सोचता कोई और है.... झालं.
मुक्ता, अप्रतिम.. प्रत्येक
मुक्ता, अप्रतिम..
प्रत्येक आठवण म्हणजे एकेक मोती.
लिहित रहा गं.
धन्यवाद दाद, किरुजी..
धन्यवाद दाद, किरुजी..
सुंदर, ओघवते लिहिलय. लिहित
सुंदर, ओघवते लिहिलय. लिहित राहा.
मस्तच एकदम!
मस्तच एकदम!
कॅलिडोस्कोप का म्हटलस कुणास
कॅलिडोस्कोप का म्हटलस कुणास ठाऊक.. पण एक सुंदर कोलाज आहे येवढं नक्की...!!!
सुंदर कोलाज >>> नक्कीच
सुंदर कोलाज >>> नक्कीच मुक्ते, भारीच.
अश्या माणसांना दोन वेळेच्या
अश्या माणसांना दोन वेळेच्या अन्नासाठी खर्डेघाशी करावी लागणे किंवा मशीनशी संवाद साधावा लागणे या सारखा दैदुर्विलास नाही.
त्यांचा व्यवसाय आणि छंद एकच असेल अशी परमेश्वराने त्या प्रत्येक मनस्वी माणसावर कृपा करावी.
सर्वांचे खूप खूप आभार..
सर्वांचे खूप खूप आभार..
सत्यजित.. कोलाज नावची एक कथा आहे माझी आधीच..
नितीनचंद्र, ह्म्म....!