पुरुषार्थ या शब्दाचा लौकिकार्थ जरी पुरुषांच्या पराक्रमाशी निगडित असला, तरी बरेच वेळा काही स्त्रिया आपल्या कर्तृत्वाने पुरुषार्थातल्या 'पुरुष' हा लिंगभेदात्मक शब्दाचा विसरायला भाग पाडतात। जातपात, लिंग, धर्म, देश असे सगळे भेद दूर सारून फक्त स्वतःच्या कर्तृत्वाला सलाम करायला लावतात आणि आणि मग पुरुषी अहंकार क्षूद्र वाटायला लागतो.ध्यानीमनी नसताना केवळ एका छोट्याश्या गैरसमजुतीमुळे माझी भेट एका अश्या ' दाम्पत्याशी ' घडली की आयुष्याकडे आणि आजूबाजूच्या माणसांकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन तीनशे साठ अंशांनी बदलला.
" हॅलो, आशिष का? अरे एक वाईट खबर द्यायचीय...आपला सूरज गेला...."
शाप आणि वरदान यातली सीमारेखा काही वेळा खूप धूसर असते. जे अमरत्व हनुमानाचं तेच अश्वत्थाम्याचं, पण दोघांच्या नशिबात आलेले भोग त्या अमरत्वाला वेगवेगळा अर्थ देत असतात. रेखीव चेहेरा, बांधेसूद शरीर आणि शुभ्र गोरा वर्ण समाजाच्या प्रचलित व्याख्येनुसार कोणत्याही स्त्रीला सौंदर्याची अनेक विशेषणं देण्यायोग्य जरी करत असला, तरी त्या स्त्रीचा जन्म अश्वत्थाम्याच्या कुळातला असेल, तर त्या नशिबाचे विश्लेषण करायला कोणतीही पत्रिका कमी पडते.
सौंदर्य,लावण्य, देखणेपणा, रेखीवपणा अशा सगळ्या मोजमापांना मागच्या काही वर्षात 'आंतरराष्ट्रीय' वलय प्राप्त झालं आहे. सौंदर्यस्पर्धा, शरीराची प्रमाणबद्धता मोजण्याचे निकष, गोऱ्या कांतीला सावळ्या अथवा काळ्या कांतीपेक्षा मिळालेली सर्वमान्यता, सौंदर्य प्रसाधनांच्या मोठमोठाल्या कंपन्यांनी आणि 'फॅशन इंडस्ट्री'ने लोकांच्या मानसिकतेवर जाहिरातींचा मारा करून टाकलेला प्रभाव अशा अनेक मार्गांनी सौंदर्याच्या व्याख्या आमूलाग्र बदलल्या गेल्या आहेत.
काही माणसं कुंडलीत ' आजन्म लाळघोटेपणा ' नावाचा एक महत्वाचा योग्य घेऊनच जन्माला येतात. त्यांचे बाकीचे ग्रह त्या एका योगाभोवती पिंगा घालत असतात .साडेसाती असो व मंगळ, हा योग्य त्यांना सगळ्या कुग्रहांपासून सतत दूर ठेवतो. सहसा एका ठिकाणी कामाच्या निमित्ताने चिकटल्यावर अशी माणसं आजन्म तिथेच राहतात, किंवा ज्यांचे ' लोम्बते ' होऊन ते तिथे टिकलेले असतात, त्यांनी नोकरी बदलल्यावर मागोमाग त्यांच्याबरोबर हे सुद्धा नव्या जागी दाखल होतात. अशा माणसांना स्वत्व, स्वाभिमान, स्वतंत्र अस्तित्व अशा कोणत्याही गोष्टींची गरज कधीच पडत नाही.
" मी या केकला हात लावू शकणार नाही. मला तू केक देतोयस यासाठी तुझे आभार मानतो, पण मी तो खाऊ शकणार नाही." फादी मला नम्रपणे पण ठाम शब्दात नकार देत होता. आजूबाजूचे माझे मित्र मला ' कशाला त्याच्या फंदात पाडतोयस.....सोड ना......' सारखे सल्ले देत मला बाजूला ओढत होते. ऑफिसमध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापून मी सगळ्यांना वाटत होतो. बाकी कोणीही काहीही कुरबूर केली नाही, पण हा मात्र अडून बसला. शेवटी जास्त मस्का मारण्यापेक्षा सरळ निघावं असा विचार करून मी इतरांकडे गेलो. त्याने मला ' माफ कर....गैरसमज नको करून घेऊस ' असं पुन्हा एकदा सांगितलं.
आफ्रिकेच्या देशांमधला त्यातल्या त्यात प्रबळ, लोकसंख्येने समृद्ध आणि अर्थकारणाच्या बाबतीत आजूबाजूच्या भावंडांपेक्षा उजवा असेलला देश म्हणजे नायजेरिया. या देशाच्या जमेच्या बाजूमध्ये अनेक गोष्टी लिहिता येऊ शकतात हे खरं असलं, तरी त्यापेक्षा कैक पटीने अधिक गोष्टी विरुद्धच्या रकान्यात भरता येऊ शकतात. या देशाच्या तरुणांची संख्या एकूण लोकसंख्येच्या पन्नास टक्क्यांहून जास्त असल्यामुळे रूढार्थाने हा देश प्रगतीच्या शिखरावर असणं जरी अपेक्षित असलं, तरी भ्रष्टाचार, देशांतर्गत हिंसाचार, संघटित गुन्हेगारी यामुळे या तरुणांचा ओढा नको त्या दिशेला जास्त आहे.
वेश्याव्यवसाय हा जगातला कदाचित सगळ्यात जुना व्यवसाय असावा. लाखो वर्षांपूर्वी मनुष्य अस्तित्वात आला तेव्हापासून त्याची उत्क्रान्ती टप्प्याटप्प्याने होते आहे, असं विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे. ही उत्क्रांती शारीरिक, मानसिक आणि लैंगिक - अश्या तिन्ही पातळ्यांवर झाली आणि होत राहील, असंही विज्ञान सांगतं. मनुष्य हा ' समाजात ' राहणार प्राणी आहे, त्याच्या सामाजिक उत्क्रांतीत त्याने 'नाती' निर्माण केलेली आहेत आणि त्या नात्यांशी निगडीत चौकटीसुद्धा त्याने आखून घेतलेल्या आहेत, असा समाजशास्त्रीय सिद्धान्त त्या उत्क्रांतीवादाबरोबर सांगितला जातो.
" हॅलो, आशिष का? अरे एक वाईट खबर द्यायचीय...आपला सूरज गेला...."
मागच्या पंचवीस वर्षांपासून जगाची एकमेव महासत्ता हे बिरुद अभिमानाने मिरवणाऱ्या अमेरिकेत जाऊन अनेक जाती-धर्म-पंथ-देशाच्या लोकांनी आपली भरभराट करून घेतलेली आहे। संधींची उपलब्धता, गुणग्राहकता, विचारस्वातंत्र्य आणि मेहेनतीचा हमखास मिळणार परतावा अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे अमेरिकेला जाऊन तिथलं नागरिकत्व मिळवणं आणि त्यानंतर सुखसमृध्दीचं जीवन जगणं ही स्वप्न बाळगणारे हजारो तरुण जगाच्या कानाकोपऱ्यातून अमेरिकेत वास्तव्याला गेले। मागील काही वर्षांपासून मात्र अनेक राजकीय कारणांनी या 'अमेरिकन ड्रीम' ला अमेरिकेच्याच राजकारण्यांनी वेसण घालायचं काम करायला सुरुवात केली, ज्यामुळे गेल्या काही वर्षांपासून प्रस्थाप